Google Doodle esakal
विज्ञान-तंत्र

Google Doodle : आजचे डूडल मनोरंजन जगतातील या जादूगाराच्या नावे, कोण होता अ‍ॅलन?

अॅलनला मनोरंजन क्षेत्रातील जादूगार म्हणून ओळखलं जायचं

सकाळ डिजिटल टीम

Google Doodle : आजचे स्पेशल डूडल इंग्लिश अभिनेता आणि दिग्दर्शक अ‍ॅलन रिकमच्या स्मरणार्थ खास क्रिएट करण्यात आलेय. अॅलनला मनोरंजन क्षेत्रातील जादूगार म्हणून ओळखलं जायचं. त्याने मनोरंजन क्षेत्रात जवळपास ४० वर्षे काम केले होते. जाणून घेऊया त्याच्या कारकीर्दीबाबत सविस्तर.

अॅलन सीडनी पॅट्रिक रिकमन हा इंग्लिश सिनेमा अभिनेता आणि दिग्दर्शक होता. त्यांने डाय हार्ड, रॉबिन हूड: प्रिन्स ऑफ थीव्स, ट्रूली, मॅडली, डीपली आणि हॅरी पॉटर यांसारख्या चित्रपटांसह ५० पेक्षा अधिक चित्रपटांत अभियन केला होता.

Google Doodle

अॅलन रिकमनने १८८७ मध्ये केलेल्या नाटकातील सादरीकरणानंतर त्याच्या सिनेमातील कारकीर्दीला नवं वळण मिळालं. गूगलने खुद्द त्याच्या कारकीर्दीबाबत लिहीले आहे. अॅलन डाय हार्ड, रिझर्वोअर डॉग्स आणि पल्प फिक्शन मधील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी देखील ओळखला जातो. (Google Doodle)

21 फेब्रुवारी 1946 रोजी जन्मलेला, अॅलन रिकमन हा नैसर्गिक चित्रकार होता. त्याच्या शाळेतील शिक्षक आणि कुटुंबाकडून प्रोत्साहन मिळाल्यानंतर त्यांने विविध कला प्रकारांमध्ये रस निर्माण केला. त्याने अभिनयासाठीदेखील विशेष रुची निर्माण केली आणि लंडनमधील लेटिमर अप्पर स्कूलमध्ये त्याच्या कलेच्या जोरावर शिष्यवृत्तीदेखील मिळवली. (Hollywood)

डाय हार्ड चित्रपटातील क्रिमिनल हंस ग्रुबरसारख्या त्याच्या बहुतेक अँटी-हिरो भूमिकांमुळे अॅलन रिकमनला प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटातील भूमिकेसाठी अभिनेता अनेक दशकांपासून लक्षात राहिला आहे. नंतर, तो 'रॉबिन हूड: प्रिन्स ऑफ थीव्ह्ज' सारख्या चित्रपटांमध्ये इतर विरोधी भूमिका साकारण्यासाठी पुढे गेला. सेन्स अँड सेन्सिबिलिटी (1995) आणि रास्पुतिन: डार्क सर्व्हंट ऑफ डेस्टिनी (1996) मध्ये देखील त्याने काम केले होते. अभिनयाव्यतिरिक्त, तो त्याच्या परोपकारासाठी आणि दयाळू-संवेदनशील स्वभावासाठी देखील लक्षात ठेवला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Election : कोल्हापूर–इचलकरंजी महापालिकेत महायुतीवर शिक्कामोर्तब; भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र, निवडणूकची रणधुमाळी सुरू

D-Mart ची ऑफर खरी वाटली, पण अभिनेत्याला कळलंच नाही अन् खातं रिकामं झालं, वाचा नाहीतर तुमचा खिसाही होईल रिकामा

CM Yogi Adityanath: गोरखपूरला नव्या ओव्हरब्रिजची भेट! १३७.८३ कोटींच्या प्रकल्पाचे लोकार्पण; सीएम योगींचा विरोधकांवर घणाघात

Putrda Ekadashi 2025: वर्षाच्या शेवटच्या एकादशीला, 'या' राशीच्या लोकांचे भाग्य होईल उज्वल, सुखसोयी वाढतील

Kolhapur Crime News : हुपरीत मुलानेच आई-वडिलांचा खून करण्याचं खर कारण आलं समोर, पहाटे पाणी भरत असलेल्या निरागस आईच्या गळ्यावर काच मारली अन्

SCROLL FOR NEXT