iphone14
iphone14 Sakal
विज्ञान-तंत्र

iPhone 14 प्रो मध्ये आणखी एक बग, चार्जिंगदरम्यान रीस्टार्टची समस्या

सकाळ डिजिटल टीम

iPhone 14 Pro Bug : ऍपलने या महिन्याच्या सुरुवातीला ऍपलचा आयफोन 14 प्रो लॉन्च केला. मात्र, आता या फोनमध्ये एक बग समोर आला आहे. iPhone 14 Pro Max आणि iPhone 14 Pro iOS 16.0 चार्ज होत असताना दर 10-20 मिनिटांनी आपोआप रिस्टार्ट होत असल्याची समस्या समोर येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार ही समस्या iOS 16.0.2 किंवा iOS 16.1 बीटावर देखील ही समस्या येत आहे. याबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील Reddit वर अनेक पोस्ट टाकल्या जात आहेत.

Reddit वरील काही युजर्सने म्हटले आहे की, त्यांचा iPhone 14 Pro MagSafe किंवा Lightning द्वारे चार्जिंग करताना मधूनमधून रिस्टार्ट होत आहे. Reddit वर साधारण नऊ दिवसांपूर्वी अशा प्रकारची पोस्ट टाकण्यात आली होती. त्याशिवाय एका युजरने म्हटले आहे की, नुकताच मी iPhone 14 Pro विकत घेतला आहे. मात्र, फोन चार्ज करताना 10-20 मिनिटांच्या अंतराने फोन आपोआप ऑटो-स्टार्ट होत असल्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. फोन चार्जर करणे बंद केल्यानंतर फोन कोणत्याही समस्येशिवाय चालू असल्याचे या यूजरने म्हटले आहे. यूजरकडून करण्यात येणाऱ्या या तक्रारी अद्यापपर्यंत Apple ने मान्य केलेल्या नसून, यासाठी कंपनीच्या सपोर्ट पेजवर काही पर्याय देण्यात आले आहेत.

तुम्हालाही समस्या येत असल्यास करा हे काम

  • DFU सह बॅकअपने फुल रिस्टोर करा.

  • रिकवरी मोडसह बॅकअपने फुल रिस्टोर करा.

  • ऑप्टिमाइज चार्जिंग डिसेबल करा.

  • Eufy अॅप अनइंस्टॉल करा.

आयफोन 14 प्रो मध्ये समस्या येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी अनेक यूजर्सनी याच्या बॅक कॅमेऱ्याबाबत तक्रारी केल्या होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का! 40 वर्ष ठाकरेंसाठी काम करणाऱ्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

SCROLL FOR NEXT