New Whatsapp Update will be coming soon
New Whatsapp Update will be coming soon  esakal
विज्ञान-तंत्र

आता व्हॉट्सअॅपवर तुमचं ऑनलाईन दिसणंही होणार हाईड ! लवकरच येणार नवं फिचर

सकाळ ऑनलाईन टीम

व्हॉट्सअॅपवर लवकरच आणखी एक नव्या फीचरची भर पडणार आहे.टाईमलाईन स्टेटस,स्टेटस यांसारख्या फीचरचा पुरेपूर फायदा युजर्स घेतच आहेत.पण अनेक दिवसांपासून ज्या अपडेटची (Update) युजर्सला वाट होती ते फीचर लवकरच व्हॉट्सअॅपवर येणार आहे.या फीचरच्या मदतीनं युजर्सला त्यांचं ऑनलाईन दिसणं सुद्धा हाईड करता येणार आहे.

या फीचरमध्ये तुम्हाला हव्या असणाऱ्या लोकांना तुम्ही तुमचं ऑनलाईन स्टेटस दाखवू शकाल.अर्थात तुम्ही ऑनलाईन आहात की ऑफलाईन आहात हे तुम्हाला हव्या असणाऱ्या युजर्सलाच शो करता येणं शक्य होणार आहे.व्हॉट्सअॅप मॅसेज डिलीटचे फीचरही अपडेट केले जात आहे. WBetainfo च्या अहवालानुसार व्हॉट्सअॅपवर तुमचा शेवटचा सीन कोण बघू शकेल हेही तुम्हाला ठरवता येणार आहे.मात्र सध्या हे फीचर डेवलपमेंटच्या टप्प्यात आहे.

नवीन फीचर असे असेल

रिपोर्टनुसार यामध्ये तुम्हाला दोन पर्याय मिळणार आहेत.यात तुम्ही 'प्रत्येकजण' आणि 'सेम अॅज लास्ट सीन' असे दोन पर्याय असणार आहेत.स्टेटस प्रायवसीप्रमाणे तुम्हाला काही लोक वगळून ज्यांना तुमचं ऑनलाईन स्टेटस दाखवायचं आहे त्यांनाच ते दिसेल.जर तुम्ही काही लोकांशिवाय बाकीच्या लोकांसाठी लास्ट सीन चालू केले असेल तर ऑनलाईन स्टेटस देखील तसेच दिसेल.हे फीचर नेमके कधी येणार आहे याबाबत अजून कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.पण युजर्स बऱ्याच दिवसांपासून या फीचरची वाट बघत होते.

व्हॉट्सअॅप आणखी एक नवे अपडेट जारी करणार आहे.त्यानुसार व्हॉट्सअॅप ग्रुप वापरणाऱ्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे.त्यात आता एका वेळी ५१२ लोकांना सहभागी करून घेता येणार आहे.व्हॉट्सअॅपकडून लवकरच हे नवीन अपडेट येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Liquor Scam: मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत 15 मे पर्यंत वाढ

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बजावला मतदानाचा हक्क

Rekha Jhunjhunwala: रेखा झुनझुनवालांचे एका दिवसात 800 कोटींचे नुकसान; शेअर बाजारात नेमकं काय झालं?

Met Gala 2024 : Met Gala कसा बनला फॅशन जगतातला ऑस्कर ? जाणून घ्या यंदाची थीम अन् इतिहास

UAPA: ओसामा बिन लादेनचे फोटो, ISIS चे झेंडे बाळगणे गुन्हा नाही: हायकोर्ट

SCROLL FOR NEXT