IBM Pause Hiring sakal
विज्ञान-तंत्र

IBM Pause Hiring : AI ची कुऱ्हाड पडलीच! IBM कडून आता 7800 जागेवर AI ची भरती

एआयमुळेच अनेकांवर नोकऱ्या जाण्याची वेळ आली आहे. नुकतंच आयबीएम याविषयी एक मोठा खुलासा केलाय.

सकाळ डिजिटल टीम

 IBM Pause Hiring : एआय (AI) ची सध्या जगभरात चर्चा सुरू आहे.  एआय (AI) आता नोकऱ्यांसाठी एक मोठं आव्हान बनलेलं आहे. या एआयमुळेच अनेकांवर नोकऱ्या जाण्याची वेळ आली आहे. नुकतंच आयबीएम याविषयी एक मोठा खुलासा केलाय.

येत्या काळात आयबीएम जवळपास 7,800 जागांवर कर्मचाऱ्यांऐवजी एआयला रिप्लेस करणार आहे, तशी प्लॅनिंग सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. एवढंच काय तर नोकरभरतीला स्थगिती देण्याचा त्यांचा विचार आहे. (IBM pausing its hiring and plans to replace 7,800 jobs with AI)

आयबीएमचे सीईओ अरविंद कृष्णा ( Arvind Krishna) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की कंपनी 30 टक्के कर्मचारी AI सह रिप्लेस करण्याचा विचार करत आहे. layoffs आणि advancing technology मुळे IBM काही काळांसाठी नोकरभरती थांबवत आहे.

ई-कस्टमर सर्विस, Text लिहणे आणि कोड क्रिएट करणे यासारखी कामे AI कडे दिली जाणार. मात्र AI च्या वाढत्या दबावामुळे नोकरवर्गात निराशा पसरली आहे.

 उद्योग ,आर्थिक  व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातलं एक नावाजलेल नाव म्हणून आयबीएमकडे पाहलं जातं.  एक विश्वसनीय आणि नावलौकिक मिळवलेला ब्रँड म्हणून आयबीएमची ओळख आहे. IBM चे सीईओ  अरविंद कृष्णा असून आयबीएमचं मुख्यालय न्यूयॉर्कमधील अरमोर्क येथे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : सोन्यात घसरण सुरुच,चांदीही झाली स्वस्त; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

Teacher Recruitment : 'राज्यात सरकारी-अनुदानित शाळांमध्ये तब्बल 18,500 नवीन शिक्षकांची भरती करणार'; शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

Latest Maharashtra News Updates : मोटारसायकल चोराला अटक, तीन बाईक्स जप्त

Explained: धावताना छातीत का दुखते? डॉक्टरांनी सांगितले 'हे' 5 कारण

उपमुख्यमंत्री शिंदेंनी कोणत्या अधिकाराखाली स्थगिती दिली? हायकोर्टाची विचारणा, बेकायदा इमारत प्रकरणी अडचणी वाढणार

SCROLL FOR NEXT