Rat In Car
Rat In Car esakal
विज्ञान-तंत्र

Car Rat Protection : उन्हाळा सुरु होतोय आपल्या कारची निगा राखा नाहीतर यमराजरुपी उंदीर येऊन...

Lina Joshi

Rat In Car : उन्हाळा सुरु झाला आहे, जसं ऊन आपल्याला लागतं तसं ते इतर जीवांना प्राण्यांना सुद्धा लागतं. अशात अनेक प्राणी आपला आसरा शोधत नवीन नवीन ठिकाणी फिरत असतात, आपल्याकडे उन्हाळ्यात पेस कंट्रोल करण्याचा सल्ला मिळतो कारण उन्हाळ्यात या किडयांचा खूप त्रास असतो अशात घरातले प्राणी तर आपण बाहेर हाकलून लावू पण आपल्या कर मध्ये जर हे उंदीर शिरले तर?

कोणत्याही कारसाठी उंदीर हे कोणत्या यमराजापेक्षा कमी नाहीत. गाडी कुठेही पार्क केलेली असुदेत, घरात किंवा घराबाहेर, उंदीर त्यात शिरण्याचा मार्ग शोधतात आणि कारमध्ये आपलं घर बनवतात.

यानंतर, कारमध्ये अनेक प्रकारच्या समस्या येऊ लागतात, कारण उंदीर गाडीच्या आत काहीना काहीतरी कुरतडत राहतात आणि त्यात आपल्या गाडीच्या आवश्यक वायर्स शिवाय इतरही बॉडी पार्टस असू शकतात.

परिणामी कधीही न संपणाऱ्या मोठ्या समस्या सुरू होतात. अनेक वेळा या समस्या इतक्या वाढतात की लाखो रुपये खर्च करावे लागतात.

उंदीर हा असा प्राणी आहे जो आपल्या दातांनी काहीही कुरतडू शकतो. रबर, फॅब्रिक किंवा प्लॅस्टिकच्या वस्तू सोडल्या तर उंदरांमध्ये अगदी मिश्र धातु कुरतडण्याची देखील क्षमता असते, असे अनेक वेळा दिसून आले आहे.

आता तुम्ही कल्पना करू शकता की जर तुमच्या गाडीला उंदीर कुरतडायला लागले तर ते किती प्रमाणात विध्वंस करू शकतात.

गाडीत उंदीर कुठून येतात?

कारमध्ये उंदरांचा प्रवेश मुख्यतः इंजिनच्या बाजूने होतो. टायरवर चढल्यानंतर उंदीर वायरिंगच्या जागेतून किंवा स्टीयरिंग कॉलमजवळून मार्ग काढतात आणि गाडीच्या केबिनमध्येही पोहोचतात. बहुतेक उंदीर इंजिनभोवती आपले घर बनवतात कारण तिथे उब असते आणि ते त्यांच्यासाठी उत्तम जागा म्हणून काम करते.

काय नुकसान होऊ शकते

उंदीर कारच्या वायरिंगला चावू शकतात. यासोबतच तेलाच्या वासामुळे उंदीर ब्रेक लाईनही कापतात, असेही अनेकदा दिसून आले आहे. यासह, ते सीट, फ्लोअर मॅट्स, खिडक्यांचे रबर आणि स्टीयरिंग वायर देखील कुरतडू शकतात.

काहीवेळा ब्रेक लाइन डिस्कनेक्ट झाल्यामुळे, कारचे अचानक ब्रेक फेल होऊ शकतात कारण ब्रेक तेलाच्या प्रेशरने लवकर लागतात आणि लाइन ब्रेक झाल्यामुळे प्रेशर क्रिएट होत नाही. त्यामुळे मोठ्या अपघाताचे कारण बनू शकते.

यामुळे अनेक वेळा गाडीच्या दुरुस्तीसाठी लाखो रुपयांपर्यंत खर्च येतो. तसेच, एकदा उंदराचे घर केले की, ही समस्या पुन्हा पुन्हा होऊ शकते.

बचाव कसा करायचा

तसे, उंदीर टाळण्याचा एकच प्रभावी मार्ग आहे, तो म्हणजे गाडी स्वच्छ ठेवणे आणि त्यात खाद्यपदार्थ टाकू नका कारण ते त्यांच्या वासाने येतात.

यासोबतच जर गाडी काहीशी जुनी झाली असेल तर तिची डॅम्पिंग चेक करून घ्या जेणेकरून उंदरांचा प्रवेश गाडीच्या आत जाऊ नये. अशी काही इलेक्ट्रिक उपकरणेही आता बाजारात उपलब्ध आहेत जी उंदरांना कारमध्ये येण्यापासून रोखतात.

यासोबतच तुम्हाला कार वर्कशॉपमध्ये कारसाठी उंदीर संरक्षण पॅक देखील सहज मिळतील. ही एक प्रभावी पद्धत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान; 'एवढा' मुद्देमाल लंपास

Thoda Tuza Thoda Maza : शिवानीसोबत 'या' अभिनेत्याचाही स्टार प्रवाहवर कमबॅक

DK Shivkumar: डीके शिवकुमार, 100 कोटी अन् भाजप नेता; प्रज्वल रेवन्ना व्हिडिओ प्रकरणातील नवी घडामोड आली समोर

Latest Marathi News Live Update : मनमोहन सिंग, हमीद अन्सारी यांनी घरातूनच केलं मतदान

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT