AC Cleaning Tips esakal
विज्ञान-तंत्र

AC Tips : घरात AC वापरताय, पण विजबिल वाचवायचं आहे? साफसफाई करताना फॉलो करा 'ही' एक भन्नाट ट्रिक

AC Cleaning Tips : विजबिल वाचवून एसी चांगल्या प्रकारे वापरायचा असेल, तर दर महिन्याला फिल्टर साफ करणं आवश्यक आहे. यासंबंधीत ट्रिक जाणून घ्या.

Saisimran Ghashi

AC Cleaning Tips : उन्हाळा सुरू झाला की घरोघरी एसी आणि कूलर सुरू होतात. एप्रिल महिन्यापासूनच तापमान वाढू लागते आणि ४० अंशांच्या आसपास गेल्यावर कूलर पुरेसा राहत नाही. अशावेळी वातानुकूलन (एसी) हा अत्यावश्यक घटक ठरतो. मात्र फक्त एसी लावणेच पुरेसे नाही, त्याची योग्य देखभाल करणेही तेवढेच गरजेचे असते. अन्यथा एसी नीट थंड करत नाही आणि खर्च देखील वाढतो.

यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे एसीचा फिल्टर. फिल्टरमधून घरातील हवा थेट कूलिंग कॉईलमधून फिरते आणि थंड होते. जर हा फिल्टर घाणीनं भरलेला असेल, तर हवा नीट फिरत नाही आणि त्यामुळे कूलिंग कमी होते. त्याचा परिणाम असा की एसी अधिक वेळ चालतो, कॉम्प्रेसरवर ताण येतो आणि वीजबिल वाढते.

खरं पाहता, अनेक जण एसीच्या देखभालीकडे दुर्लक्ष करतात. एसीचा फिल्टर दर ७ ते ८ आठवड्यांनी सामान्य वापरात स्वच्छ केला पाहिजे. मात्र जर एसी दररोज १० ते १२ तास वापरत असाल, तर दर ४ ते ६ आठवड्यांनी फिल्टर स्वच्छ करणे अत्यावश्यक आहे. यामुळे एसीची कार्यक्षमता टिकून राहते, थंडावा योग्य प्रमाणात मिळतो आणि यंत्रणेचं आयुष्यही वाढतं.

एसीचा फिल्टर ही केवळ एक चाळणी नाही,तर यंत्रणेचा महत्त्वाचा भाग आहे. त्याकडे दुर्लक्ष केल्यास तुम्हाला थंडावा तर कमी मिळेलच, पण अनावश्यक खर्चही वाढेल. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात तुमच्या एसीचा फिल्टर वेळेवर साफ करत राहा आणि उन्हाच्या तडाख्यापासून स्वतःला आणि आपल्या घराला वाचवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वडिलांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारच केले नाहीत; मृतदेह प्रिझर्व्ह करून ठेवला, मुंबईतील खळबळजनक घटना

Malvan Accident : दुचाकीच्या धडकेत भाजप नगरसेविकेसह चौघे जखमी, सरकारी दवाखान्यात एक्स रे मशीन बंद असल्याने संताप

LPG Cylinder Price: उद्यापासून गॅस सिलेंडर महागणार? महाराष्ट्रात आज कितीला मिळतो LPG, पाहा शहरनिहाय दर

Pradip Purnekar case: ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याच्या हत्येचा CCTV फुटेज समोर, ७ गोळ्या झाडल्याचा आवाज

Ayush Thite Organ Donation : सोलापूरच्या आयुषच्या हृदयाने रशियातील तीन वर्षांच्या चिमुकल्याला मिळणार नवजीवन; अवयवदानाने वाचणार चौघांचे प्राण

SCROLL FOR NEXT