Tata Tiago CNG
Tata Tiago CNG google
विज्ञान-तंत्र

Tata आणि Maruti च्या या दोन नव्या CNG कार; देतील दमदार मायलेज

सकाळ डिजिटल टीम

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे सध्या कार मालकांच्या डोक्याला ताप झाला आहे. देशात पेट्रोलच्या किंमतीचा भडका उडाला आहे काही ठिकाणी तर किंमतीने शतक ओलांडले आहे, त्यामुळे लोक इतर इंधन पर्यायांकडे वळत आहेत. त्यामुळे आता सीएनजी कारची मागणी झपाट्याने वाढत आहे. ग्राहकांची ही आवड लक्षात घेऊन कार बनवणाऱ्या कंपन्या देखील त्यांची वाहने सीएनजी कारमध्ये अपडेट करत आहेत.

नोव्हेंबर महिन्यात मारुती सुझुकी आणि टाटा मोटर्स या दोन्ही कंपन्या सीएनजी कार बाजारात आणण्याच्या तयारीत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, मारुती सुझुकी आपल्या प्रसिद्ध हॅचबॅक कार सेलेरियोच्या नेक्स्ट जनरेशन मॉडेल सीएनजी किटसह सादर करणार आहे. तर टाटा मोटर्स आपली पहिली सीएनजी कार टाटा टियागो लॉंच करणार आहे. चला तर मग जाणून घेऊया या कार्स बद्दल -

Maruti Celerio CNG

कंपनी मारुती सुझुकी सेलेरियोच्या नेक्स्ट जनरेशन मॉडेलवर बऱ्याच दिवसांपासून काम करत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी लवकरच ही कार बाजारात आणू शकते. कंपनीने ही हॅचबॅक कार 2014 मध्ये पहिल्यांदा सादर केली होती. कंपनी या कारच्या निर्मितीमध्ये हार्टेक्ट प्लॅटफॉर्मचा वापर करत आहे आणि ती आकारानेही मोठी असेल. 1.0 लीटर के-सीरीज आणि 1.2 लिटर पेट्रोल इंजिनसह ही कार बाजारात लाँच केली जाऊ शकते.

कंपनीने या कारमध्ये राऊंडेट ट्रँग्युलर हेडलॅम्पसह स्लिम फ्रंट ग्रिल्स दिले आहेत. समोर एक ब्लॅक क्लॅडिंग दिली आहे जी धुके फॉग लँप तसेच एअर डॅम कव्हर करते. साइड प्रोफाईलबद्दल बोलायचे तर, ब्लॅक आऊट अलॉय व्हील्ससह नवीन डोअर हँडल देखील देण्यात आले आहेत. मागील बाजूस, नवीन डिझाइन टेललॅम्प आणि बंपर देण्यात आले आहे.

Tata Tiago CNG

टाटा मोटर्स नोव्हेंबर महिन्यात आपली पहिली सीएनजी कार लॉन्च करण्याच्या तयारी करत आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की, कंपनी पुढील महिन्यापर्यंत टियागो सीएनजी बाजारात आणू शकते. सध्याच्या Tata Tiago मध्ये, कंपनीने 3 सिलिंडरसह 1.2 लिटर क्षमतेचे नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन वापरले आहे. जे 86 PS पॉवर आणि 113 Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक (AMT) गिअरबॉक्ससह येते. असे मानले जाते की त्याचे CNG प्रकार केवळ मॅन्युअल ट्रांसमिशनसह ऑफर केला जाईल.

एकूण 10 प्रकारांमध्ये येत असलेल्या या कारची किंमत 4.99 लाख रुपयांपासून ते 7.04 लाख रुपयांपर्यंत आहे. अलीकडेच, कंपनीने नवीन फेसलिफ्ट टियागो एनआरजी लाँच केले आहे, ज्याची किंमत 6.57 लाख रुपये आहे. ही कार मायलेजच्या बाबतीतही खूप चांगली असून सर्वसाधारणपणे ही कार 23 ते 24 kmpl चा मायलेज देते. मात्र Tiago CNG किती मायलेज देईल याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. आता मारुती आणि टाटाच्या या गाड्या मायलेजच्या बाबतीत एकमेकांपेक्षा कितपत सरस ठरतील हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: कल्याण लोकसभेत सगळे रेकॉर्ड मोडा, गुलाल उधळायला मी स्वतः येणार!

Crime News : प्रेम प्रकरणातून तरुणाचा स्क्रू ड्रायव्हरने खून; बहिणीसमोरच भररस्त्यात प्रियकराला भोसकले

LED Screen Cleaning: घरगुती वस्तूंनी LED स्क्रीन करा स्वच्छ, फक्त करू नका 'या' चुका

Madgaon Express: बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर ओटीटीवर रिलीज झाला 'मडगाव एक्सप्रेस'; कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहू शकता चित्रपट? जाणून घ्या...

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नवी मुंबईत

SCROLL FOR NEXT