how to speed up google chrome esakal
विज्ञान-तंत्र

Google Chrome Tips : तुमचं गुगल स्लो झालंय? वेबसाइट सतत हँग होते; करा ही सोपी ट्रिक, क्रोमची स्पीड होईल डबल

How to make google crome faster : गुगल क्रोमचा वापर करत असाल आणि त्याची स्पीड कमी झाली आहे असे वाटत असेल, तर काही सोप्या टिप्स वापरुन तुम्ही स्पीड वाढवू शकता.

Saisimran Ghashi

Google Slow Browser Performance Problem : गुगल क्रोम हा जगातील सर्वाधिक वापरला जाणारे वेब ब्राउझर असून जवळपास 64.68% बाजारपेठेवर त्याचे अधिराज्य आहे. संगणक, मोबाइल अशा विविध प्लॅटफॉर्मवर याचा प्रचंड वापर होतो. मात्र, अनेकदा गुगल क्रोमच्या धीम्या गतीमुळे वापरकर्त्यांना त्रासाला सामोरे जावे लागते. ब्राउझर स्लो झाल्याने कामाची गती कमी होते आणि वापरकर्त्यांचा वेळ वाया जातो. यासाठीच आज आम्ही तुम्हाला गुगल क्रोमची गती वाढवण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगणार आहोत.

1. गुगल क्रोम अपडेट करा

गुगल वेळोवेळी आपल्या क्रोम ब्राउझरसाठी नवीन अपडेट्स जारी करते. या अपडेट्समध्ये सॉफ्टवेअर अपग्रेड आणि सुरक्षा सुधारणांचा समावेश असतो, ज्यामुळे ब्राउझर अधिक वेगवान होतो. त्यामुळे क्रोम अपडेट करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हे केल्याने केवळ ब्राउझरची गती वाढणार नाही, तर तुमचा डेटा देखील अधिक सुरक्षित राहील.

2. कुकीज आणि कॅशे साफ करा

गुगल क्रोमवर तुम्ही सर्च करताना संबंधित तात्पुरत्या फाईल्स (कुकीज आणि कॅशे) कॉम्प्युटर किंवा मोबाइलमध्ये साठवल्या जातात. या फाईल्सचा साठा वाढल्याने ब्राउझर स्लो होतो. ब्राउझरचा स्पीड वाढवण्यासाठी सेटिंगमध्ये जाऊन कुकीज आणि कॅशे साफ करा. ही सोपी ट्रिक वापरकर्त्यांना लगेचच वेगवान ब्राउझिंगचा अनुभव देते.

3. परफॉर्मन्स फीचरचा वापर करा

गुगल क्रोममधील परफॉर्मन्स फीचर ब्राउझरची गती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरते. यासाठी क्रोमच्या सेटिंगमध्ये जा आणि "स्पीड सेक्शन"मध्ये "प्रीलोड पेज" ऑन करा. यामुळे वेबपेजेस लवकर लोड होतात आणि शोध प्रक्रियेला वेग येतो.

4. न वापरलेले टॅब बंद करा

अनेक वापरकर्ते क्रोमवर एकाच वेळी अनेक टॅब उघडतात, ज्यामुळे ब्राउझरची गती कमी होते. न वापरलेले टॅब बंद केल्याने ब्राउझरच्या संसाधनांवर ताण कमी होतो आणि गती वाढते.

5. जाहिरात ब्लॉकर वापरा

वेबसाईट्सवरील जाहिरातींमुळे लोडिंग वेळ वाढतो. यावर उपाय म्हणून जाहिरात ब्लॉकर वापरा. जाहिरात ब्लॉकरमुळे जाहिराती दिसत नाहीत, लोडिंग वेळ कमी होतो आणि ब्राउझिंग अधिक जलद व अडथळ्याविना होते.

जर तुमच्या गुगल क्रोमची गती कमी झाली असेल, तर वरील उपायांचा अवलंब करून तुम्ही ब्राउझरला पुन्हा वेगवान बनवू शकता. क्रोम अपडेट ठेवणे, कुकीज-कॅशे साफ करणे, परफॉर्मन्स फीचर सक्रिय करणे आणि टॅब्स व्यवस्थापित करणे या ट्रिक्समुळे तुम्हाला वेगवान ब्राउझिंगचा अनुभव मिळेल. आता या टिप्स वापरून तुमच्या कामाचा वेग वाढवा आणि त्रासमुक्त ब्राउझिंगचा आनंद घ्या!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

समृद्धीवर सराफ व्यापाऱ्याला लुटलं, 4,78,79,000 रुपये किंमतीचं सोनं अन् रोकड घेऊन दरोडेखोर फरार

‘हाफ सीए’ सीझन २: सीए बनायची स्वप्न पाहणाऱ्या तरुणांची कहाणी आता ओटीटीवर; ट्रेलर प्रदर्शित

Gold-Silver Rate Today: सोन्याचा दर खाली, चांदीतही घसरण! तुमच्या शहरातील ताजे भाव तपासा

Latest Marathi News Updates : नागपुरात मारबत उत्सवाला सुरुवात, १४४ वर्षांची आहे परंपरा

Airtel Recharge : एअरटेलचा पुन्हा धक्का! 'या' रिचार्ज प्लॅनचे दर झाले कमी, पण ग्राहक का नाराज? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT