एमजी ॲस्टर
एमजी ॲस्टर एमजी ॲस्टर
विज्ञान-तंत्र

एमजी ॲस्टरमध्ये आहेत ५ जबरदस्त फीचर्स; वाचा...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : जून २०१९ मध्ये भारतातील पहिली इंटरनेट कार हेक्टरच्या लॉन्चसह एमजी मोटर्सने भारतीय बाजारात दिमाखदार प्रवेश केला. हेक्टरने एमजीला एक ब्रँड म्हणून विकसित केले. यानंतर लॉन्च करण्यात आलेल्या झेडएस ईव्ही आणि ग्लोस्टरने ही विकासगाथा पुढे नेली. आता एमजी मोटर अनोख्या फीचर्सने सुसज्ज अशा ‘ॲस्टर’च्या लॉन्चसह मध्यम आकाराच्या एसयूव्ही सेग्मेंटमध्ये प्रतिस्पर्ध्यांना टक्कर देण्यास सज्ज झाली आहे. जाणून घेऊया एमजी ॲस्टरमधील सर्वोत्तम ५ फीचर्सबद्दल...

फोन हीच किल्ली

एमजीने ॲस्टरसाठी या सेग्मेंटमध्ये पहिल्यांदाच डिजिटल किल्ली आणली आहे. तुम्ही तुमच्या गाडीची किल्ली कुठे तरी विसरलात किंवा तुमच्याकडून ती हरवली तर डीजिटल की फीचरच्या मदतीने गाडी सहज लॉक, अनलॉक किंवा स्टार्ट करू शकता. हे फीचर आय-स्मार्ट ॲपमध्ये उपलब्ध असून, ते ब्लू-टुथच्या मदतीने ऑपरेट करता येते. एखाद्याने स्मार्टफोन चोरला आणि तुमची एमजी ॲस्टर डिजिटल कीच्या मदतीने उघडण्याचा प्रयत्न केला तर? काळजीचे काहीच कारण नाही. कार लॉक केल्यानंतर फक्त डिजिटल की डिसेबल करून टाका. पुन्हा ती वापरण्याची वेळ येईल, त्यावेळी ती आधी तुम्हाला पासवर्ड विचारेल. कारण, ती पासवर्ड-प्रोटेक्टेड आहे.

डोकेबाज कार

ॲस्टरमध्ये डॅशबोर्डवर एक छोटा रोबो आहे. जो तुमच्या व्यक्तिगत एआय साहाय्यकाचे काम करतो. डॅशबोर्डवर मूर्तीच्या जागी तो असतो. स्टार डिझाइन या यूएस-स्थित कंपनीने डिझाइन केलेला हा रोबो इमोटिकॉन्सच्या रूपात भावना व्यक्त करून प्रतिसाद देतो. तो ज्याच्याशी बोलत असतो त्याच्याकडे डोकेही वळवतो. व्हॉईस असिस्टंट प्रमाणे, हा रोबो स्त्रीच्या आवाजात बोलतो. शिवाय तो तुमच्यासाठी गाणे म्हणू शकतो, जोक सांगू शकतो आणि विकिपीडिया पाहून तुमच्या शंकांचे समाधान करू शकतो. तसेच बातम्या वाचून दाखवू शकतो. हा रोबो सनरूफ उघडू शकतो आणि नेव्हिगेशन सुरू करू शकतो. अशी एकूण सुमारे ८० कनेक्टेड कार फीचर्स ॲस्टरमध्ये आहेत.

लेव्हल २ एडीएएस

ॲस्टरमध्ये सेग्मेंट-फर्स्ट ॲड्व्हांस्ड ड्रायव्हर असिस्टंस सिस्टम (एडीएएस) सुद्धा आहे. या सिस्टममध्ये आहे, ॲड्व्हांस्ड क्रूझ कंट्रोल, पुढच्या बाजूने टक्कर होण्याची चेतावणी, ऑटो इमर्जन्सी ब्रेकिंग, एका लेनमध्ये रहण्यास मदत, लेन सोडू नये याची खबरदारी, ब्लाइंड-स्पॉट डिटेक्शन आणि स्पीड साहाय्य अशी एकूण १४ ऑटोनोमस फीचर्स. शिवाय, या कारमध्ये सहा एअरबॅग्ज, हिल डिसेंट, चारही चाकांवर डिस्क ब्रेक, ३६०-डिग्री कॅमेरा, कॉर्नरिंग असिस्ट फॉगलॅम्प आणि इलेक्ट्रिक पार्क ब्रेक आहेत.

