father's day special 2022
father's day special 2022 
विज्ञान-तंत्र

Father's Day 2022 I सुरक्षितरित्या Whatsapp हाताळण्याच्या काही सोप्या ट्रिक्स

सकाळ डिजिटल टीम

या फादर्स डे निमित्त तुम्ही वडिलांना मदत म्हणून इन्स्टंट मेसेजिंग अॅप्लिकेशन्समधून काही टिप्स देऊ शकता.

सध्या सोशल मिडीया लोकांशी खूप कनेक्ट आहे. यामध्ये असणारे विविध अॅप्समुळे लोक एकमेकांशी अधिकच जवळ आली आहेत. व्हॉट्सअॅप हे एक अॅप्लिकेशन आहे, जे वापरकर्त्याला त्यातील प्रत्येक व्हर्जन्सद्वारे वापरले जाते. (Fathers Day Special) कोणत्याही वयाचा माणूस हे अॅप सहजरित्या वापरु शकतो. शाळेत जाणारा तरुण विद्यार्थी किंवा मग 45 वर्षांचा नोकरी करणारा एकदा तरुण असेल. 75 वर्षांचा ज्येष्ठ नागरिकापासून ते अगदी सर्व वयातील लोक याचा वापर करताना दिसतात. (whatsapp safely)

मात्र अनेक दुर्जन विकृतीचे लोक याचा गैरवापर करण्याचा प्रयत्न करतात याची तांत्रिक माहिती नसणारे लोक नेमकी याची शिकार होतात. (Fathers Day 2022) असे प्रकार आपण अनेकांनी अनुभवले असतील त्यामुळे या फादर्स डे (fathers day) निमित्त तुम्ही तुमच्या वडिलांना मदत करण्यासाठी इन्स्टंट मेसेजिंग अॅप्लिकेशन्समधून काही टिप्स देऊ शकता.

फॉरवर्डेड मेसज

व्हाट्सअॅपने सर्व फॉरवर्डेड मेसेजसाठी एक लेबल तयार केले आहे. त्यामुळे फॉरवर्डेड मेसज पुन्हा शेअर करण्यापूर्वी प्रत्येकाने एकदा विचार करणे गरजेचे आहे. याच कारणामुळे फॉरवर्डिंगची संख्या मर्यादित करण्यात आली आहे. अशा फॉरवर्डेड मेसजचा स्त्रोत माहित नसल्याने तुम्ही वडिलांना यांसदर्भात माहीती देऊ शकता. असे मेसेज शक्यतो फॉरवर्ड न केलेल उत्तम कारण ही माहितीही खोटीही असू शकते, असे सांगू शकतो.

टू-स्टेप व्हेरिफिकेशन

टू-स्टेप व्हेरिफिकेशन वैशिष्ट्य व्हाट्सअॅप वापरकर्त्यांना उपयोगी पडते. व्हाट्सअॅप अकाऊंट हे यामुळे सक्षम तर बनतेच शिवाय सुरक्षितही राहते. तुमचे व्हॉट्सअॅप खाते रीसेट आणि त्याच्याशी संबंधित कोणतीही पडताळणी करण्यासाठी एक सहा-अंकी पिन आवश्यक आहे. तुमच्या वडिलांचे सिमकार्ड चोरीला गेल्यास किंवा त्यांच्या फोनमध्ये छेडछाड झाल्यास हे उपयुक्त ठरते.

कॉंन्टॅक्ट ब्लॉक करणे

व्हॉट्सअॅप हे वापरकर्त्यांला नको असणारी खाती ब्लॉक करण्याची सुविधा पुरवते. एखाद्याला त्रासदायक संदेश येत असतील तर त्याची तक्रार तुम्ही करू शकता. याशिवाय आता व्हॉट्सअॅप लोकांना त्यांच्या फोनवर रिपोर्ट केलेले संदेश ठेवण्याचा पर्याय ऑफर करत आहे. जर ते फॅक्ट-चेकर्स किंवा कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या अधिकार्‍यांसह सामायिक करायचे असल्यास तुम्ही करु शकतो.

खासगी संभाषण

व्हॉट्सअॅपमध्ये 'Disappearing Messages' नावाचे फीचर आहे. जिथे तुम्ही वैयक्तिक किंवा गट चॅटिंगमध्ये पाठवलेले नवीन संदेश वापरकर्त्यांनी निवडलेल्या कालावधीनुसार अदृश्य होतात. याशिवाय, आणखी एक 'व्यू वन्स', नावाचा पर्याय वापरकर्त्यांना सक्षम करतो. यामुळे तुम्ही एकदा उघडल्यानंतर चॅटमधून गायब झालेले फोटो आणि व्हिडिओ पाठवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरे एकाच मंचावर; 17 मे रोजी सभा

KL Rahul: 'हा काय वनडे-टी20 खेळणार, त्याच्याकडे स्ट्रेंथच नाही...', केएल राहुलने सांगितली ती आठवण

Covishield : सीरमने २०२१ मध्येच थांबवले कोव्हिशिल्डचे उत्पादन

Gargai Dam Project : गारगाई प्रकल्पाला येणार वेग; मुंबईला मिळणार ४०० दशलक्ष लिटर पाणी

PSL vs IPL : पाकिस्तान करणार धरमशालाची कॉपी; PSL ला IPL सारखी झळाळी देण्यासाठी सुरू केली धडपड

SCROLL FOR NEXT