How to Change Address in Voter ID 
विज्ञान-तंत्र

तुमच्या मतदार ओळखपत्रातील पत्ता घरी बसून कसा बदलावा? जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

How to Change Address in Voter ID : मतदार ओळखपत्र हे सरकारद्वारे जारी केलेल्या सर्वात महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. हे भारतीय निवडणूक आयोगाने जारी केलेले निवडणूक कार्ड म्हणूनही ओळखले जाते. अनेक इतर कारणांसाठी हे ओळख, पत्ता आणि वयाचा पुरावा म्हणून देखील काम करते.

देशात सतत कुठल्यातरी निवडणुकांची (Elections) रणधुमाळी सुरूच असते, नुकतेच 5 राज्यांतील निवडणुकांच्या तारखा देखील जाहीर झाल्या आहेत. तुमच्या भागात आगामी काळात निवडणूकीत मतदान करण्यासाठी तुमच्याकडे मतदार ओळखपत्र (Voter ID) असणे अत्यंत आवश्यक आहे. मतदार ओळखपत्रातील तुमचा पत्ता जर चुकीचा असेल तर काय, तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. पण त्याचे टेन्शन घेण्याची अजिबात गरज नाही, कारण आपण Voter Id मधील पत्ता बदलण्याची ऑनलाइन पद्धत जाणून घेणार आहोत जी अगदी सोपी आहे. चला तर मग जाणून घेऊया मतदार ओळखपत्रातील पत्ता कसा बदलता येईल..

मतदार आयडीमध्ये पत्ता बदला (Process to Change Address in Voter ID)

1. सर्वप्रथम तुम्हाला www.nvsp.in या राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल (National Voters Service Portal) वर लॉग इन किंवा रजिस्टर करावी लागेल.

2. लॉगिन केल्यानंतर, तुम्हाला‘Correction of entries in electoral roll’ सेक्शनमध्ये जावे लागेल.

3. यानंतर एक नवीन पेज उघडेल आणि तुम्हाला फॉर्म 8 दिसेल, ज्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल. क्लिक केल्यावर, तुम्हाला मतदार ओळखपत्रातील दुरुस्तीचा पर्याय दिसेल.

4. खाली विचारलेली माहिती फॉर्ममध्ये भरावी लागेल, ज्यामध्ये राज्य, विधानसभा किंवा संसदीय मतदारसंघाची माहिती असेल. याशिवाय मतदार यादी क्रमांक, लिंग, कुटुंबातील आई-वडील किंवा पती यांचा तपशील भरून तुमचा पत्ताही भरा.

5. ही माहिती दिल्यानंतर तुम्हाला काही कागदपत्रे अपलोड करावी लागतील. पत्ता पुरावा म्हणून आधार किंवा ड्रायव्हिंग लायसेंस देता येईल.

6. हे पूर्ण होताच, आता तुम्हाला जी काही माहिती दुरुस्ती किंवा बदलायची असेल त्यावर क्लीक करावे लागेल. पत्ता बदलण्यासाठी पत्ता टॅब वर क्लिक करा आणि पत्ता बदला. आता तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर किंवा ईमेल अॅड्रेस सबमिट करावा लागेल. व्हेरिफिकेशननंतर लवकरच तुमचे मतदार ओळखपत्र घरी पाठवले जाईल.

7. तुम्ही पत्ता, नाव किंवा इतर कोणतीही माहिती बदलल्यास तुम्हाला संदर्भ क्रमांक देखील मिळेल. ज्याद्वारे तुम्ही तुमच्या मतदार कार्डाचे स्टेटस जाणून घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Navy Sailor Family Death: नौदलाच्या खलाशासह पत्नी अन् २ मुलांचे मृतदेह आढळल्यानं खळबळ, २ महिन्यांच्या चिमुकल्याचा समावेश

Raigad News: महाड MIDCमध्ये पुन्हा गॅसगळती, एका कामगाराचा मृत्यू, ८ जण जखमी

Viral Video : तीन वर्षांचा चिमुकला आईची तक्रार घेऊन थेट पोलीस चौकीत पोहोचला, म्हणाला- तिला जेलमध्ये टाका; कारण ऐकून पोलिसांनाही आवरेना हसू

Marathi News Live Updates : मुंबईत भारतीय नौदलाचा खलाशी, पत्नी आणि दोन अल्पवयीन मुले मृतावस्थेत आढळली

IND vs SL 1st Test : एकही चेंडू न खेळता, भारत-श्रीलंकेचे खेळाडू जेवायला गेले! गौतम गंभीरचं डोकं फिरलं; गॉलवर नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT