JioBook 2023 eSakal
विज्ञान-तंत्र

JioBook 2023 : मोबाईलपेक्षाही स्वस्त! जिओचा लॅपटॉप उद्या होणार लाँच; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स

Jio Laptop : जिओच्या हा लॅपटॉप अगदी परवडणाऱ्या दरात लाँच होणार आहे.

Sudesh

रिलायन्स जिओचा आणखी एक लॅपटॉप लाँचसाठी सज्ज झाला आहे. हा लॅपटॉप स्मार्टफोनपेक्षाही कमी किंमतीत हा लॅपटॉप उपलब्ध होईल. उद्या, म्हणजेच 31 जुलैला हे जिओबुक लाँच होणार आहे. हा एक 4G लॅपटॉप असणार आहे.

इ-कॉमर्स वेबसाईट अमेझॉनवर याची विक्री होईल. अमेझॉनने आपल्या वेबसाईटवर यासाठी 'नोटिफाय मी' बटणही दिलं आहे. या लॅपटॉपमध्ये काय फीचर्स असू शकतात याबाबत माहिती समोर आली आहे.

काय असणार फीचर्स

'जिओबुक 2023' मध्ये ऑक्टा कोअर प्रोसेसर असण्याची शक्यता आहे. तसंच, याचं वजन एक किलोपेक्षा कमी (990 ग्रॅम) असणार आहे. याची बॅटरी ऑल-डे-लास्टिंग असणार आहे असा दावा कंपनीने केला आहे. यासोबतच या लॅपटॉपमध्ये 4G कनेक्टिव्हिटी मिळेल. (Jio Laptop)

जिओ ओएस

या लॅपटॉपमध्ये JioOS देण्यात येणार आहे. जिओची ही स्वतःची ऑपरेटिंग सिस्टीम आहे. तसंच, या लॅपटॉपमध्ये काही प्री-लोडेड अ‍ॅप्सदेखील देण्यात येणार आहेत. ब्लू आणि ग्रे अशा दोन रंगांमध्ये हा लॅपटॉप उपलब्ध असेल.

किंमत

JioBook 2023 या लॅपटॉपची अधिकृत किंमत अद्याप समोर आलेली नाही. मात्र, ही किंमत 20 हजार रुपयांपेक्षा कमी असल्याचा दावा करण्यात येत आहे. जिओने गेल्या वर्षी आपला पहिला लॅपटॉप 'JioBook' लाँच केला होता. यामुळे आता नवीन व्हर्जनकडून लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs BAN: बांगलादेशकडून झालेल्या पराभवाचा ऑस्ट्रेलियाने घेतला बदला! मिचेल स्टार्कचा कहर, अवघ्या २ दिवसांत कसोटी जिंकत १-१ ने बरोबरीत

Mumbai News: स्मशानभूमीतील धुरावर नियंत्रण, मुंबईतील 8 ठिकाणी 'इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर' यंत्रणा बसवणार; महापालिकेचा निर्णय

Marathi News Live Updates : 'महिला आरक्षण विधेयकाला राहुल गांधींचाच विरोध- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

IND vs SL: भरमैदानात राडा! जैस्वाल आऊट झाल्यावर श्रीलंकेन गोलंदाजाला भिडला अन् मग...; Video Viral

BMC: 'खिचडी'च्या तव्यावर 'जर्मनी'ची फोडणी! महापौर-विरोधी पक्षनेत्यात वादाचा तडका

SCROLL FOR NEXT