Lava
Lava Sakal
विज्ञान-तंत्र

Lava Smartphone: अवघ्या ७ हजारात आला भारतीय कंपनीचा दमदार स्मार्टफोन, खरेदीवर ३ हजारांचे बड्स एकदम फ्री

सकाळ डिजिटल टीम

Lava X3 Smartphone Launched: भारतीय स्मार्टफोन निर्माता कंपनी Lava ने भारतीय बाजारात आपल्या स्वस्त हँडसेटला लाँच केले आहे. कंपनीने Lava X3 स्मार्टफोनला लाँच केले आहे. कंपनी सातत्याने भारतीय बाजारात स्वस्त हँडसेट्सला लाँच करत आहे. नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या Lava X3 स्मार्टफोनची किंमत ८ हजार रुपयांपेक्षा कमी आहे. हा फोन Redmi A1+, Realme C33 ला जोरदार टक्कर देईल.

हेही वाचा: काय आहे सलाम किंवा कुर्निसाताचे महत्त्व राजशिष्टाचारांमध्ये

Lava X3 चे स्पेसिफिकेशन्स

Lava X3 मध्ये ६.५३ इंच IPS LCD डिस्प्ले देण्यात आला असून, जो एचडी प्लस रिझॉल्यूशनसह येतो. फोनच्या बॅक पॅनेलवर पिल-शेप्ड कॅमेरा मॉड्यूल आणि एक कन्वेंशनल फिंगरप्रिंट स्कॅनर दिला आहे. कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर यात ८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसर आणि VGA सेकेंडरी लेंससह एलईडी फ्लॅशचा सपोर्ट मिळेल. सेल्फीसाठी ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

लावाचा हा फोन क्वाड-कोर हेलियो A२२ प्रोसेसरसह येतो. यामध्ये ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज मिळेल. फोनच्या स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवू शकता. यात पॉवर बॅकअपसाठी १० वॉट चार्जिंग सपोर्टसह ४००० एमएएचची दमदार बॅटरी मिळेल. फोन अँड्राइड १२ गो एडिशन आउट ऑफ द बॉक्सवर काम करतो. कनेक्टिव्हिटीसाठी यात 4G VoLTE, USB–C पोर्ट, 3.5mm हेडफोन जॅक, ब्लूटूथ, WiFi आणि GPS सारखे फीचर्स देखील मिळतील.

नेकबँड मिळेल फ्री

Lava X3 स्मार्टफोनची किंमत फक्त ६,९९९ रुपये आहे. फोन आर्कटिक ब्लू, चारकोल ब्लॅक आणि लस्टर ब्लू रंगात उपलब्ध आहे. या फोनला २० डिसेंबरपर्यंत प्री-ऑर्डर करू शकता. फोनला प्री-ऑर्डर केल्यास २,९९९ रुपयांचे लावा प्रो बड्स एन११ नेकबँड मोफत मिळतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Final LIVE Score : स्टार्क पाठोपाठ हैदराबादचं 'हेड'ही पडलं; वैभवनं दिला दुसरा धक्का

IPL Final, KKR vs SRH: 'सर्वोत्तम संघच...!', चेन्नईच्या मैदानात भिडण्यापूर्वीच कमिन्स-अय्यरमध्ये रंगलं शाब्दिक युद्ध

Pune Porsche accident : पुणे अपघात प्रकरणात रॅप साँग करणारा आर्यन म्हणतो, मी मिडल क्लास असल्यामुळे...

Rajkot TRP Game Zone Fire: राजकोट गेमिंग झोन प्रकरणी कारवाईला वेग; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल, 2 अटकेत, 4जणांचा शोध

Shreyas Iyer : अय्यरची गिरकी तरी कमिन्सचीच सरशी! टॉसवेळी झाला वेगळाच ड्रामा

SCROLL FOR NEXT