Noise Smartwatch
Noise Smartwatch Sakal
विज्ञान-तंत्र

Noise Smartwatch: भारतीय कंपनीची १५०० रुपयांच्या बजेटमधील शानदार वॉच लाँच; फीचर्स अफलातून

सकाळ डिजिटल टीम

Noise ColorFit Caliber Buzz Smartwatch Launched: टेक ब्रँड Noise सातत्याने कमी किंमतीत येणाऱ्या डिव्हाइसला लाँच करत आहे. आता कंपनीने ColorFit Caliber Buzz या कमी बजेटमध्ये येणाऱ्या स्मार्टवॉचला सादर केले आहे. या स्वस्त स्मार्टवॉचमध्ये वॉटरप्रुफिंगपासून ते ब्लूटूथ कॉलिंगसह अनेक शानदार फीचर्स मिळतील.

नवीन Noise ColorFit Caliber Buzz स्मार्टवॉचमध्ये Tru SuncTM टेक्नोलॉजीचा सपोर्ट मिळतो. याद्वारे सहज पेअरिंग, कॉलिंग आणि शानदार कनेक्टिव्हिटी मिळेल. यात यूनिबॉडी फिनिशसह सिंगल चिप ब्लूटूथ आणि आकर्षक स्ट्रॅप दिले आहे.

Noise ColorFit Caliber Buzz चे फीचर्स

Tru SyncTM टेक्नोलॉजीसह येणाऱ्या या वॉचमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ व्ही५.३ चा सपोर्ट दिला आहे. यात कॉलिंगसाठी इन-बिल्ट स्पीकर आणि मायक्रोफोनचा सपोर्ट मिळेल. कॉलिंगसाठी डायल-पॅड फीचर आणि १.६९ इंच TFT डिस्प्ले मिळतो. तर सिंगल चार्जमध्ये वॉचची बॅटरी ७ दिवस टिकेल.

Noise च्या या वॉचमध्ये हार्ट रेट, अ‍ॅक्टिव्हिटी लेव्हल, SpO2, स्लीप मेजरमेंट मॉनिटर्स आणि फीमेल साइकल ट्रॅकर सारखे हेल्थ फीचर्स देण्यात आले आहेत. याशिवाय, हवामानाची माहिती आणि स्टॉक मार्केट्स अपडेट देखील मिळतील. वॉच १०० पेक्षा अधिक स्पोर्ट्स मोड आणि १५० पेक्षा जास्त वॉच फेसेजसह येते.

हेही वाचा: Smartphone Offer: अशी संधी पुन्हा नाही! फक्त ३० हजारांच्या बजेटमध्ये मिळतोय iPhone

Noise ColorFit Caliber Buzz ची किंमत

Noise ColorFit Caliber Buzz ला तुम्ही फक्त १,४९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. वॉच कंपनीच्या अधिकृत वेबसाइटसोबतच ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart वर खरेदीसाठी उपलब्ध आहे. वॉचला जेट ब्लॅक, रोज पिंक, मिडनाइट ब्लू आणि ऑलिव ग्रीन रंगात खरेदी करता येईल.

हेही वाचा: द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT