esakal
विज्ञान-तंत्र

Cyber Dost Alert : फोन कॉल दरम्यान इंटरनेट चालू ठेवणे धोकादायक; हॅक होऊ शकतो तुमचा मोबाईल, पाहा व्हिडिओ

फोन कॉल करताना इंटरनेट सुरू ठेवणे धोकादायक ठरू शकते, असा इशारा सायबर दोस्तकडून देण्यात आला आहे. यासोबतच TRAI लवकरच इमारतींसाठी डिजिटल कनेक्टिव्हिटी रेटिंग सुरू करणार आहे.

Saisimran Ghashi

भारतातील मोबाईल युजर्ससाठी एक महत्वाचा आणि चिंताजनक इशारा सरकारने नुकताच जारी केला आहे. गृहमंत्रालयाच्या अखत्यारितील Indian Cybercrime Coordination Centre (I4C) च्या अधिकृत Cyber Dost हँडलद्वारे हा इशारा देण्यात आला आहे. या इशाऱ्यानुसार, फोन कॉल करत असताना इंटरनेट सुरू ठेवणे धोकादायक ठरू शकते, कारण यामुळे तुमच्या मोबाइलमधील काही अ‍ॅप्स तुमच्या संभाषणावर "ऐकण्याचा" प्रयत्न करू शकतात.

फोन करताना इंटरनेट का बंद ठेवावं?

सायबर दोस्तच्या मते, जेव्हा वापरकर्ता कॉल दरम्यान इंटरनेट ऑन ठेवतो, तेव्हा काही अ‍ॅप्सना मायक्रोफोनचा अ‍ॅक्सेस मिळतो आणि ते कॉल दरम्यानचे संवाद ऐकू शकतात. विशेषतः काही सायबर फसवणुकीच्या घटना लक्षात घेता, हे एक गंभीर सायबर सुरक्षेचे धोरण ठरू शकते.

एक पोलिस अधिकारी या संदर्भातील व्हिडिओमध्ये सांगतो की, वापरकर्त्यांनी त्यांच्या डिव्हाईसमधील मायक्रोफोन कोणत्या अ‍ॅप्सकडे आहे हे तपासणे गरजेचे आहे. Chrome ब्राउजरमधून हे पाहण्यासाठी-

  • Chrome उघडा

  • उजवीकडील तीन डॉट (menu) वर क्लिक करा

  • Settings > Site Settings > Microphone येथे जा

पण प्रत्यक्षात, हे तपासण्यासाठी डिव्हाईसच्या मुख्य Settings > Privacy > Permission Manager मध्ये जाऊन, मायक्रोफोन आणि कॅमेऱ्याचा अ‍ॅक्सेस कोणत्या अ‍ॅप्सकडे आहे हे तपासता येते. वापरकर्ते त्या अ‍ॅपवर क्लिक करून परवानग्या कमी-जास्त करू शकतात.

TRAI कडून डिजिटल कनेक्टिव्हिटीसाठी नवीन ‘स्टार रेटिंग’ प्रणाली

दुसऱ्या महत्वाच्या घोषणेमध्ये, दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने असे सांगितले आहे की देशात लवकरच इमारतींच्या डिजिटल कनेक्टिव्हिटीसाठी एक नवीन रेटिंग प्रणाली सुरू होणार आहे. पाच कंपन्यांनी या उपक्रमात सहभागी होण्यासाठी स्वारस्य दाखवले आहे.

या रेटिंग सिस्टममध्ये नवीन आणि जुन्या इमारतींचा समावेश केला जाईल. TRAI चे चेअरमन अनिल कुमार लाहोटी यांनी सांगितले की, ही रेटिंग प्रणाली लवकरच सुरू होईल आणि याच महिन्यात काही इमारतींचे पहिले रेटिंग जाहीर होण्याची शक्यता आहे. या स्टार रेटिंग सिस्टमचा उपयोग बिल्डर व ग्राहक यांना इमारतींच्या डिजिटल गुणवत्ता समजून घेण्यासाठी होईल.

तुमच्या डिजिटल सुरक्षेची जबाबदारी ही आता तुमच्याच हाती आहे! सुरक्षित राहा, सतर्क राहा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray visits Meenatai Thackeray statue : उद्धव ठाकरेंनी केली मीनाताईंच्या पुतळ्याची बारकाईने पाहणी अन् म्हणाले ‘’या मागे दोनच व्यक्ती…’’

World Athletics Championships : नीरज चोप्राने एकाच प्रयत्नात केले सर्वांना गार, आता पाकिस्तानच्या अर्शद नदीमच्या कामगिरीकडे लक्ष

Uddhav Nimse : मुंबई हायकोर्टाकडूनही जामीन नाकारला: उद्धव निमसे अखेर पोलिसांपुढे शरण

Navratra and Overthinking Tips: मन गोंधळले असेल तर नवरात्रीचे ९ दिवस देतील नवा आधार! अशी करू शकता ओव्हरथिंकिंगवर मात

Jalaj Sharma : जिल्हाधिकारी जलज शर्मांची मोठी घोषणा: नाशिकमधील गड-किल्ले होणार स्वच्छ

SCROLL FOR NEXT