Jio Phone 5G Launch Soon: भारतात ५जी स्मार्टफोन्सची मागणी वाढली आहे. ५जी सेवा सुरू झाल्यामुळे ओप्पो, सॅमसंग, रेडमी, रियलमी सारख्या कंपन्या शानदार ५जी स्मार्टफोन्स लाँच करत आहेत. परंतु, आता रिलायन्स जिओ या सेगमेंटमध्ये उतरण्याच्या तयारीत आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वीच स्वस्त लॅपटॉपला बाजारात लाँच केले होते. आता कंपनी ५जी स्मार्टफोन लाँच करत धमाका करणार आहे.
Jio Phone 5G स्मार्टफोनला बेंचमार्किंग प्लेटॉर्म Geekbench वर पाहण्यात आले आहे. परंतु, रिलायन्स जिओने अधिकृतपणे स्मार्टफोनबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. गीकबेंच लिस्टमध्ये जिओच्या या अपकमिंग स्मार्टफोनच्या फीचर्सचा खुलासा झाला आहे.
हेही वाचा: Moonlighting And Tax Benefits : ‘मूनलायटिंग’च्या वाटे, नको ‘टॅक्स’चे काटे!
Jio Phone 5G चे स्पेसिफिकेशन्स लीक
रिपोर्टनुसार, Jio फोन 5G स्पोर्ट्सला मॉडेल नंबर LS1654QB5 सह पाहण्यात आले आहे. फोन Jio Phone 5G क्वालकॉन स्नॅपड्रॅगन ४८०+ SoC चिपसेटसह येईल. या ५जी डिव्हाइसमध्ये ४जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटर्नल स्टोरेज मिळण्याची शक्यता आहे. फोन अँड्राइड १२ आधारित ऑपरेटिंग सिस्टमवर काम करेल.
Jio Phone 5G चे फीचर्स
Jio Phone 5G मध्ये ९० हर्ट्ज रिफ्रेश रेटसह येणारा ६.५ इंच HD+ LCD डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे. फोन ड्यूल कॅमेरा सेटअपसह येऊ शकतो. रिपोर्टनुसार, डिव्हाइसमध्ये १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची दमदार बॅटरी मिळू शकते. Geekbench च्या सिंगल-कोर आणि मल्टी-कोर टेस्टमध्ये Jio Phone 5G ला ५४९ आणि १६६१ स्कोर मिळाला आहे.
जिओ सध्या देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये ५जी सेवा उपलब्ध करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे कंपनीचा ५जी फोन लवकरच लाँच होऊ शकते. जिओ पुढील वर्षाच्या सुरुवातीला ५जी फोन लाँच करू शकते. या फोनची किंमत खूपच कमी असण्याची शक्यता आहे. दरम्यान, कंपनीने काही दिवसांपूर्वीच जिओबूकला भारतात लाँच केले आहे. हा लॅपटॉप ११.६ इंच कॉम्पॅक्ट डिस्प्ले आणि स्नॅपड्रॅगन ६६६ चिपसेटचा सपोर्ट मिळेल. याची किंमत १५,७९९ रुपये आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.