Hyundai i20 Waiting Period esakal
विज्ञान-तंत्र

Hyundai i20 Waiting Period : ह्युंदाई i20 च्या वेटिंग पिरीयेडमध्ये वाढ; आता इतक्या दिवसांनी मिळणार गाडी...

जर तुम्ही ही कार घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला त्यासाठी बराच वेळ वाट पाहावी लागणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

Hyundai i20 Waiting Period : देशात ह्युंदाईच्या प्रीमियम कारची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे आणि आता या गाडीचा वेटिंग पिरीयेडही वाढला आहे आणि जर तुम्ही ही कार घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला त्यासाठी बराच वेळ वाट पाहावी लागणार आहे.

या प्रीमियम हॅचबॅक कारसाठी तुम्हाला कमीत कमी १६ आठवडे अर्थात ४ महिने प्रतीक्षा करावी लागू शकते. याशिवाय, कंपनीने अलीकडच्या काळात Aura आणि Grand i10 Nios अपडेट केले आहेत.

Hyundai i20 व्हेरिएंट्स आणि इंजिन ऑप्शन

अलीकडेच, Hyundai ने आपल्या i20 चा डिझेल इंजिन पर्याय बंद केला आहे. हॅचबॅकला आता 1.2 लिटर नॅचरल एस्पिरेटेड पेट्रोल आणि 1.0-लिटर टर्बो-पेट्रोलचे इंजिन मिळते अन् 1.2-लिटर पेट्रोल 82bhp पॉवर आणि 115Nm टॉर्क जनरेट करते.

यासह, यात 1.0-लिटर टर्बो-पेट्रोल आहे जे 118bhp पॉवर आणि 172Nm टॉर्क जनरेट करते. यामध्ये मॅन्युअल, सीव्हीटी आणि डीसीटी युनिट्स जोडण्यात येणार आहेत. तुम्ही Sports, Asta आणि Asta(O) प्रकारांमधून निवडू शकता. यासह, कंपमी लवकरच BS6 2 इमिशन नियमांनुसार त्याचे इंजिन अपडेट करु शकते.

Hyundai i20 वेटिंग पिरीयेड

1.0-लिटर Sportz DCT ला १४ ते १६ आठवड्यांचा वेटिंग पिरीयेड असेल, तर 1.2-लिटर स्पोर्ट्स मॅन्युअल आणि CVT आणि 1.0-लिटर Asta(O) DCT प्रकारांना ६ ते ८ आठवडे वाट बघावी लागेल.

Hyundai i20 डिझेल

भारत सरकार १ एप्रिल २०२३ रोजी BS6 चा दुसरा टप्पा लागू करणार आहे, त्यानंतर कंपनीला त्यांच्या वाहनांमध्ये बदल करावे लागेल. कंपन्या रिअल ड्रायव्हिंग एमिशन नॉर्म (RDE) अंतर्गत अपग्रेड न झालेली वाहने बंद करत आहेत, कंपनी Hyundai i20 डिझेल कार बंद करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPO Alert: ₹15 हजारांचे होऊ शकतात ₹20 हजार! 33% GMP सह 631 कोटींचा IPO आजपासून खुला; जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

Mumbai Electricity: मुंबईत वारंवार वीजपुरवठा खंडित, मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा प्रशासनावर संताप; आंदोलनाचा इशारा

Delhi Restaurant Fire : दिल्लीत रेस्टॉरंटमध्ये भीषण आग, २१ जणांचा होरपळून मृत्यू; आपचे माजी आमदार घटनास्थळी दाखल

फक्त एका ट्रिकने Instagram हॅक! Meta AI मधील त्रुटीचा गैरवापर; लाखो अकाउंट्सवर हॅकर्सचा हल्ला, सुरक्षेसाठी लगेच करा 'हे' काम

सचिन पिळगावकरांवर जीवापाड प्रेम करायची ही अभिनेत्री; पण 'या' व्यक्तीमुळे नाही होऊ शकलं लग्न, अखेर...

SCROLL FOR NEXT