Nitin Gadkari announced new traffic Rules  Sakal
विज्ञान-तंत्र

ड्रायव्हिंग करताना फोनवर बोलणं ठरणार कायदेशीर: नितीन गडकरी

गाडी चालवताना फोनवर बोलणं येणाऱ्या काळात कायदेशीर ठरणार आहे, असं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

सकाळ डिजिटल टीम

अलीकडच्या काळात वाहतुकीचे नियम खुपच कडक करण्यात आले आहेत. वाहतुकीचे नियम (Traffic Rules) मोडल्यावर मिळणारी शिक्षा किंवा दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. गाडी चालवताना मोबाईलवर बोलणं हा कायद्याने गुन्हा आहे. असं केलेलं आढळल्यास वाहतूक पोलीस (Traffic Police) कारवाई केली जाते. परंतु येणाऱ्या काळात ही कारवाई होणार नाही.

गाडी चालवताना फोनवर बोलणं आता गुन्हा ठरणार नाही, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी सांगितले आहे. परंतु त्यासाठी काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, असंही ते म्हणाले. लवकरच याविषयीची घोषणा लोकसभेत केली जाईल, असंही ते म्हणाले. (Nitin Gadkari Said that Driving while taking on the phone moght soon legal)

नितीन गडकरी यांनी याबाबत बोलताना सांगितले की, गाडी चालवताना तुम्ही फोनवर बोलू शकता, परंतु बोलत असताना फोन तुमच्या हातात नसावा. हॅण्ड्सफ्री उपकरण (उदा. इअरफोन, ब्लूटूथ इ.) वापरून तुम्ही फोनवर बोलू शकता. फोनवर बोलताना तुमचा मोबाईल तुमच्या खिशात असावा किंवा बाजूला ठेवलेला असावा. या पद्धतीने तुम्ही फोनवर बोललात तर तो गुन्हा ठरणार नाही, असं नितीन गडकरी यांनी सांगितले. या परिस्थितीमध्ये वाहतूक पोलीस तुमच्याकडून दंड आकारू शकत नाहीत. परंतु पोलिसांनी अशी कारवाई केल्यास तुम्ही त्यांच्याविरोधात कोर्टात जाऊ शकता.

गाडी चालवताना फोनवर बोलत आहात, म्हणून अटक झाली तरीही तुम्ही कोर्टात अपील करू शकता. यामुळे वाहनचालकांना काही प्रमाणात दिलासा मिळेल. हा निर्णय रस्ते अपघात कमी करण्याच्या सरकारच्या ध्येयाशी सुसंगत आहे. असंही गडकरींनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: प्रयोग थांबणार अन् न्यूझीलंडविरुद्धच दिसणार भारताची World Cup ची संभावित प्लेइंग-११? कर्णधार शुभमन गिलचे संकेत

France Student Protests : फ्रान्समधील विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण; ४ हजार जणांना अटक, २०० जण जखमी

विद्युत खांबावरील स्पार्किंगमुळे आग; ४ एकर ऊस, सोलार व ठिबकचे साहित्य जळून खाक, शेतकरी उद्ध्वस्त

Irani Cup 2026: रिषभ पंतच्या नेतृत्वातील संघ ठरला चॅम्पियन! फायनलमध्ये रणजी ट्रॉफी विजेत्यांना केलं पराभूत

भाकरीसोबत तोंडाला पाणी आणणारी गोळ्याची आमटी; पाहा खानदेशी पद्धतीची रेसिपी; GOLYACHI AAMTI RECIPE

SCROLL FOR NEXT