नो टेन्शन! तुमच्या फोनमधील Photo-VDO लागणार नाहीत कोणाच्या हाती
नो टेन्शन! तुमच्या फोनमधील Photo-VDO लागणार नाहीत कोणाच्या हाती esakal
विज्ञान-तंत्र

नो टेन्शन! तुमच्या फोनमधील Photo-VDO लागणार नाहीत कोणाच्या हाती

सकाळ वृत्तसेवा

तुमच्या स्मार्टफोनमधील पर्सनल व सिक्रेट डॉक्‍युमेंट्‌स कुणाच्याही हाती लागणार नाहीत.

तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमधील (Smartphone) पर्सनल फोटो (Photos), व्हिडिओ (Video) किंवा महत्त्वाचे डॉक्‍युमेंट्‌स (Documents) इतरांनी पाहू नये, असे वाटत असूनही काहीवेळा ते फोटोज व व्हिडिओ इतरांच्या दृष्टीस पडतातच. मग तुमची गुपिते इतरांना कळून चुकतात. मात्र आता काळजी करायची गरज नाही. तुमच्या स्मार्टफोनमधील पर्सनल व सिक्रेट डॉक्‍युमेंट्‌स कुणाच्याही हाती लागणार नाहीत. त्यासाठी तुम्हाला तुम्हाला या सोप्या गोष्टी सेट कराव्या लागतील. (No one will be able to see the private photos-videos in your phone anymore)

आपल्या स्मार्टफोनमध्ये अनेक प्रकारच्या गोपनीय गोष्टी असतात, जसे की पर्सनल फोटो-व्हिडिओ आणि डॉक्‍युमेंट्‌स, ज्या आपण कोणाशीही शेअर करू इच्छित नाही; मग ते कुटुंबातील सदस्य असो किंवा मित्र असो. पण कधी कधी अशी परिस्थिती उद्‌भवते की, इच्छा नसतानाही आपला फोन कुणाला तरी द्यावा लागतो. उदाहरणार्थ, एखाद्या विशिष्ट व्यक्तीने तुम्हाला महत्त्वाचा कॉल करण्यासाठी फोन मागितला, तर तुम्हाला तो द्यावा लागतो. काही लोक कॉल पूर्ण झाल्यानंतर फोन परत करतात, तर काही 'गॅलरी'त डोकावण्याचा प्रयत्न करतात. मात्र एक युक्ती अशी आहे ज्यामुळे गूगल फोटोमध्ये पडलेले खासगी फोटो-व्हिडिओ कोणाच्याही हाती लागणार नाहीत. तुम्ही कोणालाही तुमचा फोन बिनधास्त देऊ शकाल आणि लाख प्रयत्नांनंतरही तुमचे वैयक्तिक फोटो-व्हिडिओ कोणीही पाहू शकणार नाहीत.

वास्तविक, Google Photos लॉक्‍ड फोल्डर फीचर आता पिक्‍सेल स्मार्टफोन व्यतिरिक्त इतर Android स्मार्टफोनमध्ये उपलब्ध आहे. जूनमध्ये Google ने फोटोमध्ये जतन केलेले फोटो आणि व्हिडिओ लॉक करण्यासाठी फीचर जारी केले आहे. आधी हे फीचर फक्त Google Pixel स्मार्टफोन्सपुरते मर्यादित होते, परंतु आता ते इतर Android स्मार्टफोनमध्ये देखील उपलब्ध आहे. Google Photos नुसार, पासवर्ड-संलग्न केलेले फोटो किंवा व्हिडिओ Google Photos ग्रिड, सर्च किंवा अल्बममध्ये दिसणार नाहीत. फोनवर इन्स्टॉल केलेल्या ऍपमध्येही ही छायाचित्रे दिसणार नाहीत. या फीचरची घोषणा कंपनीने मे मध्ये Google I/O इव्हेंट 2021 मध्ये केली होती. लॉक केलेले फोल्डर फीचर Android 6.0 आणि त्यावरील Android व्हर्जनमध्ये उपलब्ध असेल. एकदा हे फीचर त्यांच्या Android डिव्हाइसवर आल्यानंतर, वापरकर्त्यांना एक सूचना मिळेल की ते Google Photos लॉक केलेल्या फोल्डरमध्ये प्रवेश करू शकतात.

Google Photos च्या लॉक केलेल्या फोल्डरमध्ये सेव्ह केलेले फोटो आणि व्हिडिओ बॅकअप किंवा शेअर केले जाऊ शकत नाहीत. या फीचरद्वारे यूजर्स त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सहज लपवू शकतात. या फोल्डरमध्ये जतन केलेल्या प्रतिमांचे स्क्रीनशॉट घेतले जाऊ शकत नाही. पाहण्यासाठी म्हणजे, हे फोटो किंवा व्हिडिओ ऍक्‍सेस करण्यासाठी, वापरकर्त्यांना डिव्हाइसचा स्क्रीन पासवर्ड प्रविष्ट करणे आवश्‍यक आहे. हे एक अद्‌भुत वैशिष्ट्य आहे. आता ते त्वरित कसे वापरायचे ते पाहा...

असे करा तुमचे फोटो लॉक...

  • सर्वप्रथम, तुमच्या फोनमध्ये Google Photos ची नवीन व्हर्जन असले पाहिजे.

  • त्यानंतर Google Photos ओपन करा.

  • आता लायब्ररीत जा. युटिलिटीज सर्च करा.

  • त्यानंतर Set up Locked Folder वर क्‍लिक करा.

  • हे केल्यानंतर एक स्क्रीन उघडेल. त्यावर लॉक्‍ड फोल्डरचे फीचर्स दिले जातील.

  • पुढे जाण्यासाठी सेट अप लॉक्‍ड फोल्डरवर क्‍लिक करा.

  • येथे तुम्ही लोकल फोल्डरवर पासवर्ड सेट करू शकता.

  • तुम्ही तुमच्या फोनचा लॉक पॅटर्न देखील वापरू शकता.

अशा प्रकारे तुम्ही तुमचे फोटो आणि व्हिडिओ सहजपणे लॉक करू शकता आणि ते Google Photos यामध्ये सुरक्षित ठेवू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT