Public warned about fraud number series via Chakshu portal India esakal
विज्ञान-तंत्र

VoIP Calls : अलर्ट! चुकूनही उचलू नका 'या' 2 नंबरवरून आलेले कॉल, नाहीतर मिनिटांत हॅक होईल मोबाईल

Government issues alert on VoIP scam calls in India : सरकारने काही विशेष नंबरच्या सिरिजवरून येणाऱ्या VoIP कॉल्सपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. या कॉल्स स्कॅमरकडून येत असून त्यांची तक्रार ‘चक्षु’ पोर्टलवर नोंदवता येते.

Saisimran Ghashi

  • काही विशेष सिरीजने सुरू होणारे VoIP कॉल्स स्कॅमरकडून येण्याची शक्यता असते.

  • अशा कॉल्सवर वैयक्तिक माहिती देऊ नका आणि त्यांना त्वरित रिपोर्ट करा.

  • सरकारच्या ‘चक्षु’ पोर्टलद्वारे अशा फसवणुकीची तक्रार नोंदवता येते.

नागरिकांची फसवणूक करणाऱ्या ऑनलाइन स्कॅमर्सच्या कारवायांना आळा घालण्यासाठी सरकार सतत उपाययोजना करत आहे. मात्र तरीही सायबर गुन्हेगार नवनवीन पद्धतीने लोकांना जाळ्यात ओढत आहेत. आता हे फसवे कॉल इंटरनेटवर आधारित VoIP (Voice over Internet Protocol) द्वारे येत असून या कॉलपासून सावध राहण्याचं आवाहन केंद्र सरकारकडून करण्यात आलं आहे.

VoIP कॉल्सद्वारे स्कॅमचा नवा प्रकार

VoIP कॉल म्हणजे इंटरनेट वापरून करण्यात येणारे कॉल. हे कॉल जास्त करून +697 किंवा +698 ने सुरू होतात आणि यामधून सायबर गुन्हेगार विविध बहाण्याने लोकांची वैयक्तिक व आर्थिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतात. थायलंडच्या दूरसंचार विभागाच्या अहवालानुसार अशा कॉल्सचा वापर विशेषतः फसवणुकीसाठी केला जातो.

हे कॉल ट्रेस करणे कठीण असल्यामुळे सायबर गुन्हेगार VPN वापरून आपली ओळख लपवतात आणि तुम्हाला बँक प्रतिनिधी, सरकारी अधिकारी किंवा पोलिस असल्याचं भासवून माहिती विचारतात. ही एक फसवणुकीची मोठी जाळं असून, नागरिकांनी त्वरित सतर्क राहणे गरजेचे आहे.

कॉल आल्यास काय करावे?

  • +697 किंवा +698 ने सुरू होणारे कोणतेही आंतरराष्ट्रीय कॉल उचलू नका.

  • चुकून कॉल घेतल्यास व्यक्तिगत माहिती कधीही शेअर करू नका.

  • जर समोरची व्यक्ती बँक किंवा सरकारचं प्रतिनिधित्व करत असल्याचं सांगत असेल, तर त्यानं मागितलेल्या माहितीला प्रतिसाद देण्याऐवजी त्यांचा रीतसर कॉलबॅक नंबर मागा.

  • कॉलबॅक नंबर देण्यास टाळाटाळ केली गेल्यास तो स्कॅम कॉल असण्याची शक्यता प्रबळ असते.

  • असे कॉल नंबर ब्लॉक करा आणि लगेच रिपोर्ट करा.

'चक्षु' पोर्टल

सायबर फसवणूक टाळण्यासाठी "चक्षु" नावाचा एक खास पोर्टल सरकारने सुरू केला आहे. Sanchar Saathi या वेबसाइटवर गेल्यानंतर "चक्षु" पोर्टलवर अशा कॉल्स व मेसेजेसची नोंद करता येते.

सरकारने यासाठी एक विशेष मोबाईल अ‍ॅप देखील विकसित केलं आहे ज्याद्वारे काही सेकंदांतच फसवणूक करणाऱ्या कॉल्सची माहिती अधिकृतरीत्या सरकारपर्यंत पोहचवता येते.

TRAI (भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण) ने गेल्या वर्षी एक धोरण लागू केलं आहे ज्यामध्ये बनावट कॉल्स आणि फसवणूक करणारे मेसेजेस नेटवर्क स्तरावरच ब्लॉक करण्याची सोय आहे. Airtel सारख्या टेलिकॉम कंपन्यांनी AI आधारित प्रणालींचा वापर करून दर महिन्याला कोट्यवधी फसवणूक कॉल्स ब्लॉक केल्याचे उघड केले आहे.

FAQs

Q1: VoIP कॉल म्हणजे काय?
A1: इंटरनेटच्या माध्यमातून होणारे कॉल्स म्हणजे VoIP कॉल्स जे स्कॅमर वापरतात.

Q2: अशा कॉल्स कोणत्या क्रमांकावरून येतात?
A2: सहसा हे कॉल +697 किंवा +698 ने सुरू होणाऱ्या क्रमांकावरून येतात.

Q3: असे कॉल आल्यास काय करावे?
A3: कॉल उचलू नका, उचलल्यास माहिती देऊ नका, नंबर ब्लॉक करा आणि ‘चक्षु’ पोर्टलवर तक्रार नोंदवा.

Q4: चक्षु पोर्टलवर तक्रार कशी नोंदवावी?
A4: Sanchar Saathi वेबसाइटवर जाऊन चक्षु पोर्टलमध्ये दिलेल्या सूचनांनुसार नंबर व कॉलची माहिती भरून सबमिट करा.

Q5: सरकार किंवा बँक अधिकाऱ्यांची ओळख पटवायची असल्यास काय करावे?
A5: त्यांना थेट कॉलबॅक नंबर मागा; तो न दिल्यास कॉल बनावट असल्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nandani Elephant Emotional : तळ हाताच्या फोडासारखे जपलेल्या हत्तीणीला निरोप देताना महाराजांचे कंठ दाटले, महिलांना अश्रू अनावर; कधीच आयुष्यात विसरणार नाही...

Baramati Accident: ''माझ्या मुलींना कुणीतरी वाचवा..'' पोटावरुन चाक गेलेल्या बापाची अखेरची आर्त हाक; २४ तासात एकाच कुटुंबाने गमावले चार जण

Pune IT Engineer Death: खळबळजनक! पुण्यात तरूण IT अभियंत्याने कंपनीतच उचललं टोकाचं पाऊल; भर मिटींगमधून उठला अन्...

Election: ठाकरे बंधूंना रोखण्यासाठी महायुतीची मोठी योजना! महापालिका निवडणुकीपूर्वी मोठं पाऊल उचललं, 'हे' नवं धोरण राबवलं

Latest Maharashtra News Updates: आज राज्यात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT