सिम बंद होणार असल्याचा बहाणा करून नागरिकांची फसवणूक केली जात आहे.
दूरसंचार विभागाने अशा कॉल्स व मेसेजेसकडे दुर्लक्ष करण्याचं आवाहन केलं आहे.
नवीन सिम अॅक्टिवेशनसाठी बायोमेट्रिक व २४ तासांचा SMS लॉक लागू करण्यात आला आहे.
सध्या नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे, कारण सध्या देशभरात सिम कार्ड बंद होणार असल्याच्या बहाण्याने मोठ्या प्रमाणावर सायबर फसवणूक सुरू आहे. दूरसंचार विभागाने (Department of Telecommunications) यासंदर्भात जनतेला सावध राहण्याचं आवाहन केलं असून, ‘सिम स्वॅप फसवणूक’ (SIM Swap Fraud) टाळण्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत.
या फसवणुकीत गुन्हेगार स्वत:ला टेलिकॉम कंपनी किंवा ट्राय (TRAI) चा अधिकारी असल्याचं भासवतात. नागरिकांना कॉल करून सांगतात की, त्यांचं सिम कार्ड बंद होणार आहे किंवा त्यात त्रुटी आहेत. मग ते KYC अपडेट करण्याच्या बहाण्याने वैयक्तिक माहिती मागतात किंवा एखाद्या लिंकवर क्लिक करायला सांगतात.
सध्या बँक व्यवहार, सोशल मीडिया लॉगिन यासाठी OTP (वन टाईम पासवर्ड) आवश्यक असतो. फसवणूक करणारे व्यक्ती आपल्या मोबाईल क्रमांकाशी संबंधित नवीन सिम कार्ड मिळवतात. यासाठी ते सोशल इंजिनीअरिंगचा वापर करून ग्राहकाची फसवणूक करतात. एकदा का नवीन सिम अॅक्टिवेट झालं की, OTP त्यांच्याकडे येतो आणि मग बँक खात्यातून पैसे काढणे, सोशल मीडिया हॅक करणे असे प्रकार घडतात.
दूरसंचार विभागाने सिम कार्ड संबंधित नियम अधिक कठोर केले आहेत
नवीन सिम जारी करण्यासाठी बायोमेट्रिक पडताळणी आवश्यक आहे.
नवीन सिम सुरू झाल्यानंतर २४ तासांपर्यंत त्यावर कोणतेही SMS येणार नाहीत.
हे बदल सायबर फसवणूक थांबवण्यासाठी केले आहेत, परंतु तरीही नागरिकांनी स्वतःची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
अनोळखी क्रमांकावरून आलेले कॉल्स आणि मेसेजेसकडे दुर्लक्ष करा.
कोणीही KYC अपडेटसाठी लिंक पाठवली तर त्यावर क्लिक करू नका.
कोणताही संशयास्पद मेसेज, कॉल किंवा ईमेल आल्यास DoT च्या अधिकृत पोर्टलवर तक्रार नोंदवा.
सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती फक्त आपल्या विश्वासू मित्र आणि कुटुंबीयांसोबतच शेअर करा.
लॉटरी, इनाम, बक्षीस असे आकर्षक दावे करणाऱ्या मेसेजेसपासून दूर राहा.
मोबाईलवर फ्रॉड मेसेज अलर्टची सेटिंग सुरू करून घ्या
तुमच्या एका चुकीच्या क्लिकमुळे तुमचं बँक खातं, सोशल मीडिया आणि वैयक्तिक माहिती धोक्यात येऊ शकते. त्यामुळे प्रत्येक फोन कॉल, मेसेज, लिंक याकडे शंका घेऊन बघा आणि कोणतीही वैयक्तिक माहिती देण्याआधी खात्री करा.
तक्रार नोंदवण्यासाठी ही लिंक आणि हेल्पलाइन नंबर आहे
हेल्पलाइन नंबर : 1930
1. सिम स्वॅप फसवणूक म्हणजे काय?
सिम स्वॅप फसवणुकीत फसवणूक करणारे तुमच्या मोबाईल नंबरवर नवीन सिम अॅक्टिवेट करून OTP चा वापर करून बँक किंवा सोशल मीडिया हॅक करतात.
2. बनावट कॉल ओळखायचा कसा?
जर कोणी सिम बंद होणार असल्याचं सांगून KYC किंवा वैयक्तिक माहिती मागत असेल, तर तो कॉल बनावट आहे.
3. संशयास्पद मेसेज किंवा कॉल आल्यास काय करावं?
असे कॉल किंवा मेसेजकडे दुर्लक्ष करा आणि www.sancharsaathi.gov.in या संकेतस्थळावर किंवा 1930 या क्रमांकावर तक्रार करा.
4. सरकारने कोणते सुरक्षा उपाय केले आहेत?
आता नवीन सिमसाठी बायोमेट्रिक पडताळणी आवश्यक आहे आणि सिम सुरू झाल्यावर २४ तास incoming SMS बंद राहणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.