ॲस्टरमध्ये आहे लेन असिस्ट फंक्शन्सचे त्रिकूट

कार उत्पादकाने लेन फंक्शन्स अंतर्गत तीन फीचर्स दिली आहेत. लेन डिपार्चर वॉर्निंग, लेन कीप असिस्ट आणि लेन डिपार्चर प्रोव्हिजन. लेन कीप असिस्ट हे फंक्शन गाडीच्या पुढच्या बाजूस बसवलेल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून पार पाडते. हा कॅमेरा लेन मार्किंगवर लक्ष ठेवतो आणि गाडी ज्या लेनमध्ये आहे त्याच लेनमध्ये ठेवण्यासाठी कार चालकाला मदत करतो. हे ड्रायव्हरला गाडी चालवताना एकाच लेनमध्ये गाडी ठेवण्यास मदत करते. लेन डिपार्चर वॉर्निंग लेन बदलताना ड्रायव्हरला एक नोटिफिकेशन पाठवते, तर लेन डिपार्चर प्रोव्हिजन ब्रेक लावून गाडीला लेन बदल्यापासून रोखते. गाडीचा वेग ताशी ६० किमी झाल्यानंतर ही फंक्शन्स सक्रिय होतात. जेव्हा ड्रायव्हर इंडिकेटर दिल्याशिवाय लेनमधून हलतो, तेव्हा लेन डिपार्चर वॉर्निंग सक्रिय होते आणि मग ड्रायव्हरला एक ॲलर्ट पाठवण्यात येतो.

ॲक्टिव्ह क्रूज कंट्रोल

ॲडाप्टिव्ह क्रूज कंट्रोल ही नियमित क्रूज कंट्रोलची प्रगत आवृत्ती आहे आणि हे फीचर आधुनिक गाड्यांमध्ये अगदी सामान्य झाले आहे. सिस्टम पुढे असलेल्या गाडीशी आपल्या गाडीचा वेग जुळवून बघते आणि पुढच्या गाडीशी बरोबरी करून आपल्या गाडीचा वेग कमी-जास्त करते. जेव्हा ड्रायव्हर स्टिअरिंग व्हीलच्या मागची यॉ स्टिक आपल्याकडे खेचतो, तेव्हा ॲक्टिव्ह क्रूज कंट्रोल सक्रिय होते. ॲक्टिव्ह क्रूज कंट्रोल सक्रिय होण्यासाठी कारचा वेग कमीत कमी ३० किमी प्रति तास असणे आवश्यक आहे. कारची चालण्याची गती लिव्हर वर किंवा खाली दाबून अनुक्रमे वाढवता किंवा कमी करता येते. लिव्हरच्या टोकाशी असलेले बटण चालण्याची गती स्थिर करते. कार जेव्हा सेट केलेल्या गतीवर पोहोचते किंवा पुढची कार ज्या गतीने चालत असेल, त्या गतीवर पोहोचते, तेव्हा कार स्थिर होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Weather Update : मतदानाच्या दिवशी पावसाची शक्यता; पुढील चार दिवस दुपारनंतर ढगाळ हवामानाचा अंदाज

Watch Video: "घरात बसून कोणाचे चांगले होणार नाही," कॅलिफोर्नियातील 83 वर्षीय आजींनी मतदानासाठी थेट गाठली बारामती

Thane News: आनंद दिघेंच आनंद आश्रमच मुख्यमंत्री शिंदेंनी हडपल, राऊतांचा थेट आरोप

Arvind Ltd. : अरविंद लिमिटेडच्या शेअर्सकडून गुंतवणुकदारांना छप्परफाड कमाई, एका वर्षात 200% वाढ...

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान मोदींच्या रोड शो साठी महायुतीच्या नेत्यांची पुण्यात बैठक

SCROLL FOR NEXT