First Woman in Space eSakal
विज्ञान-तंत्र

First Woman in Space : आजच्या दिवशी घडला होता इतिहास! अंतराळात प्रथमच गेली महिला; जाणून घ्या सविस्तर

व्हॅलेंटिना यांनी १६ जून रोजी वोस्टॉक 6 रॉकेटमधून अंतराळात झेप घेतली.

Sudesh

१६ जून ही तारीख इतिहासातील एक महत्त्वाचा दिवस आहे. १९६३ साली आजच्या दिवशी अंतराळात पहिल्यांदाच एक महिला गेली होती. व्हॅलेंटिना तेरेस्कोवा (Valentina Tereshkova) या अंतराळात जाणाऱ्या पहिल्या महिला आहेत. यासोबतच, त्या अंतराळात जाणाऱ्या सर्वात तरुण महिला (Youngest woman in Space) देखील आहेत. वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी त्यांनी ही अंतराळ मोहीम पार पाडली होती.

व्हॅलेंटिना यांनी १६ जून रोजी वोस्टॉक 6 रॉकेटमधून अंतराळात झेप (First Woman in Space) घेतली. ७१ तासांमध्ये या रॉकेटने पृथ्वीला ४८ वेळा प्रदक्षिणा घातली. हे एक सोलो मिशन होते. या उड्डाणाच्या दोन दिवसांपूर्वी व्हॅलेरी एफ. बायकोव्हस्की हा अंतराळवीर देखील अवकाशात गेला होता. हे दोघेही १९ जून रोजी पृथ्वीवर परत आले.

कोण होत्या व्हॅलेंटिना

व्हॅलेंटिना यांचा जन्म ६ मार्च १९३७ रोजी झाला होता. रशियातील एका छोट्याशा गावात त्यांचा जन्म झाला. त्यांची आई एका फॅक्टरीमध्ये काम करत, तर वडील ट्रॅक्टर चालवायचे. दुसऱ्या महायुद्धात त्यांच्या वडिलांनी उल्लेखनीय कामगिरी केली होती. मात्र, व्हॅलेंटिना केवळ दोन वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचे युद्धात निधन झाले.

कपड्यांच्या फॅक्टरीत केलं काम

वडिलांच्या मृत्यूनंतर व्हॅलेंटिना यांना आईनेच वाढवलं. काही वर्षांनी व्हॅलेंटिना देखील आईसोबत कपड्यांच्या फॅक्टरीमध्ये काम करण्यास जाऊ लागल्या. त्यांना पॅराशूटिंगची आवड होती. १९५९ मध्ये त्यांनी एका स्थानिक फ्लाइंग क्लबमध्ये स्कायडायव्हिंग सुरू केलं होतं. याच अनुभवाचा पुढे त्यांना अंतराळात जाण्यासाठी फायदा झाला.

सोव्हिएत वायुसेनेत निवड

सोव्हिएतच्या हवाई दलात भरती होण्यासाठी अर्ज केल्यानंतर व्हॅलेंटिना यांना १८ महिन्यांचं प्रशिक्षण घ्यावं लागलं. यावेळी त्यांना तीव्र ग्रॅव्हिटी, इमर्जन्सी आणि स्पेसमध्ये आयसोलेशनमध्ये ठेवल्यानंतर होणारी परिस्थिती या सगळ्या गोष्टींचं ट्रेनिंग देण्यात आलं. अवघ्या २४ वर्षांच्या व्हॅलेंटिना यांनी हे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून वायुसेनेत आपलं स्थान मिळवलं.

मंगळावर जाण्याची तयारी

व्हॅलेंटिना जेव्हा अंतराळात होत्या, तेव्हा त्या तीन दिवसांमध्ये पत्रकारांनी त्यांच्याबद्दल भरभरून लिहिलं. त्यामुळे त्या परत आल्या तेव्हा एअरपोर्टवर त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. पुढे त्यांनी रशियन आणि ग्लोबल काउंसिलच्या कित्येक प्रमुख पदांवर काम केलं.

सोव्हिएत संघ बरखास्त होण्यापूर्वी त्या राज्यातील एका अधिकारी पदावर कार्यरत होत्या. १९६६ मध्ये त्यांची विश्व शांती परिषदेच्या सदस्य म्हणून निवड झाली. सध्या ८६ वर्षांच्या असलेल्या व्हॅलेंटिना या रशियातील सरकारमध्ये कार्यरत आहेत. आजही आपली मंगळावर जाण्याची तयारी आहे, भले मग हा प्रवास एकतर्फी का असेना असं त्या म्हणतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 3rd Test: रिषभ पंत आर्चरचा लॉर्ड्सवर सामना करण्याबद्दल म्हणाला, 'तो परत येण्याचा मला...'

Video: मी इथेच आहे, तुझ्यासोबत! पत्नी आयसीयूमध्ये, पतीने हात धरला अन्...; वृद्ध जोडप्याचा व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

Viral Video: कसाबसा जीव वाचला! रस्त्याची पाहाणी करायला आलेल्या अभियंत्यासमोरच कोसळला ट्रक, जीव वाचवण्यासाठी लोकांची पळापळ

World Heritage status: शिवरायांच्या किल्ल्यांना 'युनेस्को'चा दर्जा मिळण्यास का लागतोय वेळ? गडांच्या व्यवस्थापनावर समितीने ठेवलं बोट

Mumbai News: जैन मंदिरावरील कारवाई योग्यच, उच्च न्यायालयाने ट्रस्टचे अपील फेटाळले

SCROLL FOR NEXT