Shubhanshu Shukla Return to earth latest updates esakal
विज्ञान-तंत्र

Shubhanshu Shukla Return: वेलकम शुभांशु! अंतराळात तिरंगा फडकवून पृथ्वीवर परतले शुभांशु शुक्ला, कॅलिफोर्नियाच्या समुद्रावर केलं लँडिंग

Shubhanshu Shukla Earth Return Live Updates: अंतराळवीर शुभांशु शुक्ला हे अ‍ॅक्सिओम‑4 मिशनचे एक भाग म्हणून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून परत आले आहेत.

Saisimran Ghashi

थोडक्यात..

  • शुभांशु शुक्ला यांनी Axiom‑4 मिशनमध्ये यशस्वी सहभाग घेतल्याने भारताच्या मानव अंतराळ कार्यक्रमाला चालना मिळाली.

  • त्यांनी 60 हून अधिक प्रयोगांत भाग घेतला, ज्यात भारतीय संशोधनाचाही समावेश होता.

  • रशिया व अमेरिका येथील प्रशिक्षण, आणि त्यांच्या अनुभवामुळे गगनयानसाठी ते महत्त्वाचे अंतराळवीर ठरले आहेत.

Shubhanshu Shukla Reaches Earth: भारताचे ग्रुप कॅप्टन आणि अंतराळवीर शुभांशु शुक्ला हे अ‍ॅक्सिओम‑4 मिशनचे एक भाग म्हणून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून परत आले आहेत. त्यांचा ड्रॅगन अंतराळयान 15 जुलैला 3 वाजता ISS सोडून कॅलिफोर्नियाच्या समुद्रात यशस्वीरित्या लँडिंग (स्प्लॅशडाउन) केले. हा प्रवास सुमारे 23 तासांचा होता, ज्यात 263 किलोहून अधिक वैज्ञानिक साधने आणि डेटा सोबातआला.

त्यांच्या मोहिमेत 60 पेक्षा जास्त प्रयोग करण्यात आले, त्यात भारताने सुचविलेले सात प्रयोगही होते. शुभांशू यांनी अंतराळात मेथी-बीनचे प्रयोग करण्यासह हाडांचे आरोग्य, मायक्रोअल्गी आणि इतर प्रयोग केले. त्यांच्या मोहिमेने भारताच्या मानव अंतराळ कार्यक्रमाला नवचैतन्य मिळाले आहे.

रशिया आणि अमेरिका येथे ट्रेनिंग

ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला (Shubhanshu Shukla) यांना भारतीय वायुसेनेच्या टेस्ट पायलट स्कूलमधून प्रशिक्षण मिळाले असून त्यांनी रशियामधील आणि अमेरिकेमधील प्रतिष्ठित संस्थांमध्येही प्रशिक्षण पूर्ण केले.

  • रशियामध्ये (Gagarin Cosmonaut Training Center, मॉस्को)
    येथे त्यांनी युरी गगारिन अंतराळ प्रशिक्षण केंद्रात रॉकेट लाँच, अंतराळयान ऑपरेशन्स, इमर्जन्सी मोड्स यांवर सखोल प्रशिक्षण घेतले.

  • अमेरिकेमध्ये (NASA आणि Axiom Space)
    Axiom Space द्वारे ISS मिशनसाठी विशेष प्रशिक्षण, स्पेससूट वापर, जी-फोर्स सिम्युलेशन, स्पेस स्टेशनमध्ये कामकाज आणि डेटा संकलन इत्यादी बाबींवर काम केले.

गगनयानमध्ये सहभाग

  • शुभांशु शुक्ला हे ISRO च्या गगनयान मिशनसाठी निवडले गेलेल्या अंतराळवीरांपैकी एक आहेत.

  • Axiom-4 मिशनद्वारे त्यांना प्रत्यक्ष अंतराळ अनुभव मिळाला, जो गगनयानसारख्या दीर्घकालीन भारतीय मानव अंतराळ मिशनसाठी अमूल्य ठरेल.

  • त्यांचा हा अनुभव ISRO च्या अंतराळवीर प्रशिक्षण कार्यक्रमासाठी मार्गदर्शक ठरेल.

टेस्ट पायलट आणि संशोधन

ग्रुप कॅप्टन शुक्ला हे टेस्ट पायलट असल्याने त्यांनी विविध लढाऊ विमानांचे परीक्षण, सीमारेषेवरील फ्लाइट कंट्रोल्सचे परीक्षण यांमध्ये पारंगतता मिळवली आहे.

त्यांनी काही वैज्ञानिक उपकरणांचे मायक्रोग्रॅव्हिटीमधील कार्यक्षमतेचे विश्लेषण ISS वर केले, ज्याचा वापर भविष्यातील भारतीय अंतराळ प्रयोगांसाठी होईल.

ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांचा Axiom-4 मिशनमधील सहभाग हा भारताच्या अंतराळ क्षेत्रासाठी ऐतिहासिक पाऊल आहे. त्यांच्या अनुभवाचा लाभ गगनयान आणि भविष्यातील भारतीय मानव अंतराळ मोहिमांसाठी महत्त्वाचा ठरेल.

FAQs

1. प्रश्न: शुभांशु शुक्ला कोण आहेत?
उत्तर: ते भारतीय वायुसेनेतील ग्रुप कॅप्टन असून Axiom‑4 मिशनचे अंतराळवीर आहेत.

2. प्रश्न: Axiom‑4 मिशनमध्ये त्यांनी कोणते प्रयोग केले?
उत्तर: त्यांनी मेथी-बीन, हाडांचे आरोग्य, मायक्रोअल्गी यांसारखे 60 हून अधिक वैज्ञानिक प्रयोग केले.

3. प्रश्न: Axiom‑4 मिशनमधून परतीचा प्रवास कधी आणि कसा झाला?
उत्तर: 15 जुलै रोजी सकाळी 3 वाजता त्यांनी ISS सोडले आणि कॅलिफोर्नियाच्या समुद्रात यशस्वीरित्या लँडिंग केले.

4. प्रश्न: शुभांशु शुक्ला यांना कोणत्या देशांमध्ये प्रशिक्षण मिळाले?
उत्तर: त्यांनी रशियातील गगारिन प्रशिक्षण केंद्र आणि अमेरिकेतील NASA व Axiom Space येथे प्रशिक्षण घेतले.

5. प्रश्न: गगनयान मिशनसाठी त्यांची भूमिका काय आहे?
उत्तर: ते गगनयानसाठी निवडले गेलेले अंतराळवीर असून त्यांचा अनुभव ISRO साठी उपयुक्त ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahmadpur News : टाकळगाव येथील तरुणाचा मराठा आरक्षण आंदोलनात हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत उपोषणस्थळी मृत्यू

Latest Marathi News Updates : दहिसर टोल नाका होणार आणखी पुढे, परिवहन मंत्र्यांचा सरकारकडे प्रस्ताव

Nagpur Fraud News : ‘क्रिप्टो करन्सी’तून दुप्पट नफ्याचे आमिष पडले महागात; सायबर चोरट्यांकडून नोकरदाराची दीड कोटी रुपयांची फसवणूक

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी तरूणाची गळफास लावून आत्महत्या; अंबेजोगाईतील खळबळजनक घटना!

फक्त ५ महिन्यात सोडली ८.८ कोटींची नोकरी; गुगलनंतर मेटातूनही भारतीय इंजिनिअर पडला बाहेर

SCROLL FOR NEXT