virus alert 
विज्ञान-तंत्र

सावधान! पुन्हा परतला धोकादायक Virus; एका मेसेजमुळे बँक अकाउंट होतंय रिकामं

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - डिजिटल व्यवहारांचा वापर सध्या वाढला आहे. लॉकडाऊनमध्ये रोख व्यवहार करण्यापेक्षा ऑनलाइन व्यवहार केले जात आहेत. मात्र याचाच फायदा घेऊन सायबर हल्ले करणाऱ्यांकडून फसवणूक करण्याचे प्रकार होत आहेत. यातच आता एक जुना व्हायरस पुन्हा एकदा धुमाकूळ घालत आहे. यामुळे मेलवेअर युजर्सच्या बँकिंग डिटेल्स आणि पर्सनल माहिती चोरली जात आहे. फेकस्काय नावाचा हा मेलवेअर ऑक्टोंबर 2017 मध्ये आढळला होता. जपान आणि दक्षिण कोरियात या व्हायरसनं धुमाकूळ घालत अनेकांची खाती रिकामी केली होती. आता Cybereason Nocturnus च्या संशोधकांना असं आढळलं आहे की, फेक स्काय जगभरातील युजर्सना टार्गेट करत आहे. हा मेलवेअर चीन, तैवान, फ्रान्स, स्वित्झर्लंड, जर्मनी, युके, युएससह इतर देशात अॅक्टिव झाला आहे. 

गेल्यावेळी ज्या पद्धतीने हा मेलवेअर युजर्सना डाक सेवा अॅपच्या स्वरुपात मेसेज पाठवून फसवत होता तसंच आताही करत आहे. यावेळी मेलवेअरचं लक्ष्य युजर्सच्या बँक खात्यांवर आहे. रिपोर्टनुसार मेलवेअर Smishing किंवा SMS-फिशिंग अटॅकच्या करून युजर्सना टार्गेट करत आहे. युजर्सना एक मेसेज पाठवून एक अॅप डाउनलोड करायला सांगितलं जातं. 

युजर्सना मेसेज पाठवल्यानंतर जर त्यांनी अॅप डाऊनलोड केलं तर युजरकडून दोन प्रकारच्या परवानग्या मागितल्या जातात. यामध्ये तुमच्या डिव्हाइसवर आलेला मेसेज वाचण्याची आणि डिव्हाइस लॉक झाल्यानंतरही बॅकग्राउंडला अॅप सुरु ठेवण्याची परवानगी याचा समावेश आहे. 

तुम्ही अॅप डाउनलोड करून एकदा परमिशन दिलीत की तुमची महत्वाची माहिती हॅकर्सना मिळत राहते. यामध्ये फोन नंबर, डिव्हाइस डिटेल्स, ओएस व्हर्जन, टेलिकॉम प्रोव्हायडर, बँकिंग डिटेल्स, IMEI नंबर आणि IMSI नंबर घेतले जातात. संशोधकांचे असे म्हणणे आहे की, यामागे एक चायनिज ग्रुप Roming Mantis काम करत आहे.

संशोधकांनी म्हटलं की, आमच्या विश्लेषणातून अशी माहिती समोर आली आहे की, फेकस्पाय मेलवेअरच्या मागे चायनिज स्पिकिंग ग्रुप आहे. याला सामान्यपणे रोमिंग मेंटिस म्हणून ओळखलं जातं. हा एक असा ग्रुप आहे ज्याने याआधी अशा प्रकारचे अनेक कँपेन सुरु करण्यासाठी ओळखले जातात. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

"आमचं लग्न लोकांना मान्य नव्हतं" श्रुती मराठे- गौरव घाटणेकरचा धक्कादायक खुलासा; "तिची साथ नसती तर.."

Latest Maharashtra News Updates : मरकटवाडीच्या ग्रामस्थांचं विधानभवन बाहेर आंदोलन

Nargis Fakhri : 'तो मृतदेहावरचं मांस खायचा आणि मलाही..' अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव, म्हणाली, 'खणलेले मृतदेह काढून तो...'

SCROLL FOR NEXT