google pixel watch launched with ecg support and amoled display check price and all details  
विज्ञान-तंत्र

Google Pixel Watch: गुगलची पहिली पिक्सेल वॉच लॉंच; मिळणार अनेक दमदार फीचर्स

सकाळ डिजिटल टीम

नवीन Google Pixel 7 सीरीज स्मार्टफोनसह, कंपनीने 'Made by Google' इव्हेंटमध्ये आपली पहिली स्मार्टवॉच Google Pixel Watch देखील लॉन्च केले. विशेष बाब म्हणजे युजर्स वॉचद्वारे ईसीजी देखील मोजू शकतील. याची किंमत किती आहे आणि यामध्ये आणखी काय खास आहे, चला सविस्तर सर्व काही जाणून घेऊ..

इतर विशेष फीचर्स बद्दल बोलायचे झाल्यास, नवीन पिक्सेल वॉच Google Maps, गुगल वॉलेट, गुगल असिस्टंट, मेसेड आणि नोटिफीकेशन , यूट्यूब म्यूजीक, एमर्जंसी SOS आणि आंतरराष्ट्रीय आपत्कालीन कॉलिंग सारख्या फीचर्ससाठी सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच या वर्षाच्या शेवटी, त्यास नवीन फॉल डिटेक्शन फीचर देखील मिळेल. Google Pixel Watch मध्ये बेझल-लेस गोलाकार डायल आहे. यात 1,000 nits ब्राइटनेस आणि अलवेज ऑन मोडसह AMOLED डिस्प्ले दिला आहे.

Google Pixel Watch मध्ये काय खास आहे?

Google Pixel Watch स्मार्टवॉचमध्ये 1,000 nits ब्राइटनेससह AMOLED टच डिस्प्ले आहे. स्क्रीनची पिक्सेल घनता 320ppi आहे आणि त्यास अलवेज ऑन मोड देखील मिळतो. पिक्सेल वॉचच्या डिस्प्लेमध्ये गोलाकार डिझाइन आहे, जे 3D कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 सह देण्यात आले आहे. त्याची रचना पाण्याच्या थेंबापासून प्रेरित असल्याचे गुगलचे म्हणणे आहे. ही स्टेनलेस स्टील वॉच केससह येते, जे 80 टक्के रिसायकल स्टेनलेस स्टील वापरून बनवले जाते.

आरोग्य आणि फिटनेस फीचर्स बाबतीत, पिक्सेल वॉच कंपास, अल्टिमीटर, ब्लड-ऑक्सिजन सेन्सर, ऑप्टिकल हार्ट रेट सेन्सर आणि एक्सेलेरोमीटर, जायरोस्कोप आणि एम्बियंट लाइट सेन्सरसह अनेक सेन्सर यामध्ये देण्यात येतात. ECG देखील घड्याळाने मोजता येतो. तसेच यात Exynos 9110 चिपसेट, कॉर्टेक्स M33 कॉप्रोसेसर आणि 2GB RAM मिळते. हे Wear OS 3.5 वर चालते, ज्यात Google Assistant आणि Fitbit द्वारे हेल्थ आणि फिटनेस फीचर्स दिले आहेत.

पिक्सेल वॉच अनेक कनेक्टिव्हिटी पर्याय ऑफर करते जसे की ब्लूटूथ v5.0, 2.4GHz Wi-Fi, 4G LTE आणि NFC. हे स्मार्टवॉच Find My Device अॅपवरही काम करते. कंपनीचे म्हणणे आहे की 5ATM वॉटर रेसिस्टंट डिझाइनमुळे ते 50 मीटरपर्यंत पाण्याचा दाब सहन करू शकते. कंपनीचा दावा आहे की Pixel Watch 24 तासांपर्यंत बॅटरी लाइफ देते. हे USB-C मॅग्नेटीक चार्जिंग केबल सपोर्टसह 294mAh बॅटरी ऑफर करते. कंपनीचे म्हणणे आहे की घड्याळ 30 मिनिटांत 50% आणि 80 मिनिटांत 100% पर्यंत चार्ज होते.

Google Pixel Watch ची किंमत किती?

ब्लूटूथ आणि वाय-फाय ओनली मॉडेलसाठी Google पिक्सेल वॉचची किंमत $349.99 (अंदाजे रु. 28,700) पासून सुरू होते, तर ब्लूटूथ आणि वाय-फाय असलेल्या LTE मॉडेलची किंमत $399.99 (32,800 रुपये अंदाजे) आहे. वाय-फाय-ओनली मॉडेल ऑब्सिडियन, हेझेल आणि चाक रंगांमध्ये येते, तर सेल्युलर व्हेरियंट ऑब्सिडियन, हेझेल आणि चारकोल कलर पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. Google ने म्हटले आहे की ग्राहकांना पिक्सेल वॉचसह तीन महिन्यांचे YouTube प्रीमियम सब्सक्रिप्शन आणि सहा महिन्यांचे Fitbit प्रीमियम सब्सक्रिप्शन मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महापूजेसाठी विठ्ठल मंदिरात दाखल, थोड्याच वेळात महापूजेला होणार सुरुवात

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

SCROLL FOR NEXT