iQOO 9 SE
iQOO 9 SE  Sakal
विज्ञान-तंत्र

Smartphone Offer: बंपर डिस्काउंट! ८ जीबी रॅमसह येणारा फोन मिळतोय खूपच स्वस्त, जाणून घ्या ऑफर

सकाळ डिजिटल टीम

Offer On iQOO 9 SE: दमदार फीचर्ससह येणाऱ्या iQOO 9 SE स्मार्टफोनला आकर्षक ऑफरसह खरेदी करण्याची संधी आहे. आइकूचा हा फोन फ्लॅगशिप प्रोसेसरसह येतो. याशिवाय, शानदार कॅमेरा आणि ६६ वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देखील मिळतो. iQOO 9 SE स्मार्टफोनवर मिळणाऱ्या ऑफरविषयी सविस्तर जाणून घेऊया.

iQOO 9 SE वर डिस्काउंट

iQOO च्या या प्रीमियम मिड रेंड स्मार्टफोनला बंपर डिस्काउंटसह खरेदी करता येईल. अ‍ॅमेझॉनवर हा फोन अवघ्या ३०,९९० रुपये किंमतीत उपलब्ध आहे. ICICI Bank कार्डचा वापर केल्यास ३ हजार रुपयांपर्यंत डिस्काउंटचा फायदा मिळेल. याशिवाय, १६ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. मात्र, ही ऑफर तुमच्या जुन्या फोनच्या लेटेस्ट मॉडेल आणि कंडिशनवर अवलंबून आहे.

iQOO 9 SE चे फीचर्स

गेल्यावर्षी लाँच झालेल्या iQOO 9 SE स्मार्टफोनमध्ये अनेक शानदार फीचर्स मिळतात. फोन स्नॅपड्रॅगन ८८८ या फ्लॅगशिप प्रोसेसरसह येतो. यात ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज दिले आहे. तसेच, १२० हर्ट्ज रिफ्रेश रेटसह येणारा एमोलेड डिस्प्ले दिला आहे.

फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला असून, यात ४८ मेगापिक्सल + १३ मेगापिक्सल + २ मेगापिक्सल कॅमेऱ्याचा समावेश आहे. तर पॉवर बॅकअपसाठी ६६ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ४५०० एमएएचची दमदार बॅटरी मिळेल. तुम्हाला जर गेमिंगची आवड असेल तर हा हँडसेट चांगला पर्याय आहे.

हेही वाचा: Google Chrome: गुगल क्रोम होणार बंद! लॅपटॉप वापरत असाल तर त्वरित करा 'हे' काम

दरम्यान, आइकूच्या या फोनला Redmi Note 12 Pro+ जोरदार टक्कर देतो. रेडमीच्या या फोनमध्ये २००MP + ८MP + २MP ट्रिपल रियर कॅमेरा सपोर्ट, एमोलेड डिस्प्ले, १२० वॉट चार्जिंग सपोर्ट, ५००० एमएएचची बॅटरी आणि MediaTek Dimensity १०८० प्रोसेसर मिळेल. फोनची किंमत जवळपास ३० हजार रुपये आहे.

हेही वाचा: द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

IPL 2024 RCB vs CSK Live Score: चेन्नईला दुसरा धक्का! कर्णधारापाठोपाठ डॅरिल मिचेलही आऊट

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT