Mobile Hacked
Mobile Hacked  esakal
विज्ञान-तंत्र

Mobile Hacked : आयुष्यभराची मेहनत जाऊ शकते पाण्यात; हे ५ संकेत देतील हॅक केल्याची माहिती

Lina Joshi

Mobile Hacked : आजच जग डिजिटलच आहे, या डिजिटल जगात, फोटो क्लिक करण्यापासून पेमेंट करण्यापर्यंत, आपण आपल्या स्मार्टफोनवरुन सर्वकाही करतो.

अशा परिस्थितीत, ऑनलाइन बँकिंग आणि सोशल मीडियाच्या वापरादरम्यान, हॅकिंग आणि डेटा लीकचा मोठा धोका असतो. आपल्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपपेक्षा स्मार्टफोन हॅक करणं हॅकर्ससाठी खूप सोप आहे.

अनेक रिसर्च आणि ऍपलच्या दाव्यानुसार ऍपलच्या आयओएसमध्ये अँड्रॉइडपेक्षा जास्त सिक्युरिटी उपलब्ध आहे, पण याचा अर्थ आयफोन हॅक होऊ शकत नाही असे नाही.

पण तुलनेने Android फोन हॅक करणे सोपे आहे. तुम्हालाही तुमच्या फोनमध्ये ही पाच चिन्हे दिसत असतील तर तुमचा फोन हॅक होण्याची दाट शक्यता आहे.

आज आम्ही तुम्हाला काही चिन्हे सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुमचा फोन हॅक झाला आहे की नाही हे तुम्ही सहज शोधू शकाल. यासह, आम्ही तुम्हाला प्रतिबंध करण्याच्या पद्धती देखील सांगू.

आपोआप फोन शटडाउन किंवा रिस्टार्ट होणे

जर तुमचा फोन आपोआप स्विचऑफ होत असेल किंवा रिस्टार्ट होत असेल तर याचा अर्थ तो हॅक झाला आहे. तुमची सिस्टीम हॅकर्सच्या हातात आहे हे समजून घ्या.

याशिवाय, जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या फोन आणि कॉम्प्युटरची सेटिंग्ज आपोआप बदलली आहे, तर सावधान. याचा अर्थ हॅकर्सना तुमच्या सिस्टममध्ये खेळ करायला सुरुवात केली आहे. डाउनलोड केलेली फाईल ताबडतोब तपासा किंवा फोन त्वरित फॉरमॅट करा.

बँकिंग ट्रान्झॅक्शन

फोन हॅक होण्याचे सर्वात मोठे लक्षण म्हणजे तुम्हाला ट्रान्झॅक्शन मेसेज मिळू लागतात. बर्‍याच वेळा असे घडते की तुम्ही न घेतलेल्या उत्पादनांच्या खरेदीचे आणि व्यवहाराचे मेसेज तुम्हाला मिळू लागतात.

याचा अर्थ असा की कोणीतरी तुमचे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड किंवा बँकिंग तपशील ताब्यात घेतले आहेत. असे झाल्यास ताबडतोब बँकेची मदत घ्या आणि खात्यातून व्यवहार बंद करा.

फोन अचानक हॅंग होणे

तुमचा स्मार्टफोन अचानक खूप स्लो चालत असेल किंवा हॅंग होत असेल तर काळजी घ्या. बर्‍याच वेळा हॅकर्स बिटकॉइन्स करण्यासाठी तुमची सिस्टिम वापरता आहेत.

याशिवाय इंटरनेटचा स्पीड चांगला असतानाही फोनवर व्हिडिओ स्लो चालत असेल किंवा तुमचा डेटा जास्त वापरला जात असेल तर काळजी घेण्याची गरज आहे.

अँटीव्हायरस बंद

फोन हॅक करण्यासाठी हॅकर्स कधीकधी अँटी व्हायरस आणि सेफ्टी सॉफ्टवेअर बंद करतात. तुमचा अँटी व्हायरस काम करत नसल्याची शंका आली तर त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

याशिवाय, नेहमी तुमचा ब्राउझर तपासत रहा, कारण तुमच्या ब्राउझरमध्ये एखादे एक्स्टेंशन आहे आणि ते तुमच्या व्यवहारांवर लक्ष ठेवत आहे.

बर्‍याच वेळा वेबसाईटच्या माध्यमातून काही एक्स्टेंशन किंवा सॉफ्टवेअर सिस्टममध्ये येतात आणि त्याद्वारे हॅकर्स तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात. हे टाळण्यासाठी थर्ड पार्टी अॅप्लिकेशन वापरणे टाळा.

बॅटरी लवकर डेड होणे

जर तुमच्या फोनची बॅटरी अचानक लवकर संपत असेल तर तुम्ही सावध होण्याची गरज आहे. कारण हॅकर्सनी तुमच्या फोनमध्ये व्हायरस टाकलेला असून तो बॅकग्राउंडमध्ये काम करतो परिणामी तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Atala Masjid: भिंतीवर त्रिशूळ, फुले? जौनपूरमधील अटाला मंदीर की मशीद? हिंदुंनी गाठलं कोर्ट, काय आहे संपूर्ण प्रकरण

Chhagan Bhujbal: "काँग्रेस मला मुख्यमंत्रीपद देण्यास तयार होती, मात्र मी..."; भुजबळांची शरद पवारांच्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया

Soni Razdan: आलिया भट्टच्या आईसोबत फसवणुकीचा प्रयत्न; म्हणाल्या, "त्यांनी मला फोन केला आणि..."

RCB vs CSK : आरसीबीपाठोपाठ जिओ सिनेमाचीही बल्ले-बल्ले, मिळाली छप्पर फाड के व्ह्युवरशिप; सगळे रेकॉर्ड ब्रेक

गोफण | 'बिनशर्त'ची सुपारी दणक्यात वाजली!

SCROLL FOR NEXT