Aadhar link to Sim card
Aadhar link to Sim card 
विज्ञान-तंत्र

तुमच्या आधारकार्डवर किती लोकांनी घेतले सिम कार्ड? असे करा Check

शरयू काकडे

पुणे : आधार कार्ड हे आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचे कागदपत्र आहे ज्याशिवाय आपले काहीच काम होऊ शकत नाही. एका आधार कार्डसोबत 18 फोन कनेक्शन करता येतात. त्यामुळे तुम्हाला तुमच्या आधार नंबरसोबत कोणी दुसऱ्या व्यक्तीने फोन कनेक्शन केले असेल तर तुम्हाला ही माहिती सहज उपलब्ध होऊ शकते. तुम्ही घरबसल्या हे काम सहज करु शकता.

सुरवातीला एका आधारसोबत 9 सीमकार्ड खरेदी करता येत होते आता मात्र 18 सिम खेरदी करता येतात. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (Telecom Regulatory Authority of India) नुसार केलेल्या बदलांनुसार तुम्ही एका आधारवर 18 सिम खरेदी करु शकता. TRAIने दिलेल्या माहितीनुसार कित्येक लोक बिझनेससाठी जास्ती सिम कार्डची गरज असते त्यामुळे ही लिमिट वाढविण्यात आली आहे. आधार कार्ड किती नंबरसोबत लिंक आहे हे जाणून घेण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डसोबत लिंक केला पाहिजे.

तुमच्या आधारसोबत किती क्रमांक नोंदणीकृत आहेत असे शोधा

  • तुम्हाला UIDAI च्या ऑफिशअल वेबसाईटवर भेट द्यावी लागेल

  • होम पेजवर जाऊन Get Aadhaar क्लिक करा

  • त्यानंतर Download Aadhaar वर क्लिक करा

  • तिथे View More ऑप्शन वर क्लिक करा

  • त्यानंतर Aadhaar Online Service वर जाऊन Aadhaar Authentication History वर क्लिक करा

  • त्यानंतर Where can a resident chech/ Aadhaar Authentication History वर जाऊन दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

  • आता नवीन पेज ओपन झाल्यावर तिथे आधार नंबर टाका आणि कॅपचा एंटर करुन ओटीपवर क्लिक करा.

  • आता Authentication Type वर All सिलेक्ट करा.

  • आता तुम्ही कधी पासून कधी पर्यंत बघायचे आहे तशी तारीख टाकू शकता

  • आता तुम्हाला किती रेकॉर्ड पाहायचे आहे ते एंटर करा. तिथे ओटीप टाकून व्हेरीफाय ओटीपीवर क्लिक करा

  • तुमच्या समोर नवीन इंटरफेस उघडेल

  • येथून तुम्ही नवीन डिटेल्स मिळवू शकता

मोबाईल नंबर सोबत आधार कसे लिंक करायचे?

मोबाईल नंबर आणि इमेल आयडीवर जर तुम्ही आधारवर लिंक करणार असाल तर त्यासाठी तुम्ही आधार सेंटर जावे लागेल. ऑनलाईन आप लिंक नाही करु शकत. आधार लिंक करण्यासाठी कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही. त्यासाठी तुम्हाला बायोमॅट्रीक ऑथिटींकेशन बंधनकारक आहे.

असे करा मोबाईल नंबर सोबत आधार लिंक

  • तुम्हाला तुमच्या टेलीकॉम ऑपरेटरच्या आउटलेटवर आधार कार्डच्या अटेस्टेड कॉपी घेऊन जावे लागेल.

  • ऑपरटेलला तुमचा मोबाईल नंबर द्या.

  • तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर स्टोअर एक्सिक्युटीव्ह एक ओटीपी पाठवतील. तो ओटीपी व्हेरीफिकेशनसाठी तुम्हाला एक्सुक्युटीव्हला सांगावा लागेल.

  • त्यानंतर एक्सुक्युटिव्ह तुमच्या बोटांचे ठसे घेईल आणि टेलकॉम ऑपरेटर तुम्हाला कन्फर्मेशन SMS पाठवतील

  • SMS चे उत्तर Y लिहून पाठवा. असे केल्यानंतर तुम्हाला EYC प्रोसेस पुर्ण होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT