विज्ञान-तंत्र

होंडाची सर्वात स्वस्त कार Honda Amaze भारतात लॉंच; जाणून घ्या किंमत

सकाळ डिजिटल टीम

जपानी वाहन निर्माता होंडा ने त्यांची सगळ्यात स्वस्त कार होंडा अमेझ चे नवीन फेसलिफ्ट मॉडेल भारतीय बाजारात लाँच केले आहे. कंपनीने या नवीन सेडान कारमध्ये काही विशेष बदल केले आहेत, जे मागील मॉडेलच्या तुलनेत ते अधिक चांगले ठरतील. हे बदल असूनही, कारच्या किमतीत अगदी थोडी वाढ झाली आहे. या कारची सुरुवातीची किंमत फक्त 6.32 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे.

होंडा कंपनीने (Honda Cars) ही कार एकूण तीन प्रकारांमध्ये सादर केली आहे. व्हीएक्स, एस आणि ई या व्हेरियंटचा त्यामध्ये समावेश होतो. ही कार पेट्रोल आणि डिझेल इंजिनसह मॅन्युअल आणि ऑटोमॅटीत सीव्हीटी ट्रान्समिशन गिअरबॉक्ससह येते. या व्यतिरिक्त, कारच्या डिझाइनमध्ये कॉस्मेटिक बदल देखील केले गेले आहेत.

कारचे एक्सटीरियर

नवीन अमेझ फेसलिफ्टचे (New Amaze Facelift) बहुतेक अपडेट त्याच्या फेसवर केलेले दिसतात. अमेझला एक नवीन फ्रंट ग्रिल देण्यात आले आहे जे पूर्वीपेक्षा अधिक स्लीक आहे आणि त्याच्या तळाशी दोन अतिरिक्त हॉरिझॉन्टल क्रोम पट्ट्या देखील मिळतात. बम्परवरील फॉग लॅम्प हाऊसिंगमध्येही बदल केले गेले आहेत आणि याला नवीन क्रोम गार्निश देण्यात आले आहे

कारच्या बाहेरील बाजूस करण्यात आलेला सर्वात मोठा बदल टॉप मॉडेल व्हीएक्स ट्रिममध्ये दिसतो, ज्याला आता एलईडी डे टाईम रमिंग लॅंप आणि स्वयंचलित एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्पसह एलईडी फ्रंट फॉग लॅंम्प देण्यात आले आहेत. नवीन15-इंच डायमंड कट क्रोम , ड्युअल-टोन अलॉय व्हील्स कारली आणखीणच आकर्षक बनवतात. कारला नवीन सी-आकाराचे एलईडी टेल-लाइट्ससह नवीन क्रोम गार्निश आणि बम्परवर रिफ्लेक्टर देखील मिळतात.

कारचे इंटेरियर

कारच्या आतील बाजूस डिझाइन मुख्यतः प्री-फेसलिफ्ट मॉडेलसारखेच राहते. मात्र होंडाने डॅशबोर्ड आणि स्टीयरिंग व्हीलवर नवीन चांदीच्या अॅक्सेंटसह काही बदल केले आहेत जे काळ्या आणि बेज इंटीरियरसह चांगले दिसतात. याशिवाय गिअर लीव्हरवर लेदर सरफेसिंग देण्यात आले आहे, जे प्रीमियम फील देते.

अमेझ फेसलिफ्टला फ्रंट मॅप लॅंप, एसी व्हेंट नॉब्ससाठी नवीन क्रोम फिनिश, डस्ट आणि पोलेन फिल्टर आणि ट्रंकच्या लिडच्या आतील बाजून नविन लाईनींग देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त, टॉप-स्पेस व्हीएक्स ट्रिममध्ये एक्सक्लुझिव्ह फॅब्रिक सीट सीट आणि 7.0 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम आहे जी अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कार प्लेशी जोडली जाऊ शकते. ही खार मोटियोरिक ग्रे रंगासोबत ही कार एकूण पाच वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध आहे.

नवीन होंडा अमेज व्हेरियंट आणि किंमती (एक्स-शोरूम, दिल्ली)

व्हेरियंट पेट्रोल डिझेल

E 6.32 लाख रुपये 8.66 लाख रुपये

S 7.16 लाख रुपये 9.26 लाख रुपये

VX 8.22 लाख रुपये 10.25 लाख रुपये

S CVT 8.06 लाख रुपये -

VX CVT 9.05 लाख रुपये 11.15 लाख रुपये

नवीन होंडा अमेझच्या पेट्रोल व्हेरिएंटमध्ये 1.2 लिटर इंजिन आहे जे 88 एचपी पॉवर आणि 110 एनएम टॉर्क जनरेट करते. तर डिझेल प्रकारात कंपनीने 1.5 लिटर इंजिन दिले आहे, ज्याचे CVT ट्रांसमिशन ट्रिम 80 एचपी पॉवर आणि 160 एनएम टॉर्क जनरेट करते आणि मॅन्युअल 100 एचपी पॉवर आणि 200 एनएम टॉर्क जनरेट करते. त्याचे पेट्रोल मॉडेल 18 किमी आणि डिझेल मॉडेल 24 किमी प्रति लीटरचे मायलेज देते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISCE Result 2024 : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल जाहीर; एका क्लिकवर पाहा रिझल्ट

Kangana Ranaut: कंगनानं थेट बिग बींसोबत केली स्वत:ची तुलना; भाषणाचा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, म्हणाले..."

Viral Video: लाईक्ससाठी पेटवलं जंगल ! सोशल मीडियावर आगीचा व्हिडिओ अपलोड केल्या प्रकरणी तिघांना बेड्या

Manisha Koirala : उमरावजान साकारणार होती मल्लिकाजान ? मनीषाने सांगितली 18 वर्षांपूर्वीची गोष्ट

Harshit Rana KKR vs LSG : कारवाईनंतरही हर्षित राणा सुधरला नाही; बीसीसीआयला पुन्हा डिवचलं?

SCROLL FOR NEXT