Mahindra Bolero esakal
विज्ञान-तंत्र

Mahindra Bolero : महिंद्रा बोलेरोमध्ये होणार हे खास बदल

महिंद्रा अँड महिंद्राची सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही म्हणजे बोलेरो

सकाळ डिजिटल टीम

Mahindra Bolero : महिंद्रा अँड महिंद्राची सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही म्हणजे बोलेरो. टिकाऊपणा आणि मायलेजमुळे खेड्यापाड्यात आणि शहरांमध्ये याला मोठी मागणी आहे.आता महिंद्रा बोलेरो लव्हर्ससाठी खास बातमी आहे. येत्या काळात महिंद्रा बोलेरो अपडेट होण्याची शक्यता आहे.

मात्र याबाबत कंपनीकडून कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही. वृत्तानुसार, नवीन बोलेरो त्याच प्लॅटफॉर्मवर तयार केली जाईल जी स्कॉर्पिओ एनच्या खाली आहे. नवीन बोलेरोच्या आकारात थोडे बदल केले जातील. सध्याच्या मॉडेलपेक्षा ही गाडी मोठी असण्याची शक्यता आहे.

नवीन महिंद्रा बोलेरोच्या एक्सटीरियर मध्ये किरकोळ बदल केले जाऊ शकतात. फ्रंट फॅशियामध्ये क्रोम टच, 7-स्लॉट ग्रिल, ब्रँडचा नवीन लोगो, एलईडी हेडलाइट्स, अपडेटेड बंपर आणि क्रोम फिनिशसह फॉग लॅम्प यांसारख्या अपडेटसह ऑफर केले जाऊ शकतात. यासह, महिंद्रा त्याच्या आगामी एसयूव्हीच्या फिटिंग्ज आणि मटेरियल क्वालिटी मध्ये सुधारणा करू शकते .

नव्या महिंद्रा बोलेरोचे फीचर्स

नवीन महिंद्रा बोलेरो मध्ये मल्टी फंक्शनल स्टीयरिंग व्हील, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, हाईट एडजस्टेबल ड्रायव्हर सीट आणि ऑटोमॅटिक एसी युनिट दिले जातील. याशिवाय एसयूव्हीमधील बाकीचे फिचर्स सध्याच्या मॉडेलप्रमाणे असतील. यामध्ये पॉवर विंडो, 12V ऍक्सेसरी सॉकेट, ऑडिओ सिस्टीममधील ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, रिमोट लॉकिंग, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, इंजिन स्टार्ट-स्टॉप सिस्टम समाविष्ट आहेत.

बोलेरो सेफ्टी

सेफ्टीबद्दल बोलायचं झाल्यास, नवीन बोलेरोला ड्रायव्हर एअरबॅग, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS), पार्किंग सेन्सर आणि फ्रंट सीट बेल्ट देण्यात येईल.

बोलेरो इंजिन

रिपोर्ट्सनुसार, नव्या जनरेशनच्या महिंद्रा बोलेरोला दोन इंजिनांचे ऑप्शन मिळतील. यापैकी एक 2.2L mHawk डिझेल इंजिन असेल आणि दुसरे 2.0L टर्बो-पेट्रोल इंजिन असेल. हे दोन्ही इंजिन मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स ऑप्शनसह मिळतील.

नव्या बोलेरोची किंमत

आता इतके बदल केल्यावर बोलेरोची किंमतही वाढणार हे निश्चित आहे. सध्या, बोलेरो मॉडेल लाइनअपची किंमत 9.78 लाख ते 10.79 लाख रुपये आहे. या किंमती एक्स-शोरूमनुसार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extension: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना सरकारकडून दिलासा; अखेर eKYC साठी जाहीर केली मुदतवाढ

Crime: सासरा आणि सूनेचं प्रेम जडलं; अडसर ठरणाऱ्या मुलाचा काटा काढला, मात्र एका चुकीनं बाप पोलिसांच्या जाळ्यात अडकला

Kannad Nagarparishad Election : कन्नडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांचा युतीचा फॉर्म्युला ठरला; जिल्हाध्यक्ष संजय खंबायते यांची माहिती

Dharur Nagarparishad Election : धारूर नगरपरिषदेत चौरंगी लढत रंगणार! अध्यक्षपदासाठी १६, तर नगरसेवक पदासाठी तब्बल १५१ नामनिर्देशन पत्र दाखल

Latest Marathi Breaking News: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT