Mahindra Thar Sakal
विज्ञान-तंत्र

Mahindra Thar: महिंद्राने लाँच केले Thar चे सर्वात स्वस्त व्हेरिएंट, फीचर्स एकापेक्षा एक जबरदस्त

Mahindra ने आपली ऑफ रोड एसयूव्ही महिंद्रा थारचे (Mahindra Thar SUV) स्वस्त व्हेरिएंट लाँच केले आहे. या एसयूव्हीची सुरुवाती किंमत ९.९९ लाख रुपये आहे.

सकाळ डिजिटल टीम

Mahindra Thar 2 RWD Launched: Mahindra ने आपली ऑफ रोड एसयूव्ही महिंद्रा थारचे (Mahindra Thar SUV) स्वस्त व्हेरिएंट लाँच केले आहे. कंपनीने अनेक बदल करत Mahindra Thar 2 RWD ला सादर केले आहे. नवीन एसयूव्हीच्या कलर, पॉवरट्रेन आणि फीचर्समध्ये बदल पाहायला मिळेल.

कंपनीने या मॉडेलला MT AX(O)(Diesel), MT LX (Diesel) आणि AT LX (Petrol) या तीन व्हेरिएंटमध्ये सादर केले आहे. Mahindra Thar 2 RWD च्या किंमत आणि फीचर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Mahindra Thar 2WD चे फीचर्स

महिंद्रा थार २ व्हील ड्राइव्हची सुरुवाती किंमत ९.९९ लाख रुपये आहे. तर टॉप व्हेरिएंटची किंमत १३,४९ लाख रुपये आहे. ग्राहक या एसूव्हीला कंपनीची अधिकृत वेबसाइट आणि जवळील डीलरशिपच्या माध्यमातून बूक करू शकता. ही एसयूव्ही Blazing Bronze आणि Everest White रंगात येते.

Mahindra Thar 2WD चे इंजिन आणि फीचर्स

Mahindra Thar 2WD मध्ये पेट्रोल आणि डिझेल इंजिनचा पर्याय मिळतो. यात २.० लीटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले असून, हे १५२ एचपी पॉवर आणि ३२० एनएम टॉर्क जनरेट करते. तर दुसरे १.५ लीटर डिझेल इंजिन आहे, जे ११७ एचपी पॉवर आणि ३०० एनएम पीक टॉर्क जनरेट करते. दोन्ही इंजिन ६ स्पीड मॅन्यूअल आणि ६ स्पीड टॉर्क कनव्हर्ट ट्रान्समिशनसह येतात.

हेही वाचा: ChatGPT: Google चे धाबे दणाणार, टक्कर देण्यासाठी Microsoft-ChatGPT ने तयार केला खास प्लॅन

फीचर्सबद्दल सांगायचे तर यामध्ये अँड्राइड ऑटो आणि अ‍ॅपल कारप्ले कनेक्टिव्हिटीसह येणारा ७ इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, क्रूजर कंट्रोल, हॅलोजन लाइट्स, इलेक्ट्रिक कंट्रोल्ड एसी, स्टेअरिंग माउंटेड कंट्रोल्स आणि रिमूव्हेबल रूफ पॅनेलऐवजी हार्ड टॉप रुफ पॅनेल देण्यात आला आहे.

एसयूव्हीच्या फ्रंटला ड्यूल एअरबॅग्स, ईबीडीह अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, हिल डिसेंट कंट्रोल, रियर पार्किंग सेंसर आणि फ्रंट सीट बेल्ट रिमाइंडर सारखे फीचर्स मिळतील. महिंद्रा थारचे हे स्वस्त व्हेरिएंट मारुती जिम्नी ५ डोर आणि फोर्स गुरखाला टक्कर देईल.

हेही वाचा: द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT