iPhone Resale : जर तुमच्याकडे जुने iPhone मॉडेल्स अजूनही सुरक्षित ठेवलेले असतील विशेषतः सीलबंद (sealed) अवस्थेत तर तुमच्याकडे लपवलेला “डिजिटल खजिना” आहे. २०२५ मध्ये जुन्या iPhones ना मिळत असलेला विक्रमी पुनर्विक्रीचा भाव पाहता, हे डिव्हाइसेस आता केवळ मोबाईल नसून कलेक्टर्स आयटम्स बनले आहेत.
स्थिती: अल्ट्रा-रेअर कलेक्टर्स आयटम
सध्याची किंमत: 15 लाख रुपये ते 50 लाख रुपये (सीलबंद बॉक्ससाठी)
iPhone 2G हा iPhone मालिकेचा जन्मदाताच! एका सीलबंद 8GB मॉडेलची अमेरिकेत तब्बल दीड कोटीला लिलावात विक्री झाली आहे. भारतातसुद्धा उघडलेले पण चांगल्या स्थितीतील युनिट्सना 50 हजार ते 2 लाख सहज मिळू शकतात.
स्थिती: व्हिंटेज
सध्याची किंमत: 10,000 ते 50,000 रुपये
iPhone 3G हे App Store सादर करणारे पहिले मॉडेल. त्याची वक्र बॅक डिझाईन आणि क्लासिक फील मुळे अनेक कलेक्टर्स याला अजूनही मागणी करतात.
स्थिती: डिझाईन आयकॉन
किंमत : 15,000 ते 70,000 रुपये
Retina Display आणि ग्लास बॉडीसह आलेला iPhone 4 हा Apple च्या डिझाईन मध्ये एक टर्निंग पॉईंट होता. प्रीमियम स्थितीतील किंवा लिमिटेड एडिशन मॉडेल्सना खूपच जास्त किंमत मिळते.
स्थिती: ऐतिहासिक मॉडेल
पुनर्विक्री किंमत: 10,000 ते 35,000 रुपये
हा iPhone Steve Jobs च्या दृष्टीने तयार झालेला शेवटचा फोन होता. आजही त्याला भावनिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे.
स्थिती: कल्ट क्लासिक
किंमत: 7,000 ते 25,000 रुपये
iPhone 5s प्रमाणेच कॉम्पॅक्ट आणि पॉवरफुल, त्यामुळे टेकप्रेमींमध्ये याला ‘कल्ट’ दर्जा मिळालाय. चांगल्या स्थितीत असलेले मॉडेल्स भविष्यात आणखी महाग होण्याची शक्यता आहे.
जर तुमच्याकडे वरीलपैकी कोणतेही iPhone मॉडेल सीलबंद आणि अनबॉक्स्ड स्थितीत असेल, तर त्याची किंमत अनेक पटीनं वाढते. अशा वस्तूंना कलेक्टर्स आणि लिलाव कंपन्या प्रचंड किंमत देतात. जर तुमच्या कपाटात जुना iPhone अजूनही असेल, तर तो कदाचित तुमचं भविष्यातलं सोनं ठरू शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.