Mini Arctic Ultra Air Cooler esakal
विज्ञान-तंत्र

Mini Arctic Ultra Air Cooler : आता फक्त 1225 रुपयांत मिळणार पाण्यावर चालणारा एसी!

कडक उन्हाची चाहूल लागताच कूलर आणि एसीची मागणी वाढते

सकाळ डिजिटल टीम

Mini Arctic Ultra Air Cooler : कडक उन्हाची चाहूल लागताच कूलर आणि एसीची मागणी वाढते. पण घरातील प्रत्येक खोलीत एसी बसवणे प्रत्येकाच्या बजेटमध्ये नसते तरी ही आपल्याला उष्णतेपासून आपला बचाव करायचा असतो. पण आज आम्ही तुम्हाला अशा एसी बद्दल सांगणार आहोत जो मिळतोय फक्त 1225 रुपयांत.

आता पहिली गोष्ट म्हणजे एसीची किंमत खूप जास्त आहे आणि दुसरे म्हणजे यामुळे वीज बिलही दुप्पट होते. पण इथे आम्ही अशा एअर कूलर (AC) बद्दल बोलत आहोत, जो 1500 रुपयांपेक्षा स्वस्त आहे. तसेच, याला ऑपरेट करण्यासाठी पॉवर प्लगची आवश्यकता नाही, तसेच तुमचे वीज बिल वेगाने वाढणार नाही.

आम्ही सांगतोय घराच्या कोणत्याही कोपऱ्यात फिट बसणाऱ्या मिनी एसीबद्दल. Amazon च्या वेबसाइटवर तुम्ही Mini Arctic Ultra Air Cooler खरेदी करू शकता. लॅपटॉप किंवा पॉवर बँकमधील यूएसबीशी कनेक्ट करून हा एसी ऑपरेट केला जाऊ शकतो.

हा एसी चालवायला फक्त 8 वॅट पॉवर लागते. त्याचे वजन फक्त 900 ग्रॅम आहे.पंख्याचा वेग 3 क्रमांकापर्यंत वाढवता येऊ शकतो. तुम्ही वारा, स्ट्रोक आणि वीक विंडमधून कोणताही एक मोड निवडू शकता.आपल्याला त्याच्या टाकीमध्ये साधं पाणी घालावे लागेल आणि त्या बदल्यात ते आपल्याला थंड हवा देईल.

लक्षात ठेवा की टाकीमध्ये कोणतेही केमिकल टाकण्याची गरज नाही.हा एसी 19 सेमी उंच आणि रुंद आहे. लहान आकारामुळे ते कुठेही नेणे शक्य आहे.कंपनीचा दावा आहे की एकदा त्याची टाकी भरली की ती 8 तास थंड हवा देऊ शकते.

मिनी एअर कूलरची किंमत किती आहे?

मिनी आर्क्टिक अल्ट्रा एअर कूलरची किंमत सध्या Amazon वर 1,225 रुपये आहे. तुम्ही एचएसबीसी बँकेतून पैसे भरल्यास सुमारे 61 रुपयांची सूट मिळेल. या एसीवर मोफत डिलिव्हरी आणि 10 दिवसांचे रिटर्न पॉलिसीही दिली जात आहे.

टीप: इथे आम्ही फक्त उत्पादनाबद्दल सांगत आहोत. जर तुम्हाला ते आवडत असेल तर ते तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर खरेदी करा. पेमेंट करण्यापूर्वी, उत्पादनाचे रिव्ह्यू देखील तपासा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parbhani News : अतिवृष्टीग्रस्त परभणी जिल्ह्यासाठी १२८ कोटींची आर्थिक मदत मंजूर; शेतकऱ्यांना थेट खात्यात जमा होणार नुकसानभरपाई

Pune Heavy Rain: पुण्यात मुसळधार पाऊस! रस्त्यांना नद्यांचं स्वरुप, वाहतूक ठप्प; पुणेकर खोळंबले

Latest Maharashtra News Updates : अक्कलकोट तालुक्यात ओला दुष्काळाची स्थिती – जयकुमार गोरे

Parner Crime : सातबारा उताऱ्यावर नोंद लावण्यासाठी आठ हजारांची लाच घेताना कामगार तलाठ्याला रंगेहाथ पकडले

Pune Heavy Rain : पाषाण परिसरात मेघगर्जनेसह पावसाची हजेरी; चाकरमान्यांचे हाल, सखल भागात पाणी साचले

SCROLL FOR NEXT