Motorola Edge 20
Motorola Edge 20 Google
विज्ञान-तंत्र

लॉंचपूर्वीच समोर आली Motorola Edge 20 Fusion आणि Edge 20ची किंमत

सकाळ डिजिटल टीम

मोटोरोलाने भारतात एज 20 (Motorola Edge 20) आणि एज 20 फ्यूजन (Motorola Edge 20 Fusion) स्मार्टफोन लाँच करण्याची घोषणा केली आहे. हे दोन्ही फोन 17 ऑगस्टला देशात लाँच होतील. हे फोन भारतीय बाजारात कोणत्या किंमतीत उपलब्ध होतील याबद्दलची माहिती लॉंच होण्याआधीच उघड झाली आहे.

मोटोरोला एज 20 फ्यूजन स्मार्टफोन देशात दोन स्टोरेज व्हेरियंटमध्ये उपलब्ध केला जाईल तर एज 20 हा स्मार्टफोन एकाच व्हेरियंटमध्ये उपलब्ध केला जाईल. एज 20 फ्यूजनमध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरियंट ग्राहकांसाठी 21,499 रुपयांमध्ये लॉन्च केले जाऊ शकते तर 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असलेला व्हेरियंट 23,999 रुपयांमध्ये लॉन्च केले जाऊ शकते. त्याचबरोबर मोटोरोला एज 20 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह सुमारे 29,999 रुपयांमध्ये उपलब्ध होऊ शकतो.

फ्लिपकार्टवर एज 20 फ्यूजनची मायक्रोसाइट तयार करण्यात आली आहे. या लिस्टिंग पेजवरून, हँडसेट मीडियाटेक डायमेन्सिटी 800U चिपसेट असल्याचे उघड झाले आहे. त्याचबरोबर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 778 प्रोसेसर एज 20 मध्ये दिला जाईल. सध्या कंपनीने किंमतीबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे अधिकृत लाँच होईपर्यंत किंमतींबद्दल निश्चित काही सांगता येणार नाही.

Motorola Edge 20 Fusion स्पेसिफीकेशन्स

परफॉर्मन्स - क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 720 जी

डिस्प्ले - 6.7 इंच (17.02 सेमी)

स्टोरेज - 128 जीबी

कॅमेरा - 108 एमपी + 8 एमपी + 2 एमपी

बॅटरी - 5000 एमएएच

भारतात किंमत - 24999

रॅम - 8 जीबी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sambit Patra: 'भाजप नेते मोदींना देवाच्या वरती समजू लागले'; संबित पात्रांच्या वक्तव्यामुळे विरोधकांना आयता मुद्दा

Pune Porsche Accident: पुण्यात दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन मुलाचे वडिल पोलिसांच्या ताब्यात; संभाजीनगरमधून केले अटक

Rava Dosa Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा चवदार रवा डोसा, जाणून घ्या सोपी रेसिपी

Yoga Tips : थकवा अन् अशक्तपणापासून आराम मिळवण्यासाठी दररोज करा 'ही' योगासने, जाणून घ्या सरावाची पद्धत

Latest Marathi News Live Update: गजानन महाराजांच्या पालखीलचे 13 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान

SCROLL FOR NEXT