ChatGPT esakal
विज्ञान-तंत्र

ChatGPT ला टक्कर द्यायला आलं आता Google Bard, समजून घ्या टेक्नोलॉजी

गुगलने आर्टीफिशीयल इंटेलिजेंसवर आधारीत चॅट सॉफ्टवेअर ChatGPT ला टक्कर देण्यासाठी डिझाइन करण्यात आलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

Google Bard AI : अमेरिकी टेक कंपनी गुगलने आर्टीफिशीयल इंटेलिजेंसवर आधारीत चॅट सॉफ्टवेअर Bard आणलं आहे. AI चॅटबॉट मायक्रोसॉफ्ट सपोर्ट वाल्या ChatGPT ला तोडीस तोड असणार आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये लाँच झालेल्या चॅटजीपीटी चॅटबॉटने संपूर्ण जगाला वेड लावलं. याच्या धोक्यापासून वाचण्यासाठी चॅटबॉट सर्व्हीस लाँच करण्याचं प्लॅनिंग केलं.

Google Bard AI हे गप्पा मारण्याचं चॅटबॉट आहे. जे LaMDA वर आधारीत आहे. याचा अर्थ आहे की, नवा चॅटबॉट गूगल च्या लँग्वेज मॉडल फॉर डायलॉग एप्लिकेशन सिस्टम वर काम करतो. जर याला कोणी काही प्रश्न विचारला तर माणसांसारखं उत्तर देईल. कंपनी मागच्या काही वर्षांपासूवन या लँग्वेज मॉडेलवर काम करत आहे.

एका ब्लॉग पोस्टमध्ये गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी म्हटलं आहे की, बार्ड एआय ला टेस्टिंगसाठी तयार केलं आहे. पुढच्या काही आठवड्यात हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचेल. ब्लॉगमध्ये पुढे सांगितलं आहे की, या सॉफ्टवेअरला इंटरनेटवर असलेल्या माहितीला फ्रेश आणि हायक्वालिटी रिस्पाँस देण्यासाठी बनवण्यात आला आहे.

ChatGPT प्रमाणे बार्डपण त्याच्या बेस लँग्वेज मॉडेलच्या लिमिटेड व्हर्जनवर उत्तर देईल. यामुळे कंप्युटिंग पॉवर कमी होईल आणि जास्तीत जास्त युझर्सपर्यंत हे पोहचू शकेल. फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार चॅटजीपीटीला स्टँडअलोन बेसिसवर प्रदान केलं जाील. याचा अर्थ ही सर्व्हीस एप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस यानी API च्या माध्यमातून मार्केटमध्ये येऊ शकेल.

तर बार्ड संदर्भात अशी कोणतीही माहिती नाही आलीये की, ते API सह येणार आहे. चॅटजीपीटी सामान्य युझर्ससाठी उपलब्ध आहे आणइ यूझर्स याचा मोफत वापर करू शकतात. तर गुगल बार्ड ठराविक लोकांसाठी आणि ट्रस्टेड टेस्टर्ससाठीच उपलब्ध करून देण्यात आलं आहे. चॅटजीपीटी प्लस व्हर्जनपण आलेलं आहे. यासाठी युझर्सना चार्ज द्यावा लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

Katraj Issues : सोपानकाकानगरमध्ये नागरी सुविधांचा अभाव, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी; तीन वर्षांपासून करत भरुनही महापालिकेचे दुर्लक्ष

Agriculture News : ऊस पिकावर हुमणीच्या प्रादुर्भावाचा धोका; कृषी विभागातर्फे प्रभावी उपाययोजना करण्याचे आवाहन

Women Empowerment: घरच नव्हे, गावही चालविणार! छप्पन्न गावांत लवकरच महिलाराज, १११ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर

IND vs ENG 2nd Test: हॅरी ब्रूकने 'खांद्या'ने वाचवली स्वतःची विकेट! लढवली अक्कल, पण झाला असता त्याचाच गेम; रिषभ पंत भडकला

SCROLL FOR NEXT