Lyrid meteor shower  sakal
विज्ञान-तंत्र

Lyrid उल्कावर्षाव पाहण्याची संधी, भारतात या शहरात दिसणार नजारा

हा उल्कावर्षाव भारतभर देशातील सर्व शहरांमध्ये दिसणार आहे

सकाळ डिजिटल टीम

अवकाश निरीक्षकांसाठी आजचा दिवस खुप खास राहणार आहे. कारण लिरीड्स उल्कावर्षाव अनुभवण्याची चांगली संधी आज मिळणार आहे. हा उल्कावर्षाव भारतभर देशातील सर्व शहरांमध्ये दिसणार आहे. विशेष म्हणजे कोणत्याही दुर्बिणीशिवाय हा वर्षाव पाहाता येईल. विशेषत: कोलकाता, दिल्ली आणि देशाच्या इतर भागांमध्ये 8:31 च्या सुमारास हा उल्कावर्षाव होणार आहे. आज रात्री पासून आणि 29 एप्रिलपर्यंत दर तासाला हा उल्का वर्षाव पाहायला मिळणार. (Lyrid meteor will peak in Indian skies tonight and will continuously pass through till April 29 at nearly 10-15 meteors every hour)

लिरिड उल्कावर्षाव कशामुळे होतो

लिरीड उल्का हे धूमकेतू थॅचरचे छोटे तुकडे आहेत. हा धूमकेतू दीर्घ कालावधीचा आहे, तो दर ४१५ वर्षांनी एकदा सूर्याभोवती फिरतो. धूमकेतूच्या अनेक प्रदक्षिणांमधून उरलेला कचरा आणि धूळ दरवर्षी लिरीड उल्कावर्षाव तयार करते.

जेव्हा पृथ्वी धूमकेतूचा मार्ग ओलांडते, धूमकेतूच्या ढिगाऱ्यावर आदळते तेव्हा उल्कावर्षाव होतो. म्हणूनच ते दरवर्षी एकाच वेळी घडतात आणि आकाशातील विशिष्ट बिंदूंवरून येतात. जेव्हा उल्का वातावरणात जळतात तेव्हा ते आकाशात चमकदार रेषा सोडतात आणि सामान्यतः "शूटिंग स्टार" म्हणून ओळखले जातात.

उल्का वर्षाव कधी दिसतो?

वर्षभरात एप्रिल, मे, जून, ऑगस्ट, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये उल्का वर्षाव दिसतो. लिरीड्स उल्कावर्षाव 22 किंवा 23 एप्रिल रोजी येतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT