Now use video and voice calls in WhatsApp web  
विज्ञान-तंत्र

अरे वाह! आता WhatsApp Web वरून करा व्हॉइस आणि व्हिडीओ कॉल्स; जाणून घ्या नवीन फीचरबद्दल    

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : WhatsApp हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग आहे. आपल्या मित्र-मैत्रिणींशी, नातेवाईकांशी, कुटुंबातील सदस्यांशी आपण सतत WhatsApp वर बोलत असतो. तसंच मेसेज, व्हॉइस कॉल्स, व्हिडीओ कॉल्स करत असतो. मात्र अनेकांना कामानिमित्त सतत मोबाईल हातात घेता येत नाही. यासाठी WhatsApp नं WhatsApp web हे फिचर आणलं होतं. ज्यामुळे तुम्ही डेस्कटॉपवरही WhatsApp वापरू शकता. मात्र आता WhatsApp नं यात एक भन्नाट फिचर आणलं आहे. ज्यामुळे तुम्ही डेस्कटॉप किंवा Mac मधील WhatsApp मध्ये व्हिडीओ कॉल्स आणि व्हॉइस कॉल्स करू शकणार आहात. 

WhatsApp Voice Calling हे फिचर नव्यानं आणलं आहे. हे फिचर Windows डेस्कटॉप आणि Mac वरही उपलब्ध असणार आहे. गेल्या वर्षी WhatsApp नं हे  Voice Calling चं फिचर काही निवडक यूजर्ससाठीच आणलं होतं. मात्र आता हे फिचर इतर सर्वच यूजर्सना वापरता येणार आहे. त्यामुळे तुमच्या डेस्कटॉपवरूनही आता व्हिडीओ कॉलिंग करणं शक्य होणार आहे. 

विशेष म्हणजे WhatsApp नं या फीचरमध्ये अनेक प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. हे फिचर पोर्ट्रेट किंवा लँडस्केप या दोन्ही ओरिएंटेशनमध्ये काम करू शकणार आहेत. आता तुमच्या डेस्क्सटॉप च्या स्क्रीनवर WhatsApp ची एक स्टॅन्ड अलोन विंडो दिसणार आहे. या विंडोला तुम्ही तुमच्या गरजेनुसार रिसाईझ करू शकणार आहात. विशेष म्हणजे तुम्ही मल्टिटास्किंग करतानाही हे फिचर वापरू शकता.    

सर्वात महत्वाची माहिती म्हणजे या नवीन फीचरमधील सर्व व्हॉइस आणि व्हिडीओ कॉल्स हे एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड राहणार आहेत. ज्यामुळे सुरक्षितता कायम असणार आहे. या फीचरमध्ये रिलायबिलिटी आणि हाय क्वॉलिटीचा अनुभव यूजर्सना घेता येईल. इतकंच नाही तर यापुढे ग्रुप व्हिडीओ कॉल्स आणि व्हॉइस कॉल्सचंही फिचर येणार आहे. 

याआधीही WhatsApp नं WhatsApp Web मध्ये आणि डेस्कटॉपमध्ये एक नवीन सेक्युरिटी फिचर आणलं होतं. कंपनीनं फेस आणि फिंगरप्रिंट अनलॉकला अनिवार्य केलं होतं. ज्यामुळे यूजर्सना अतिरिक्त सुरक्षा  मिळू शकेल. यामुळे कोणीच बाहेरची व्यक्ती तुमच्या डेस्कटॉपमधील WhatsApp ला कोणीही ओपन करू शकणार नाही.  

संपादन आणि संकलन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT