Message edit feature in WhatsApp Sakal
विज्ञान-तंत्र

WhatsAppमध्ये येत आहे 'मेसेज एडिट फिचर'; जाणून घ्या सविस्तर

व्हॉट्सअ‍ॅपच्या एडिट बटणाची बीटा व्हर्जनवर चाचणी केली जात आहे.

सकाळ डिजिटल टीम

Message edit feature in WhatsApp: ट्विटरमध्ये एडीट बटणाची प्रतीक्षा खूप दिवसांपासून सुरू आहे आणि ही प्रतीक्षा आता आणखी लांबणार आहे. पण व्हॉट्सअ‍ॅपने मात्र ते गांभीर्याने घेतल्याचे दिसत आहे. रिपोर्टनुसार, व्हॉट्सअ‍ॅप एडिट बटणावर काम करत आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या एडिट बटणाची बीटा व्हर्जनवर चाचणी केली जात आहे, हे फिचर्स कार्यरत झाल्यावर यूजर्स एखादा व्हॉट्सअ‍ॅप मेसेज पाठवल्यानंतरही तो आरामात एडिट करू शकतील.

व्हॉट्सअ‍ॅप मेसेज एडिटिंग फिचरचा स्क्रीनशॉटही समोर आला आहे. Wabetainfo ने आपल्या अहवालात म्हटले आहे की, WhatsApp गेल्या पाच वर्षांपासून एडिट फिचरवर काम करत आहे आणि आता त्याची चाचणी सुरू झाली आहे. नवीन फिचरची सध्या अँड्रॉइडवर चाचणी सुरू आहे आणि लवकरच iOS आणि डेस्कटॉप व्हर्जनवर त्याची चाचणी सुरू होईल अशी अपेक्षा आहे.

मेटा-मालकीचे व्हॉट्सअ‍ॅप आणखी एका मोठ्या फिचरवर काम करत आहे. नवीन अपडेटनंतर तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप सोडल्यास अ‍ॅडमिनशिवाय कोणालाही काही कळणार नाही. व्हॉट्सअ‍ॅपच्या फिचरचा मागोवा घेणाऱ्या WABetaInfo ने नवीन फिचरची माहिती दिली आहे. नवीन फिचर सध्या बीटा चाचणीत आहे. नवीन फिचर आणल्यानंतर केवळ ग्रुप अ‍ॅडमिनलाच ग्रुप सोडण्याचे नोटिफिकेशन मिळेल.

याशिवाय व्हॉट्सअ‍ॅप एका नवीन अपडेटवरही काम करत आहे, ज्यानंतर 512 लोकांना व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये जोडता येईल. या नवीन फिचरचा स्क्रीनशॉट देखील समोर आला आहे, ज्यामध्ये 512 लोकांना ग्रुपमध्ये अ‍ॅड करण्याचा पर्याय मिळत असल्याचे दिसून येते. नवीन फिचरची चाचणी iOS च्या बीटा आवृत्तीवर केली जात आहे. नवीन फिचर शाळा, महाविद्यालये, कोणतीही संस्था आणि लहान व्यवसायांसाठी खूप उपयुक्त ठरेल. सध्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये केवळ 256 लोकांनाच जोडता येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT