Nokia XR20 Google
विज्ञान-तंत्र

मिलीटरी ग्रेड बिल्ड Nokia XR20 स्मार्टफोन लॉंच, पाहा डिटेल्स

सकाळ डिजिटल टीम

Nokia XR20 स्मार्टफोन भारतात लॉन्च करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन मिलीटरी ग्रेड डिझाइन असलेला हा फोन अति तापमान आणि पाण्याखाली देखील सुमारे एक तास चालू शकतो. या फोनच्या मुख्य स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाले तर, या फोनमध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 480 प्रोसेसर आणि ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आले असून यात ग्राहकांना पावरफुल बॅटरी देखील मिळेल जी एकदा चार्ज केल्यानंतर 2 दिवसांचा बॅकअप देते.

नोकिया XR20 चे इतर फीचर्स

Nokia XR20 या स्मार्टफोनमध्ये ड्युअल-सिम स्लॉट देण्यात आला असून हा डिव्हाइस अँड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. यात 6.67-इंच फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन 1,080x2,400 पिक्सेल असून आस्पेक्ट रेशो 20: 9 आहे. स्क्रिन प्रोटेक्टर म्हणून Gorilla Glass Victusचा वापर केला गेला आहे. याशिवाय फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 480 SoC स्मार्टफोनमध्ये उपलब्ध असेल.

Nokia XR20 मध्ये कॅमेरा कसा असेल

Nokia XR20 मध्ये तुम्हाला Zeiss optics देण्यात आले आहे. या फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप दिला असून ज्यामध्ये पहिला 48MP प्रायमरी सेन्सर आहे आणि दुसरा 13MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी, XR20 स्मार्टफोनमध्ये 8MP कॅमेरा मिळेल. नोकिया XR20 च्या कॅमेरा फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, यात OZO spatial ऑडियो रिकॉर्डिंग आणि विंड-नॉईज कँसलेशन करण्याचे फीचर मिळेल. या व्यतिरिक्त, वापरकर्त्यांना Action Cam आणि SpeedWarp मोड मिळतील.

Nokia XR20 बॅटरी आणि कनेक्टिव्हिटी

Nokia XR20 स्मार्टफोनमध्ये 128GB चे इंटरनल स्टोरेज देण्यात आले असून फोनमध्ये 4630mAh ची बॅटरी मिळेल जी 18W वायर आणि 15W वायरलेस फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या व्यतिरिक्त, वापरकर्त्यांना स्मार्टफोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय, जीपीएस, ब्लूटूथ, हेडफोन जॅक आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट सारखे फीचर्स मिळतील.

किंमत किती आहे?

Nokia XR20 स्मार्टफोनची किंमत 46,999 रुपये असून, 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरियंट या किंमतीत उपलब्ध असेल. या फोनची प्री-बुकिंग 20 ऑक्टोबरपासून सुरू होईल आणि विक्री 30 ऑक्टोबरपासून सुरू होईल. त्याचबरोबर हा फोन ग्रॅनाइट आणि अल्ट्रा ब्लू कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

Mughal Treasury Found: बापरे! मुगल काळातील खजिना सापडला, मनरेगा कामगारांना उत्खननादरम्यान असं काही सापडलं की प्रशासनही हादरलं

Success Story: १४ तास अभ्यास, परीक्षेच्या २० दिवस आधी घरातील सदस्य गमावला, अडचणीवर मात करून तरुण सीए बनला

SCROLL FOR NEXT