Jobs are not under permanent threat from AI Explained Sam Altman Sakal
विज्ञान-तंत्र

AI : नोकऱ्यांना ‘एआय’चा कायमस्वरूपी धोका नाही; सॅम आल्टमन यांनी केले स्पष्ट

‘ओपनएआय’चे सीईओ सॅम आल्टमन यांचे प्रतिपादन

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (एआय) काहीकाळ अस्वस्थता निर्माण होईल पण हेच तंत्रज्ञान कायमस्वरूपी नोकऱ्या मारणारे ठरणार नाही. या तंत्रज्ञानाच्या विकासाचा वेग हा अधिक असल्याने विविध देशांच्या सरकारांना याचा नव्या सामाजिक आणि आर्थिक परिप्रेक्ष्यामध्ये विचार करावा लागेल, असे स्पष्ट मत आंतरराष्ट्रीय पातळीवरील ‘एआय’ क्रांतीचे जनक आणि ‘ओपनएआय’चे सीईओ सॅम आल्टमन यांनी आज एका कार्यक्रमात बोलताना मांडले.

आल्टमन सध्या भारतभेटीवर आले आहेत. एखाद्या टेक सुपरस्टारकडे जे हवे असते ते सगळे काही ‘एआय’मध्ये आहे. एखादे नवे तंत्रज्ञान बाजारामध्ये आल्यानंतर ज्या प्रमाणे ते नोकऱ्यांना मारते तसेच काहीसे ‘एआय’च्या आगमनामुळे होईल पण त्यामुळेच अनेक नव्या नोकऱ्या देखील निर्माण होतील.

दोन पिढ्यांदरम्यानचे अंतर आपण लक्षात घेतले तर असे बदल होत राहतात, असेही त्यांनी स्पष्ट केले. आपली कंपनी ही सध्या तरी ‘जीपीटी-५’ च्या व्हर्जनवर काम करत नाही. हे मॉडेल प्रत्यक्षात आणण्यासाठी आम्हाला खूप सारे काम करावे लागेल.

आम्ही जेव्हा ‘चॅटजीपीटी-४’ तयार केले तेव्हा ते लाँच करण्यासाठी सहा महिन्यांपेक्षा अधिक वेळ घेतला होता. दरम्यान पहिल्या व्हर्जनचे परिणाम पाहिल्यानंतर चॅटजीपीचे दुसरे व्हर्जन आणण्याचे संशोधन सहा महिने थांबवा अशी मागणी करण्यात आल्यानेच हे संशोधन थांबविण्यात आल्याचा दावा केला जात होता.

आल्टमन यांनी त्याचा स्पष्ट शब्दांत इन्कार केला आहे. आम्ही काही नव्या संकल्पनांवर काम करत आहोत असेही आल्टमन यांनी स्पष्ट केले. आल्टमन हे त्यांच्या भारत दौऱ्यामध्ये अनेक बडे नेते आणि कंपन्यांच्या सीईओंची भेट घेणार आहेत.

आता फ्युजन वर्किंगवर भर

‘एआय’च्या स्वीकाराच्या अनुषंगाने भारतामध्ये जे काही घडते आहे ते पाहणे खरोखरच उत्कंठावर्धक आहे. हे केवळ ‘ओपन एआय’च्या बाबतीच नाही तर अन्य तंत्रज्ञानाला देखील लागू होते. एआय हे मानवजातीने आतापर्यंत विकसित केलेले सर्वांत मोठे स्थित्यंतर घडविणारे तंत्रज्ञान असून जगातील अन्य देशांनी त्याचा स्वीकार केला आहे.

जगातील महाकाय एआय सिस्टिम्सच्या नेट झिरो कुलिंगचे आमचे लक्ष्य असून भविष्यामध्ये यासाठी अपारंपरिक ऊर्जोस्रोतांचा वापर करण्यात येईल. पुढील काही वर्षे आम्ही फ्युजन कार्यप्रणालीवर भर देणार आहोत. अमर्याद स्वच्छ ऊर्जा मिळावी म्हणून आम्ही पहिला फ्युजन पॉवर प्लँट उभारत आहोत असेही आल्टमन म्हणाले.

आल्टमन पंतप्रधानांच्या भेटीला

आल्टमन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली. ‘एआय’बाबत मोदी हे उत्सुक असल्याचे पाहून मला आनंदच झाला असे ते म्हणाले. केंद्र सरकारने डिजिटल इंडिया विधेयकाच्या माध्यमातून एआयवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न चालविले असून याच विधेयकाचे रूपांतर हे माहिती तंत्रज्ञान कायद्यामध्ये होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर आल्टमन यांनी पंतप्रधानांची घेतलेली भेट महत्त्वपूर्ण मानली जाते.

सॅम आल्टमन हे एक चतुर व्यक्ती आहेत, ‘एआय’च्या नियमांबाबत त्यांचे स्वतःचे काही विचार आहेत पण भारतात आमच्याकडे देखील कुशाग्र बुद्धिमत्तेचे मनुष्यबळ आहे त्यामुळे ‘एआय’बाबत नेमके कशा पद्धतीचे कायदे असावेत याचा आम्ही आमच्या पातळीवर विचार करत आहोत.

- राजीव चंद्रशेखर, माहिती आणि तंत्रज्ञान खात्याचे राज्यमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kagal Traffic Relief Project : पुणे -बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर अडीच किमीचा पिलर फ्लायओव्हर, कागल लक्ष्मी टेकडीचे ट्राफिक कायमचे होणार कमी

Numerology : 'या' 3 मुलांकाच्या लोकांना नसतो सरकारी नोकरीचा योग; तयारीत घालवतात अनेक वर्षे, पण खाजगी क्षेत्रात मिळतं मोठं यश

Bihar CM: राजकारणात मोठी घडामोड! बिहारचे नवे मुख्यमंत्री कोण? निर्णय आता शिवराज चौहान यांच्या हाती, भाजपचा गेमचेंजर प्लॅन तयार

Ambadas Danve News: रक्ताने माखलेला शर्ट, दानवेंनी वाचवला एका व्यक्तीचा जीव...

IPL 2026, LSG vs GT: प्रसिद्ध कृष्णाचा तिखट माऱ्याने लखनौची फलंदाजी गडबडली; गिलच्या गुजरातसमोर सोपं लक्ष्य

SCROLL FOR NEXT