Redmi
Redmi  Sakal
विज्ञान-तंत्र

Smartphone Offer: विश्वास बसणार नाही! फक्त ९४९ रुपयात मिळतोय ६जीबी रॅमसह येणारा फोन, पाहा डिटेल्स

सकाळ डिजिटल टीम

Offer On Redmi 10 Smartphone: ख्रिसमस आणि नववर्षाच्या निमित्ताने जर तुम्ही इतरांना गिफ्ट देण्याचा विचार करत असाल तर स्मार्टफोन एक चांगला पर्याय आहे. तुम्ही रेडमीच्या स्मार्टफोनला अवघ्या १ हजार रुपयात खरेदी करू शकता. Redmi 10 स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंट उपलब्ध आहे. या फोनला तुम्ही ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवरून स्वस्तात खरेदी करू शकता. हँडसेट ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजसह येतो. Redmi 10 स्मार्टफोनच्या किंमत आणि ऑफर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

हेही वाचा: काय आहे सलाम किंवा कुर्निसाताचे महत्त्व राजशिष्टाचारांमध्ये

Remdi 10 स्मार्टफोनची किंमत

Remdi 10 स्मार्टफोनची मूळ किंमत १६,९९९ रुपये आहे. परंतु, फ्लिपकार्टवरून २९ टक्के डिस्काउंटसह स्वस्तात खरेदी करू शकता. डिस्काउंटनंतर फोनला फक्त ११,९९९ रुपयात खरेदी करता येईल. एवढेच नाही तर फोनवर ११,०५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. परंतु, ही ऑफर तुमच्या जुन्या फोनच्या कंडिशन आणि लेटेस्ट मॉडेलवर अवलंबून आहे. या ऑफरचा पूर्ण फायदा मिळाल्यास रेडमीच्या फोनला फक्त ९४९ रुपयात खरेदी करता येईल.

एक्सचेंज ऑफर व्यतिरिक्त यूपीआय ट्रांजॅक्शनवर ५०० रुपये डिस्काउंट मिळेल. HDFC कार्डचा वापर केल्यास १ हजार रुपये डिस्काउंट दिले जात आहे. तुम्ही फोनला दरमहिना २ हजार रुपये देऊन ईएमआयवर देखील खरेदी करू शकता. या फोनवर तुम्हाला १ वर्षाची वॉरंटी मिळते.

हेही वाचा: TVS Bike: अवघ्या ७ हजारात तुमची होईल 'ही' शानदार बाईक, माइलेज खूपच जबरदस्त

Remdi 10 स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स

Remdi 10 स्मार्टफोनमध्ये ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज दिले आहे. फोनच्या स्टोरेजला १ टीबीपर्यंत वाढवू शकता. यात ६.७ इंच एचडी प्लस डिस्प्ले मिळेल. फोटोग्राफीसाठी ५० मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, २ मेगापिक्सल कॅमेरा सेंसर मिळतो. तर सेल्फीसाठी ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. पॉवर बॅकअपसाठी ६००० एमएएचची दमदार लीथियम ऑयन बॅटरी मिळेल. यात Qualcomm Snapdragon ६८० प्रोसेसरचा सपोर्ट मिळतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : तुमची संपत्ती लुटणारं सरकार तुम्हाला हवं आहे का? पंतप्रधान मोदींची पुन्हा काँग्रेसवर टीका

Solapuri Chaddar : मोदींना गिफ्ट दिलेल्या सोलापुरी चादरीचा इतिहास माहित आहे का ?

Heat Wave : विदर्भात आजपासून उष्णतेची लाट, नागरिकांनी काळजी घेण्याची गरज

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

SCROLL FOR NEXT