Google Search esakal
विज्ञान-तंत्र

Google Search : गुगलमध्ये होणार मोठा बदल, सर्च इंजिनला मिळणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सची जोड

गुगल सर्च इंजिन लवकरच मोठा बदल होणार

सकाळ डिजिटल टीम

Google Search : गुगल सर्च इंजिन लवकरच मोठा बदल होणार असून गुगल सर्च इंजिनला आर्टिफिशियल इंटेलिजन्सची जोड मिळणार आहे. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी याबाबत वक्तव्य केलं आहे. आता गुगल सर्च इंजिनमध्ये टाईप केलं तर चॅटजीपीटीसारखी उत्तरं मिळणार आहेत.

गुगल हे जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन आहे. गेल्या 20 वर्षांपासून प्रत्येक छोटी-मोठी माहिती मिळवण्यासाठी गुगल सर्चचा वापर केला जात आहे. यूएसमधील या टेक फर्मचा मुख्य व्यवसाय 'सर्च इंजिन' आहे आणि मूळ कंपनी अल्फाबेटच्या कमाईचा निम्मा वाटा याचा आहे.

दोन दशकांपासून सर्च इंजिन जगतात अधिराज्य गाजवणाऱ्या कंपनीपुढे ChatGpt मुळे नवं आव्हान निर्माण झालं होतं. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आधारित चॅटबॉट्स गुगलच्या सर्च इंजिन व्यवसायाला अडचणीत आणू शकतात. मात्र कंपनीने वेळीच हा धोका ओळखला.

द वॉल स्ट्रीट जर्नलने याबाबतचं वृत्त प्रकाशित केलं आहे. ChatGpt कडून तगडं आव्हान मिळाल्यानंतर गुगलने हे पाऊल उचलल्याचं बोललं जातंय. आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे वेगवेगळ्या प्रकारच्या शोधांना प्रतिसाद देण्याच्या गुगलच्या क्षमतेमध्ये वाढ होणार असल्याचं सुंदर पिचाई यांनी सांगितलंय. अलीकडेच कंपनीने Bard AI चॅटबॉट सादर केला होता. आता कंपनी ते गुगल सर्च इंजिनमध्ये जोडण्याची तयारी करत आहे.

मायक्रोसॉफ्टने देखील यावर्षाच्या सुरुवातीलाच आपल्या सर्चच इंजिन Bing मध्ये ChatGPT जोडून रिलॉन्च केलं होतं. यामुळे युझर्सना सर्चसोबतच चॅटबॉटचाही अनुभव मिळत आहे. यानंतर गुगलनेही मायक्रोसॉफ्ट आणि ChatGPT ला टक्कर देण्यासाठी BARD लॉन्च केलं. परंतु गुगलच्या या चॅटबोटला Bing एवढी लोकप्रियता मिळाली नाही. याचं मोठं कारण चॅटबोटची उपलब्धता हे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''सगळं लक्षात ठेवणार!'', राहुल-प्रियंका यांच्यासोबत गैरवर्तन झाल्याचा काँग्रेसचा आरोप; व्हिडीओ केला पोस्ट

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

Shirur Crime : जागेचा वाद विकोपाला! भाडोत्री शुटर्सनी जागा मालकाऐवजी त्याच्या कामगारालाच घातल्या गोळ्या, कामगाराचा घटनास्थळीच मृत्यु

SCROLL FOR NEXT