Christmas Stickers Sakal
विज्ञान-तंत्र

Christmas Stickers: हटके WhatsApp स्टिकर्सद्वारे मित्र-मैत्रिणींना द्या ख्रिसमसच्या शुभेच्छा, पाहा प्रोसेस

इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून सहज मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांंना ख्रिसमसच्या शुभेच्छा देणारे स्टिकर्स पाठवू शकता. हे स्टिकर्स कसे पाठवता येतील जाणून घ्या.

सकाळ डिजिटल टीम

Merry Christmas stickers on WhatsApp: ख्रिसमस अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. हा सण आनंदात साजरा करण्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. वर्षातील शेवटचा सण मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांसोबत साजरा करण्याची प्रत्येकाची इच्छा असते. मात्र, अनेकदा काही कारणास्तव नातेवाईकांसोबत सुट्ट्या घालवणे शक्य होत नाही. परंतु, टेक्नोलॉजीच्या मदतीने तुम्ही सहज मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांंना ख्रिसमसच्या (Christmas 2022) शुभेच्छा देऊ शकता. यासाठी इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp चा उपयोग होईल. WhatsApp च्या माध्यमातून ख्रिसमसच्या शुभेच्छा देणारे स्टिकर्स (Christmas stickers) कसे पाठवायचे माहित नसल्यास त्याविषयी जाणून घ्या.

WhatsApp वरून कसे पाठवू शकता स्टिकर्स?

WhatsApp वरून कोणालाही स्टिकर पाठवण्यासाठी सर्वात प्रथम ख्रिसमस थीमच्या स्टिकर्सला अ‍ॅड करावे लागेल. साठी चॅट बॉक्सच्या उजव्या बाजूला दिसणाऱ्या स्माइलीवर क्लिक करा. त्यानंतर खाली दिलेल्या तीन पर्यायांपैकी स्टिकरवर टॅप करा. आता प्लस आयकॉनवर क्लिक करा.

आता डिस्कवर स्टिकरवर क्लिक करा. येथे तुम्हाला वेगवेगळे स्टिकर पॅक दिसतील. यापैकी तुम्ही तुमच्या आवडीच्या स्किर पॅकला इंस्टॉल करू शकता. त्यानंतर कोणालाही स्टिकर पाठवता येतील. तुम्ही चॅट बॉक्स ओपन करून कोणालाही सहज हे स्टिकर्स पाठवून ख्रिसमसच्या शुभेच्छा देऊ शकता

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

WhatsApp वरून पाठवता येईल ख्रिसमस GIF

WhatsApp वरून GIF फाइल देखील पाठवता येईल. स्माइली आयकॉनवर क्लिक केल्यानंतर GIF पर्यायावर क्लिक करा. येथे तुम्हाला ख्रिसमस सर्च केल्यावर वेगवेगळे GIF मिळतील. तुम्ही नवीन GIF फाइल देखील अ‍ॅड करू शकता.

एवढेच नाही तर तुम्ही स्वतःचा फोटो वापरून स्टिकर्स देखील तयार करू शकता. यासाठी तुम्हाला थर्ड पार्टी अ‍ॅपची मदत घ्यावी लागेल. तुम्ही स्वतःचे हटके स्टिकर्स बनवून इतरांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देऊ शकता.

हेही वाचा: OTT App: Netflix-Hotstar साठी पैसे खर्च करण्याची गरजच नाही, 'या' अ‍ॅपवर मोफत पाहू शकता चित्रपट-सीरिज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजने बॉल फेकून मारलाच होता, जो रूटवर खवळला; नेमकं काय घडलं?

Radhika Yadav: 'तो' वाद अन्...; टेनिस खेळाडू राधिका यादवला वडिलांनी का संपवलं? पोलिसांनी खरं कारण सांगितलं!

Navi Mumbai News: पनवेलचा पाणी प्रश्न सुटण्यास २०२६ उजाडणार, न्हावा-शेवा टप्पा-३ प्रकल्‍पास विलंब!

IND vs ENG 3rd Test: कंटाळवाण्या कसोटीत तुमचं स्वागत! शुभमन गिल अन् मोहम्मद सिराज ऑन फायर, स्लेजिंगचा मजेशीर Video Viral

Kapil Sharma Canada Cafe Shooting Video : कपिल शर्माच्या कॅनडामधील कॅफेवर झालेल्या भयानक गोळीबाराचा व्हिडिओ आला समोर!

SCROLL FOR NEXT