WhatsApp esakal
विज्ञान-तंत्र

WhatsApp वर सेंड करून डिलीट केलेले मेसेज कसे वाचाल? ही सोपी ट्रीक वापरत वाचा डिलीटेड मेसेज

व्हॉट्सॲप वापरकर्त्यांना पाठवलेले मॅसेज 2 दिवस आणि 12 तासांच्या आत हटवण्याची परवानगी देते

सकाळ ऑनलाईन टीम

WhatsApp Tips & Tricks : WhatsApp हे सर्वात लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग ॲप आहे. 2 अब्जाहून अधिक वापरकर्ते ते वापरतात. व्हॉट्सॲप वापरकर्त्यांना त्यांच्या चॅट वैयक्तिक ठेवण्याची किंवा स्पॅम संपर्कांना ब्लॉक करण्याची परवानगी देते. व्हॉट्सॲपने असेच आणखी एक फीचर आणले आहे, जे ॲप आणि यूजर दोघांनाही सुरक्षित करते. होय 'डिलीट फॉर एव्हरीवन' या फीचरबद्दल आज आपण जाणून घेऊया. व्हॉट्सॲप वापरकर्त्यांना पाठवलेले मॅसेज 2 दिवस आणि 12 तासांच्या आत हटवण्याची परवानगी देते. पण चुकून पाठवलेला मेसेज तासांनंतरही यूजर्स डिलीट करू शकतात.

व्हॉट्सॲप डिलीट फॉर एव्हरीवन पर्याय

युजरने पाठवलेल्या मेसेजवर क्लिक केल्यावर 'डिलीट फॉर मी' किंवा 'डिलीट फॉर एव्हरीवन'चा पर्याय उपलब्ध आहे. डिलीट फॉर एव्हरीवन सिलेक्ट करून डिलीट केल्यानंतर, मेसेज डिलीट झाला आहे असा एक मेसेज दाखवला जातो. असा मेसेज पाहिल्यावर समोरची व्यक्ती भडकते आणि विचार करते की समोरच्या व्यक्तीने काय संदेश पाठवला असेल. समोरच्या व्यक्तीने असे केल्यावर राग येतो. असा पर्याय इन्स्टाग्रामवरही उपलब्ध आहे, पण समोरच्या व्यक्तीला मेसेज डिलीट झाला आहे की नाही हे कळत नाही.

डिलीट केलेले मेसेज कसे पाहायचे? या प्रश्नाचे उत्तर व्हॉट्सॲपकडे नाही. तुम्ही ॲपवर हटवलेले मेसेज पाहू शकत नाही. प्रायव्हसी लक्षात घेऊन व्हॉट्सॲप असे कोणतेही फिचर आणणार नाही. पण ते कसे सोडवायचे. तेव्हा यावरचा एक उपाय आपण जाणून घेऊया. अनेक मार्ग आहेत ज्याद्वारे डिलीट केलेले संदेश पाहिले जाऊ शकतात.

थर्ड पार्टी ॲपची मदत घ्या

ऑनलाइन थर्ड पार्टी ॲप्स प्ले स्टोअरवरून डाउनलोड करता येतात. हे ॲप डिलीट केलेले मेसेज दाखवण्याचा दावा करते. पण या ॲप्समध्ये खूप धोका आहे. हा डेटा चोरी करणारा अॅपही असू शकतो. म्हणूनच हे ॲप्स डाउनलोड न केल्यास बरं होईल.

सेकंड ऑप्शन

दुसरा पर्याय म्हणजे बॅकअप. तुमच्या WhatsApp चा नियमित बॅकअप घ्या आणि पूर्वीच्या बॅकअपमधून मेसेज रिस्टोअर करा. यासाठी व्हॉट्सअॅप सेटिंगमध्ये जा आणि चॅटमध्ये जा. तेथे चॅट बॅकअप दिसेल. हटवलेले संदेश असलेले जुने बॅकअप शोधा.

डिलीट केलेले मॅसेज असे वाचा

- तुमच्या फोनच्या सेटिंग्जवर जा.

- त्यानंतर Apps आणि Notifications वर टॅप करा.

- सूचना पर्याय निवडा.

- 'नोटिफिकेशन हिस्ट्री' ऑप्शनच्या आत दिसेल, तिथे क्लिक करा.

- नोटिफिकेशन हिस्ट्री वर जात नेक्स्ट करा.

- नोटिफिकेशन हिस्ट्री ऑन होताच डिलीट केलेले मेसेज तुम्ही पाहू शकाल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Guhagar-Vijaypur highway accident : गुहागर-विजयपूर महामार्गावर तामखडी नजीक भीषण अपघात; एक जण ठार तर सहाजण जखमी

National Vegetable : भारताची राष्ट्रीय भाजी कोणती आहे? लाखो लोकांना आजही माहिती नाही योग्य उत्तर..तुम्ही हे पाहाच

Akola Municipal Election : अकोल्यात महायुतीतील जागा वाटपाचा तिढा अखेर सुटला; प्रचाराला वेग!

Bhandup Bus Accident :भांडुप स्टेशनजवळ 'बेस्ट बस'चा मोठा अपघात; चार ते पाच चिरडलं, दोन महिलांचा मृत्यू

Nashik Election: नाशिकमध्ये महायुतीचं फिस्कटलं! भाजपकडून प्रतिसाद नाही, दोन पक्षांनी घेतला 'हा' निर्णय

SCROLL FOR NEXT