Motorola Edge 50 smartphone Flipkart discount offer esakal
विज्ञान-तंत्र

Motorola Edge 50 Discount : खुशखबर! 28 हजारचा मोबाईल मिळतोय 15 हजारांत; मोटोरोलाचा बंपर डिस्काउंट, इथे सुरुय ऑफर

Motorola Edge 50 स्मार्टफोनवर फ्लिपकार्टवर जबरदस्त सवलत सुरु आहे. हा फ्लॅगशिप फोन आता फक्त 15,500 रुपयांमध्ये मिळू शकतो.

Saisimran Ghashi

स्मार्टफोन मार्केटमध्ये सतत नावीन्य आणि स्पर्धा सुरू असतानाच Motorola ने आपल्या Edge सिरीजचा लोकप्रिय स्मार्टफोन Motorola Edge 50 वर जबरदस्त सवलत जाहीर केली आहे. फ्लिपकार्टवर सध्या सुरू असलेल्या विशेष ऑफरमुळे, हा दमदार फोन आता अवघ्या १५,५०० रुपये किंमतीत मिळू शकतो. Motorola Edge 60 लवकरच बाजारात येणार असल्यामुळे कंपनीने ही सवलत जाहीर केली असून ग्राहकांसाठी हा सुवर्णसंधी ठरू शकतो.

दमदार फीचर्स आणि प्रीमियम लुक

Motorola Edge 50 हा मिडरेंज फ्लॅगशिप सेगमेंटमधील एक अत्यंत लोकप्रिय स्मार्टफोन आहे. यामध्ये 6.7 इंचाचा P-OLED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेटसह दिला आहे. स्क्रीनचे रक्षण Corning Gorilla Glass 5 ने केले आहे. याशिवाय फोनला IP68 सर्टिफिकेशन मिळाले असून तो पाण्यापासून आणि धुळीपासून सुरक्षित आहे.

हा फोन Android 14 वर चालतो, ज्याला भविष्यात अपडेट्सही मिळणार आहेत. Snapdragon 7 Gen 1 AE प्रोसेसरमुळे याचे परफॉर्मन्स उत्कृष्ट आहे. वापरकर्त्यांसाठी 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज पर्याय उपलब्ध आहेत.

फोटोग्राफीसाठी खास

Motorola Edge 50 मध्ये 50MP + 10MP + 13MP चा ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, तर 32MP सेल्फी कॅमेरा देखील दिला आहे. हे कॅमेरे डे टू नाईट फोटोग्राफीसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आहे जी 68W फास्ट चार्जिंग ला सपोर्ट करते, त्यामुळे दिवसभर फोन वापरण्यात कोणतीही अडचण येत नाही.

फ्लिपकार्टवर खास ऑफर

सध्या फ्लिपकार्टवर Motorola Edge 50 चा मूळ किंमत 27,999 रुपये असून, त्यावर 33% ची थेट सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे तो आता 21,999 रुपयांमध्ये खरेदी करता येतो. विशेष म्हणजे, Flipkart Axis Bank क्रेडिट कार्ड वापरल्यास अतिरिक्त 5% कॅशबॅक मिळतो.

तसेच, ग्राहकांसाठी एक एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे, जिथे जुन्या फोनच्या बदल्यात 21,450 रुपयांपर्यंतचे मूल्य मिळू शकते. जर तुमच्या जुन्या फोनची किंमत 6,000 रुपये असेल, तर Edge 50 तुम्हाला फक्त 15,500 रुपयांमध्ये मिळू शकतो. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी आहे.

लवकरच येतोय Motorola Edge 60

Motorola आपल्या आगामी Edge 60 मॉडेलसह बाजारात एन्ट्री करणार आहे. त्यामुळे Edge 50 वरची डिस्काउंट आणखी महत्त्वाचा आहे. ज्या ग्राहकांना प्रीमियम डिझाईन, उच्च दर्जाचे कॅमेरे आणि दमदार परफॉर्मन्स असलेला फोन हवा आहे, त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याच्या तयारीत असाल आणि प्रीमियम फिचर्ससह एक विश्वासार्ह ब्रँड शोधत असाल तर Motorola Edge 50 सध्या उपलब्ध असलेली सर्वोत्तम डील ठरू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NASA layoffs: आता ‘नासा’मध्येही मोठी कर्मचारी कपात; ‘ट्रम्प कार्ड’चा फटका!

ENG vs IND, 4th Test: राहुल - गिलची शतकाकडे वाटचाल, तरी इंग्लंडकडे चौथ्या दिवसअखेर मोठी आघाडी; पाचवा दिवस निर्णायक

Harshwardhan Sapkal : सरकार व पालकमंत्री झोपा काढत होते का?

Ajit Pawar: ''मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येतेय! 'राष्ट्रवादी'ने मराठ्यांचा फक्त वापर केला'', अजित पवारांच्या आमदाराकडून घरचा आहेर

Maharashtra Politics: लोकसभेच्या निवडणुकीनंतर शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष पद रिकामेच; राजकारणात चर्चा

SCROLL FOR NEXT