Honda launches CB300R
Honda launches CB300R 
विज्ञान-तंत्र

होंडाने भारतात लॉन्च केली नवीन CB300R, जाणून घ्या काय आहेत फीचर्स

सकाळ डिजिटल टीम

Honda motorcycle launches new CB300R : होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया (HMSI) ने आज 2022 CB300R मोटरसायकल भारतात लॉन्च केली आहे. Honda ने यापूर्वी इंडिया बाइक वीकमध्ये या निओ-स्पोर्ट्स कॅफे प्रेरित 2022 CB300R चे अनावरण केले होते. CB300R मध्ये PGM-FI टेक्नॉलॉजीसह भारत स्टेज VI कंप्लायंट 286cc DOHC 4-वाल्व्ह लिक्विड कूल्ड सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे.

किंमत आणि बुकिंग

नवीन CB300R दोन कलर ऑप्शन्समध्ये येईल, मॅट स्टील ब्लॅक आणि पर्ल स्पार्टन रेड, तर या गाडीचा किंमत 2.77 लाख रुपये आहे. नवीन CB300R चे बुकिंग आजपासून Honda च्या विशेष प्रीमियम बिगविंग आणि बिगविंग टॉपलाइन डीलरशिप्सवर सुरु झाले आहे.

या बाइकमध्ये फ्रंट ब्रेकसाठी 296 मिमी हब-लेस फ्लोटिंग डिस्क आणि 220 मिमी मागील डिस्क ब्रेकसह 4-पॉट रेडियल-माउंटेड कॅलिपर डबल चॅनेल ABS सह मॉडिफाइड केले आहेत. Honda Motorcycle & Scooter India चे व्यवस्थापकीय संचालक, अध्यक्ष आणि CEO अत्सुशी ओगाटा यांनी सांगीतले की आमच्या ग्राहकांप्रती Honda चा आत्मविश्वास आणि वचनबद्धता कायम ठेवत, आम्ही 2022 CB300R घेऊन आलो आहोत. तिची अप्रतिम फीचर्स आणि डायनामिक रोड प्रजेन्समुळे आम्हाला खात्री आहे की ही नवीन CB300R आवडेल.

KTM 250 Adventure लाँच

KTM ने आपली नवीन बाईक KTM 250 Adventure लॉन्च केली आहे. भारतात या Adventure बाईकची किंमत 2,35,000 रुपये आहे. लॉन्च झाल्यानंतर त्याचे बुकिंग देखील चालू आहे, तुम्ही जवळच्या KTM शोरूमला भेट देऊन ते बुक करू शकता आणि ते 6300 रुपये प्रति महिना EMI ऑप्सनसह खरेदी करू शकता. KTM 250 Adventure ही KTM 390 Adventure सारख्याच प्लॅटफॉर्मवर तयार केले आहे.

इंजिन

KTM 250 Adventure हे 248-cc DOHC चार-वाल्व्ह सिंगल सिलेंडर लिक्विड कूल्ड इंजिन दिले आहे जे 30PS पॉवर आणि 24Nm टॉर्क जनरेट करते. 2022 KTM 250 Adventure दोन कलर ऑप्शन्ससह येते ज्यात KTM इलेक्ट्रॉनिक ऑरेंज आणि KTM फॅक्टरी रेसिंग ब्लू यांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : व्यंकटेश अय्यर - मनिष पांडेने केकेआरचा डाव सावरला; 15 षटकात मारून दिली चांगली मजल

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

Latest Marathi News Live Update : जीएसटी फक्त अदानींच्या फायद्याचा- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT