Cyber Crime
Cyber Crime esakal
विज्ञान-तंत्र

Cyber Crime : तुम्ही Instagram वापरतात? सावध रहा Sexbots पासून

सकाळ डिजिटल टीम

Instagram Spam Accounts : काही काळापासून भारतात सेक्सटॉर्शनचे बरेच प्रकार समोर आले आहेत. इंस्टाग्रामवर पण सध्या असेक काही प्रकार घडत असल्याचं समोर येत आहे. इथे मोठ्या संस्ख्येत सेक्सबोट्स आहेत. जे लोकांची पर्सनल डीटेल्स चोरतात. जर तुम्हीही इंस्टाग्राम युझर असाल तर आताच सावध व्हा. हा संपूर्ण प्रकार समजून घ्या.

सोशल मीडियावर स्पॅम, फ्रॉड्स आणि एक्स्टॉर्शनचे प्रकार सतत समोर येत असतात. पण सध्या असे प्रकार इंस्टाग्रामवर होत आहेत. काही प्रकरणांत असं समोर आलं आहे की, इंस्टा स्टोरी सेक्सबॉट्स कडून लाइक केली जात आहे. हे ऐकायला जरी सामान्य वाटत असलं तरी याचे परिणाम गंभीर होऊ शकतात.

त्यासाठी सगळ्यात आधी हे सेक्सबॉट काय प्रकार आहेत हे समजून घेणं आवश्यक आहे. बॉट म्हणजे फेक अकाउंट असतं हे तुम्हाला माहितच असेल. सेक्सबॉट असं अकाउंट असतं ज्यात लोकांना फसवण्यासाठी अश्लील फोटो लावलेला असतो.

या अकाउंट्सच्या बायो मध्ये फिशिंग लिंक मिळू शकते. ह अकाउंट्स तुम्हाला रँडमली फॉलो करतात. इतरांच्या तुलनेत ते तुमच्या इंस्टा अकांउंडवर, आयडीवर जरा जास्त लक्ष ठेवून असतात.

लोकांच्या डिटेल्ससाठी बॉट्स

मागच्या वर्षी २०२२ च्या शेवटी बऱ्याच लोकांनी हे नोटीस केलं असेल की, त्यांची इंस्टाग्राम स्टोरी बऱ्याच नवनवीन लोकांनी बघितली आहे. अकाउंट चेक आणि लाइक होत असल्याचं लक्षात आलं असेल. त्या युझर्सचं इंस्टा अकाउंट पब्लिक होतं. ते चेक केल्यावर समजलं की, हे अकाउंट सेक्सबॉट्स आहे.

अशा प्रकारचे अकाउंट्स सोशल मीडियावर असणं अजिबात नवीन नाही. अनेक वर्षांपासून असे अकाउंट्स आहेत. ते सध्या इंस्टाग्रामवर लोकांना आपल्या जाळ्यात ओढण्याचं काम करत आहेत. अशाप्रकारे कोणत्या अकाउंटच्या जाळात अडकून तुम्ही सेक्सटॉर्शनचे शिकार होऊ शकतात.

कसे वाचू शकाल?

  • बरेचसे लोक सेक्सबॉटला गांभीर्याने घेत नाहीत. त्यांना यांचे पोस्ट फनी वाटतात. शिवाय त्यांच्याकडून येणाऱ्या एंगेजमेंटमुळे लोक यांना सहज इग्नोर करतात.

  • काही वेळा हे सेक्सबॉट लोकांना महिलांचे फोटो पाठवतात.

  • यात आर रेटेड कार्टूनचे मेसेज पण असतात.

  • काही मेसेजमध्ये फिशिंग लिंक असतात. कोणी त्यावर क्लिक केलं तर त्याच्याकडून पर्सनल डिटेल्स मागितले जातात.

  • अशाप्रकारे अडकवून एक्सटॉर्शन केलं जातं.

  • जर तुम्हाला यापासून वाचायचं असेल तर अकाउंट पर्सनल ठेवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT