Ancient Martian Volcano Pit Potential Shelter for Human Expeditions esakal
विज्ञान-तंत्र

Lava Tube Mars : आता मंगळावर राहणार मानव? नासाला मंगळावर दिसले रहस्यमय खड्डे, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Secret Hole on Mars : मंगळावरील प्राचीन जीवन आणि सूक्ष्मजीवांबद्दलची रहस्यमय माहिती येणार समोर

Saisimran Ghashi

NASA : मंगळ ग्रहासंदर्भात नुकतेच एक नवीन संशोधन समोर आले आहे.मंगळावर प्राचीन ज्वालामुखींच्या बाजूला आढळलेले खड्डे मानवांसाठी आश्रयस्थान बनू शकतात, तसेच मंगळावर जीवन हाेते का याचा शोध घेण्यासाठीही उपयुक्त ठरू शकतात, असे संशोधकांचे मत आहे.

मंगळावरील धुळीच्या वातावरणामुळे आणि तापमानाच्या मोठ्या चढउतारांमुळे तिथे मानवी वसाहत करणे आव्हानकारक आहे. अशात स्थितीमध्ये मंगळावरील ज्वालामुखीच्या बाजूला आढळलेले हे रहस्यमय छिद्र आशादायक ठरू शकतात.

नासाच्या MRO (Mars Reconnaissance Orbiter) या अवकाशयानाच्या हाय-रिझोल्यूशन इमेजिंग सायन्स एक्सपेरिमेंट (HiRISE) कॅमेराद्वारे २०२२ च्या ऑगस्टमध्ये हे खड्डे आढळले. हे खड्डे आर्सीया मॉन्स या आता निष्क्रिय झालेल्या ज्वालामुखीच्या बाजूला असून फक्त काही मीटर रुंद आहेत.

साधारणपणे ज्वालामुखींपासून बाहेर वाहणारी लावा मोठ्या भुयारी नलिका तयार करते. या नलिका गरम पदार्थांच्या हालचालीसाठी उपयुक्त ठरतात. ज्वालामुखीच्या बाजूंना अशी विविध छिद्रे आढळतात. परंतु हे विशेष खड्डे खालच्या दिशेने असल्याचे दिसून येते. जर या बाबीची पुष्टी झाली तर या खड्ड्याच्या पुढे एखादी गुहा प्रणाली असू शकते.

मंगळावर जर पृथ्वी किंवा चंद्राशी साम्य असेल तर या रिक्त लावा नलिका (स्कायलाईट्स) मानवी वसाहतींसाठी उपयुक्त आश्रयस्थान म्हणून काम करू शकतात.

तरी, या खड्ड्यांपैकी एका खड्ड्याची बाजूची भिंत दिसून येते. त्यामुळे ते लाटण्यासारखे आकाराची शक्यता आहे. अशा प्रकारच्या छिद्रांना 'पिट क्रेटर्स' असे म्हणतात पृथ्वीवर त्यांची खोली ६ ते १८६ मीटर इतकी असते, तर या बातमीतील छायाचित्रातील आर्सीया मॉन्सवरील खड्डे १७८ मीटर खोल आहे.

यासारखे खड्डे वैज्ञानिकांना मंगळावरील प्राचीन जीवनाबद्दल तसेच तिथे अजूनही सूक्ष्मजीवन आहे का याचा शोध घेण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

Latest Maharashtra News Updates : हांडेवाडीमध्ये टायर साठ्याच्या शेडला भीषण आग

ST Pass : एकाच महिन्यात 5 लाख विद्यार्थ्यांना शाळेत मिळाले एसटी पास; कोणाला मिळतो सवलतीचा पास? वाचा...

Indian Women Cricket Team: भारतीय महिला संघ आज रचणार इतिहास; T20 मालिका जिंकण्याची संधी

"निलेश तू कसा आहेस माहितीये..." साबळेंच्या व्हायरल व्हिडिओनंतर मराठी अभिनेता झाला व्यक्त ; म्हणाला..

SCROLL FOR NEXT