jimny Vs Thar Esakal
विज्ञान-तंत्र

Jimny Vs. Thar : कोणती लाईफस्टाईल एसयूव्ही आहे तुमच्यासाठी योग्य? फीचर्स वाचा अन् निर्णय घ्या

नुकतेच कंपनीने जिम्नीचे मायलेज जाहीर केले आहे. यामुळे आता दोन्ही गाड्यांमध्ये तुलना करणे शक्य होत आहे.

Sudesh

देशातील सर्वात मोठी गाडी बनवणारी कंपनी असलेली मारुती लवकरच आपली नवीन कार 'जिम्नी' लाँच करणार आहे. लाईफस्टाईल एसयूव्ही या प्रकारात मोडणारी ही कार, महिंद्राच्या थारला चांगलीच टक्कर देणार आहे. त्यामुळे थार घ्यावी की जिम्नी याबाबत बऱ्याच लोकांच्या मनात संभ्रम आहे.

तुमच्याही मनात याबाबत कन्फ्यूजन असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. नुकतेच जिम्नीच्या मायलेजबाबत कंपनीने माहिती जाहीर केली आहे. यामुळे आता दोन्ही गाड्यांमध्ये तुलना करणे शक्य होत आहे. तेव्हा जिम्नीची प्रतीक्षा करायची, की थार घेऊन टाकायची याचा निर्णय घेणं सोपं जाणार आहे.

मायलेजमध्ये कोण बेस्ट?

मारुतीच्या जिम्नी या एसयूव्हीचं ऑटोमॅटिक व्हेरियंट हे १६.३९ किलोमीटर प्रति लिटर एवढं मायलेज देतं. तर, मॅन्युअल व्हेरियंट हे १६.९४ किलोमीटर प्रति लिटर एवढं मायलेज देतं. दुसरीकडे महिंद्रा थारच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, या कारचं पेट्रोल व्हेरियंट १५.२ किलोमीटर प्रति लिटर एवढं मायलेज देतं.

थारचं इंजिन दमदार

थारचं मायलेज कमी असण्याचं कारण म्हणजे तिचं दमदार इंजिन. थारमद्ये २.० लीटर टर्बो पेट्रोल इंजिन मिळतं. यात ६-स्पीड मॅन्युअल किंवा ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देण्यात आला आहे. हे इंजिन १५० एचपी क्षमतेची पॉवर आणि ३०० एनएमचा पीक टॉर्क जनरेट करू शकतं.

दुसरीकडे, जिम्नीमध्ये १.५ लीटर नॅचुरली अ‍ॅस्पिरेटेड के15बी सीरीजचं पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. यामध्ये ५-स्पीड मॅन्युअल किंवा ४-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स मिळतो. हे इंजिन १०३ बीएचपी पॉवर आणि १३४ एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते.

किंमत ठरू शकते गेमचेंजर

या दोन्ही कारमध्ये कोणती घ्यावी हे ठरवण्यासाठी प्राईज फॅक्टर भरपूर महत्त्वाचा ठरू शकतो. सध्या थारची किंमत १३ ते १६ लाखांमध्ये जाते. तर, तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार जिम्नीची किंमत दहा ते बारा लाखांपासून सुरू होऊ शकते.

त्यामुळे स्वस्त आणि चांगले मायलेज देणारी कार हवी असणारे व्यक्ती जिम्नी घेण्याचा विचार करू शकतात. तर, ज्यांना परफॉर्मन्स आणि पॉवर महत्त्वाची वाटते, ते थारचा विचार करू शकतील. शिवाय या दोन्ही कारचे लुक्स पाहून देखील याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. जूनच्या पहिल्या आठवड्यात जिम्नी लाँच होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT