WhatsApp  Sakal
विज्ञान-तंत्र

WhatsApp Tips: दोन स्मार्टफोनमध्ये वापरता येईल एकच WhatsApp अकाउंट, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

एका सोप्या ट्रिकच्या माध्यमातून तुम्ही एकच व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट दोन फोन्समध्ये वापरू शकता. ही सोपी ट्रिक जाणून घ्या.

सकाळ डिजिटल टीम

Same WhatsApp account on two phones: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक आणि इंस्टाग्रामला एकाचवेळी वेगवेगळ्या स्मार्टफोनमध्ये सहज वापरणे शक्य आहे. परंतु, इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपचे एक अकाउंट दोन फोनमध्ये वापर करणे शक्य होत नाही. एकाच अकाउंट दोन ठिकाणी वापरण्यासाठी तुम्हाला डेस्कटॉपवर लॉग इन करावे लागते. परंतु, आम्ही तुम्हाला अशीच एक सोपी पद्धत सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही एकच व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट दोन फोन्समध्ये वापरू शकता.

दोन स्मार्टफोनमध्ये एकच व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट वापरण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

  • दोन स्मार्टफोनमध्ये एकच अकाउंट वापरण्यासाठी दोन्ही डिव्हाइसमध्ये व्हॉट्सअ‍ॅप डाउनलोड करा.

  • अ‍ॅपला इंस्टॉल केल्यानंतर एका स्मार्टफोनमध्ये फोन नंबरने लॉग इन करा.

  • आता याच नंबरने दुसऱ्या स्मार्टफोनमध्ये WhatsApp ओपन करा.

  • येथे तुम्हाला फोन नंबर आणि ओटीपी टाकण्याची गरज नाही.

  • वर दिलेल्या ३ डॉट्सवर क्लिक करून लिंक अ डिव्हाइस पर्यायावर टॅप करा.

  • आता क्यूआर कोड दिसेल. हा कोड दुसऱ्या फोनने स्कॅन करा.

  • त्यानंतर तुम्ही एकच WhatsApp अकाउंट दोन फोन्समध्ये वापरू शकता.

हेही वाचा: क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

अ‍ॅप डाउनलोड न करताही वापरता येईल व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट

  • तुम्ही दुसऱ्या स्मार्टफोनमध्येअ‍ॅप डाउनलोड न करताही एकच व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट वापरू शकता.

  • यासाठी तुम्हाला गुगल क्रोम ब्राउजर ओपन करा लागे.

  • आता उजव्या बाजूला असलेल्या ३ डॉटवर क्लिक करा.

  • आता सेटिंग पर्यायावर जा.

  • येथे तुम्हाला वेगवेगळे पर्याय दिसतील. त्यातील डेस्कटॉप साइट पर्याय ऑन करा

  • आता क्रोम ब्राउजरमध्ये WhatsApp Web सर्च

  • येथे तुम्हाला क्यूआर कोड दिसेल. हा कोड स्कॅन करून तुम्ही एकच WhatsApp अकाउंट दोन ठिकाणी वापरू शकता.

हेही वाचा: Best Sedan Cars: तुमच्या फॅमिलीसाठी परफेक्ट आहे 'या' टॉप-३ सेडान कार, किंमत बजेटमध्ये; पाहा डिटेल्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 17 Price : आला रे आला, आयफोन आला! iPhone 17, 17 Pro अन् Pro Max स्मार्टफोन भारतात कितीला? किंमत पाहा एका क्लिकमध्ये..

iPhone 17 Series : एकच झलक, सबसे अलग! iPhone 17 झाला लाँच; एकदम खास फीचर्स अन् परवडणारी किंमत, सर्व डिटेल्स पाहा एका क्लिकमध्ये..

iPhone Air Price : कागदासारखा पातळ मोबाईल! iPhone Air लाँच; बघाल तर प्रेमात पडाल, किंमत फक्त...

Apple Watch Series 11 : हे घड्याळ आहे की फीचर्सचा खजिना! Apple Watch Series 11 लाँच, किंमतीपासून अपडेट्स पर्यंत, सर्वकाही जाणून घ्या

AirPods Pro 3 ची धमाकेदार एंट्री; मोजणार हृदयाचे ठोके अन् करणार लाईव्ह ट्रान्सलेशन, 15 जबरदस्त फीचर्स, किंमत फक्त...

SCROLL FOR NEXT